

बनावट स्टँम्प पेपर प्रकरण
न्यायालयाकडून सदर पोलिसांना न्यायालयीन अवमाननेची नोटीस
नागपूर,ता. १६ डिसेंबर २०२१: पोलीस स्टेशन सदर येथील ॲड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या एका प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी नागपूर न्यायालयाने, न्यायालयाच्या पुढील तपासाच्या आदेशाचे पालन न केल्याने पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक आर. आर . महिपाळे यांना कोर्ट अवमानना अर्जावर नोटीस जारी करून उत्तर सदर करण्याचे आदेश जारी केले .
दि. ६ एिप्रल २००६ रोजी सतीश उके यांनी धरमदास रामाणी यांनी बनावट स्टॅम्प पेपर तयार करून वापरला याबाबत पोलीस उपायुक्त परी. क्र. २ आणि पोलीस स्टेशन सदर येथे तक्रार नोंदवली होती, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. परंतु धरमदास रामाणी यांनी त्यांचा साथीदार गुड्डू उर्फ अनिल गयाप्रसाद मिश्रा व तुषार दलाल यांच्या सोबत मिळून ॲड.. सतीश उके व इतर यांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात खंडणी मागिल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन सदर नागपूर येथे (अप. क्र. ४६३/२००७ प्रमाणे) दि. ११ डिसेंबर २००७ रोजी दाखल केला .
यात गुड्डू मिश्रा याने तो रामाणी करीता स्टॅम्प पेपर विक्री करतो असे बयान दिले , यावर गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे Cr.P.C. १६४ चे बयानही पोलिसांनी न्यायालयात नोंदवून घेतले होते . तपासात ही तक्रार खोटी असल्याचे दिसून आल्याने सदर पोलिसांनी “ब फायनल” न्यायालयात दाखल केले .
“ब फायनल” यात गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांच्या बयानाच्या आधारे तपास करण्याचे निर्देश मा. न्यायालयाने दिले . बयानाप्रमाणे गुड्डू मिश्रा याचा स्टॅम्प विक्रीचा परवाना याची माहिती ,मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर व नागपूर ग्रामीण यांनी मागितली असता, कोणताही परवाना त्यांना दिला नाही असे उत्तर मिळाले. यानंतर या प्रकरणात त्या बाबत कधी तपास करण्यात आला नाही व रामाणी व त्याचे साथीदार यांच्यावर बनावट स्टॅम्प बाबत व खोटी तक्रार दिल्याबाबत ही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
या प्रकरणात ॲड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या अर्जावर दि. ५ ऑक्टोर २०२० रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाकिधारी न्यायालयाने पोलीस स्टेशन सदर नागपूर यांना पुढील तपास करण्याचे आदेश दिले होते.
परंतु सदर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता व कसलाही तपास न करता दि. ८ डिसेंबर २०२० रोजी प्रकरण न्यायालयात परत केले. यावर न्यायालयाने त्यांच्यावर दि. ११ जानेवरी २०२१ रोजी कोर्ट अवमानना नोटीस काढली यावर न्यायालयात पीएसआय महिपाळे व पीआय देशमुख यांनी मा. न्यायालयास माफी मागितली आणि तपास करण्यास प्रकरण परत मागून घेतले .
त्यानंतर नवीन पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व उपनिरीक्षक महिपाळे यांनी पुढील तपास न करता व मुळ स्टॅम्प पेपरचा कायदेशीरपणे शोध न घेता आणि बनावट स्टॅम्प पेपरच्या टोळीला वाचवण्या करीता गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे Cr.P.C. १६४ चे बयानही, जे यापूर्वी पोलिसांनी न्यायालयात नोंदवून घेतले होते ते सुद्धा तपासात नाकारून, न्यायालयात खोटा अहवाल सादर केला .
याप्रमाणे मा. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे आणि मा. न्यायालयासच साक्षदारांनी Cr.P.C. १६४ चे बयान न्यायालयात नोंदवले नाही ,असे लिहून खोटे ठरविले.
असे अनेक गैरप्रकार करून न्यायालयाचा अवमान जाणीवपूर्वक केला , याचसोबत बनावट स्टॅम्प टोळीला वाचवण्या करीता खोटा अहवाल सादर करून भा. दं. वी. चे कलम २१७, २१८ ,२१९ आणि १२०-ब प्रमाणे अपराधिक कृत्य केले.
या पार्श्वभूमीवर, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी ॲड.सतीश उके यांनी न्यायालयात अर्ज सादर केला . यावर आज सुनावणी होऊन मा. न्यायालयाने पोलीस स्टेशन सदरचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना नोटीस काढून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

आमचे चॅनल subscribe करा