
तातोडे यांचा खळबळजनक व्हिडीयो व्हायरल
तोतोडेंच्या पत्नीचा बावणकुळेंना इशारा: पतीला वेड्यात काढणे पडेल महागात
नागपूर,ता.७ फेब्रुवारी २०२२: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष जिव्हाळा असणारे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर त्यांच्या पत्नीचा सख्खा मावस भाऊ सूरज तातोडे याने नुकतेच ३१ जानेवरी २०२२ रोजी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन अतिशय गंभीर आरोप केले होते.मात्र बावणकुळे यांनी एक दोन मिनिटांचा व्हिडीयो जारी करुन तातोडे यांच्या सर्व आरोपांचे खंडण केले, तातोडे यांना मेंदू आघात झाल्यामुळे ते वेड्यासारखे बरगळतात असा खुलासा करीत तातोडे यांना माध्यमांसमाेर आणनारे ॲड.सतीश उके यांच्यावर ५० कोटींचा मानहानिचा दावा ठोकणार असा इशारा दिला होता.
याच पत्र परिषदेनंतर ॲड.उके व त्यांच्या भावाला गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तांनी अटक करुन कार्यालयात नेले.उके यांच्यावर १४ वर्षांपूर्वी दाखल एका विनय भंगाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.ही महिला उके यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असून एका विशिष्ट समुदायाची आहे.या महिलेसोबत उके यांचा प्रापर्टी खरेदीसंबधीचा जुना वाद होता.या गुन्ह्यासंबधी, आरोपी व फिर्यादी मधील आपसी समझौता हा न्यायाधीशांसमोर झाला असतानाही त्याच आरोपीकडून ऐन उके यांच्या पत्र परिषदेच्या दिवशी पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला,हे विशेष.
मात्र या अनाकलनीय घडामोडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिस आयुक्तांना फैलावर घेतले असल्याची माहिती समोर आली.ॲड.उके व त्यांच्या भावावर हत्यार बाळगण्यासारखा गंभीर गुन्हा त्या महिलेकडून नोंदवून घेण्यात आला होता,त्यामुळे उके बंधूंची सूटका होने अशक्य होती मात्र महाराष्ट्राच्या राजधानीतून अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि उके बंधूंची मध्यरात्री सूटका ही झाली.
मात्र ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’या उक्तीप्रमाणे ॲड.उके यांनी तातोडे यांना संपूर्ण कायदेशीर संरक्षण प्रदान करीत पुन्हा त्यांच्याकडून बावणकुळे यांच्या एकदंरित कारभाराविषयी पत्र परिषदेत सांगण्याचे राहून गेलेले मुद्दे वदवून घेतले.
या नव्या व्हिडीयोमध्ये मात्र तातोडे यांनी बावणकुळे यांच्यावर ‘बाया’व ’हवाला’चा आणखी एक खळबळजनक आरोप केला असून,बावणकुळे यांच्या एकंदरित कारभाराची संपूर्ण ‘मोडस ऑपरेंडी’कशी होती याची चांगलीच ‘पोलखोल’केली आहे.
उर्जा खात्यातील मंत्री असताना शासकीय नोकरीची वयोमर्यादा ओलांडलेल्या किती महिलांना बावणकुळे यांनी उर्जा खात्यात नोकरीवर लाऊन दिल्या,याचा पाढाच तातोडे यांनी वाचला.
अनेक महिलांना दिला गेलेला पैसा देखील ’डायरीत लिहू नकोस,तुझ्या मावशीला माहिती होईल’या सबबीखाली नोंद ही केली जात नव्हती.विशेष म्हणजे ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याचा आरोप तातोडे यांनी केला आहे.बावणकुळे यांना हवालाच्या मार्फत मिळणा-या रकमेत सर्वसामान्य वाहनधारकांसाठी तापदायक ठरलेले ‘टोल’ ही सूटले नाही.सर्वसामान्यांच्या खिश्याचा भार हलका करण्याऐवजी टोल कंत्राटदार बावणकुळेंनाच दर महिन्याला अडीच लाखांची रक्कम देत असल्याचा आरोप तातोडे यांनी केला आहे.
इतवारीच्या एका साडी स्टोरमधूल साडीच्या बॉक्समध्ये एक कोटींची रक्कम हवालातून प्राप्त केल्याचे तातोडे व्हिडीयोमध्ये सांगत आहे.रामदासपेठच्या घरातच पाच कोटींची रक्कम घेतली.चंद्रपूरातील दारुबंदीत ही स्वत:चे उखळ कसे पांढरे केले,उर्जा मंत्री पदावर असताना कोट्यावधीची माया जमवण्यात खर्ची केलेली ‘उर्जा’गोपाल सावरकरच्या नावासारखीच अनेक स्वीय सहायकांच्या नावे घेतलेली बेनामी संपत्ती,पॉवर प्लान्टमध्ये बावणकुळे यांच्या मार्फत लागणा-या अनेकांचे पगार हे कंत्राटदार देत असल्याचा खुलासा,थक्क करणारा आहे.अर्थातच या ‘घेवाण-देवाण’च्या व्यवहारात एकमेकांचे ’भले’करणा-या उर्जेमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र आपली ‘उर्जेची’बिले भरता-भरताच मेताकुटीस आला.
उर्जा खात्यात नोकरी लाऊन अनेक महिलांचा ‘उद्वार’ करणा-या बावणकुळे यांची मजल चक्क ‘मेट्रो’पर्यंत गेली व मेट्रोमध्ये देखील त्यांनी एका ‘खास’महिलेला नोकरीवर लावले असल्याचा आरोप तातोडे यांनी केला आहे.अर्थात बावणकुळे हे उर्जा मंत्री असताना एकूण किती वयाच्या व किती महिलांना ही शासकीय नोकरी मिळाली,माहितीच्या अधिकारात याची माहिती घेण्याचे आव्हान देखील त्यांनी केले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी अनेक वेळा आपल्या पत्र परिषदेत बावणकुळे यांना ओबीसीच्या प्रश्नावर व ओबीसींच्या ९०० न्याय हक्कांच्या जागांसाठी मेट्रोला जाब विचारण्याचे आव्हान केले आहे.मात्र ओबीसींच्या प्रश्नावर बावणकुळे हे मेट्रोला जाब का विचारत नाहीत,याचे उत्तर यात दडले असल्याची शंका आता व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात तातोडे यांनी माजी उर्जामंत्री व विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर ‘बाया,हवाला,कमिशनखोरी व भ्रष्टाचारा’बाबत केलेले आरोप हे अतिशय गंभीर असून हे आमदार महाराष्ट्रसारख्या सुसंस्कृत राज्याचे आहेत की उत्तर प्रदेश,बिहारचे आहेत?असा आता प्रश्न राज्याच्या जनतेला हे आरोप ऐकून पडला आहे.२०१९ मध्ये विधान सभेचे तिकिट ’का’ कापल्या गेले मात्र २०२२ मध्ये मागच्या दाराने गडकरी यांच्या कृपाआर्शिवादाने विधान परिषदेचे तिकीट ’का’ मिळाले?याचे उत्तर आता महाराष्ट्राची जनता आता या आरोपांमध्ये शोधत आहे
तातोडे यांच्या पत्नीने देखील त्यांच्या पतीला वेडा ठरविण्याच्या प्रयत्नावर चांगलीच आगपाखड केली असून, चौदा वर्षांपूर्वी न्यायालयात झालेल्या एका प्रकरणात समझौता करारानंतर ही फक्त, आकस बुद्धिने आपले राजकीय वजन वापरत ॲड.उके यांना त्यांच्या बंधूंसह पत्र परिषदेतून ज्या पद्धतीने उचलून नेऊन पोलिस ठाणे दाखविण्यात आले त्या, पडद्या मागील सूत्रधारां विरोधात उके यांनी आता उघडपणे रणसंग्राम छेडले असल्याचेच हे व्हायरल झालेले व्हिडीयो द्योतक आहे,असेच आता म्हणावे लागेल.

आमचे चॅनल subscribe करा