Homeनागपूर न्यूजजमीयत उलेमातर्फे गणतंत्र दिवस उत्साहात साजरा

जमीयत उलेमातर्फे गणतंत्र दिवस उत्साहात साजरा

Advertisements

नागपूर,ता.२७ जानेवारी २०२२: जमीयत उलेमा जिल्हा नागपूरतर्फे २६ जानेवरी देशाचा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
दर वर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहात झेंडा वंदनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यात जमीअत उलेमाच्या संपूर्ण जिल्हा प्रतिनिधी,पदाधिकारी व सहका-यांनी सहभाग नोंदवला.

जमीयत उलेमाचे नागपूर जिल्ह्याचे सचिव जावेद अख्तर अंसारी यांनी याप्रसंगी या दिवसाची महत्ता विशद केली.गणतंत्र दिवसाच्या उपस्थितांना शुभेच्छा प्रदान केल्या तसेच आभार मानले.

देशाचा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करुन उपस्थितांनी आपल्या देशप्रेमाची साक्ष दिली असल्याचे जावेद अख्तर अंसारी यांनी सांगितले.

Latest बातम्या