Homeनागपूर न्यूजनि:स्वार्थ फाऊंडेशनतर्फे बावनकुले यांचे अभिनंदन

नि:स्वार्थ फाऊंडेशनतर्फे बावनकुले यांचे अभिनंदन

Advertisements
Advertisements

नागपूर,ता. १६ डिसेंबर २०२१: निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन,हूड़केश्वर(खुर्द)तर्फे नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांचे अभिनंदन करण्यात आले.

निस्वार्थचे संस्थापक सचिन घोड़े व त्यांच्या चमूतर्फे आमदार चंद्रशेखर बावनकुले यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.

राजकारणात सदैव अग्रेसर असलेल्या बावणकुळे यांचा विधानपरिषदेवर झालेल्या दणदणीत विजयानंतर सचिन घोडे यांनी स्वत:च्या शब्दात काव्यरचना करीत बावणकुळे यांचे छायाचित्र असलेली फ्रेम त्यांना भेट म्हणून दिली.

यावेळी निःस्वार्थ संस्थेचे संयोजक गोपाल हटवार, शुभम हटवार, संकेत घोड़े, तुषार देशमुख, मयूर धरमारे, मनोज चरडे,दिलीप काष्टे,सौरभ भगत,वैभव हटवार आदि उपस्थित होते.

Latest बातम्या