फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूज३१ जानेवारी पर्यंत शाळा बंदच

३१ जानेवारी पर्यंत शाळा बंदच

Advertisements

नागपूर दि.२७ जानेवारी २०२२ : जिल्ह्यामध्ये सतत वाढणारी बाधितांची संख्या लक्षात घेता पुढील ३१ जानेवारीपर्यंत ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या संदर्भात रात्री उशिरा माहिती दिली.

महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे सुचविले होते. नागपूर जिल्ह्यात दररोजची रुग्णसंख्या चार हजाराच्या घरात असून टक्केवारी ५० पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे सध्याच मुलांना शाळांमध्ये एकत्रित आणणे उचित ठरणार नाही. यासंदर्भात जिल्ह्याच्या कोरोनाविषयक टास्कफोर्सने देखील बाधितांची संख्या बघून निर्णय घेणे योग्य ठरेल असा अभिप्राय दिला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा ३१ जानेवारीला यासंदर्भातील आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या