

नागपूर, २१ डिसेंबर : नि:स्वार्थ परिवार हुडकेश्वर खुर्द द्वारे संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त स्वच्छता अभियान राबवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोबतच, गरीब गरजवंतांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. नि:स्वार्थचे संस्थापक सचिन घोड़े यांनी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभय भगत, सदस्य सिमा दिलीप काष्टे, माजी सैनिक राजू वैद्य, निःस्वार्थचे संयोजक गोपाल हटवार, संकेत घोडे, शुभम हटवार, सुरेंद्र वैद्य, हरीश बाळबुधे, दिलीप काष्टे, अमित भगत, विक्की धरमारे, प्रशांत घोडे, सौरभ भगत, मनोज चरडे, अनिकेत मेश्राम, करण चरडे, हर्षाली घोडे, लश्मण बाळबुधे, विनोद घोडे, आशिष भगत, रामकुमार वरखेडे, बबलू भगत, वामन बोबडे, देशपांडे काका इत्यादींचे सहकार्य लाभले.

आमचे चॅनल subscribe करा