Homeनागपूर न्यूजफडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी न्यायालयाकडून आरोप निश्चित

फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी न्यायालयाकडून आरोप निश्चित

Advertisements

फडणवीसांचे म्हणने ‘आरोप मान्य नाही’

नागपूर,ता. ४ डिसेंबर २०२१: दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघाच्या २०१४ सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेले दोन फौजदारी खटले याची माहिती लपवून ठेवली. याची तक्रार ॲड.सतीश उके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्यानंतर न्यायालयात केली होती.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. उके यांची तक्रार बरोबर असल्याचा निर्वाळा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर येथील न्यायालयाने प्रकरण पुढे चालवावे असे आदेश दिले.

देवेंद्र फडणीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपविलेले फौजदारी खटले हे दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षेच्या भारतीय दंड संहिताचे कलमाचे आहेत त्यामुळे ते कायद्याप्रमाणे फडणवीसांनी नमूद करणे आवश्यक होते. हे नमूद न केल्याने फडणवीसांनी कलम 125 – A of Representation of Peoples Act 1951 याप्रमाणे गुन्हा केला, अशी ॲड.उके यांची तक्रार बरोबर आहे , त्यामुळे या प्रकरणातवर पुढे खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालया समक्ष पुनर्विलोकन याचिका सुद्धा दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली . त्यानंतर फडणवीस यांनी नागपुर न्यायालया समक्ष हजर होऊन जामीन घेतला होता.

या प्रकरणात आता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक -३ नागपूर यांनी, आज तक्रारदार आणि आरोपी देवेंद्र फडणवीसांचे वकील यांच्या उपस्थितीत फडणवीसांच्या विरुद्ध आरोप निश्चित “चार्ज फ्रेम” केले. तसेच फडणवीस यांना हे आरोप आणि त्यातील कलम 125 – A of Representation of Peoples Act 1951 प्रमाणे केलेला गुन्हा कबुल आहे का? याची विचारणा केली.

यावर देवेंद्र फडणवीसांचे वकील ॲड. . उदय डबले यांनी फडणवीसांच्या वतीने “ हा गुन्हा कबुल नाही ”(नाॅट गिल्टी) म्हटले आणि तसे लिहून दिले तसेच फडणवीसांच्या वतीनेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे स्वाक्षरी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी Cr. P. C. चे कलम 205 अन्वये न्यायालयात हजेरी पासून सूट मागितली आणि त्यांच्या वतीने ॲड. . उदय डबले हे हजर राहतील आणि आरोप निश्चीतीला उत्तर देतील हा अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता , त्या अन्वये ॲड. उदय डबले यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वतीने ‘गुन्हा कबुल नाही’ हे न्यायालयास सांगितले .
.

कलम 125 – A of Representation of Peoples Act 1951 यात 6 महिने कैद किंवा 10,000/- रुपये दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे .

न्यायालयाने पुढील सुनावणी तारीख दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी ठेवली असून आरोपी देवेंद्र फडणवीस यांना, त्यांचे वकिल ॲड. उदय डबले यांनी आरोप योग्य रितीने समजावून सांगितले आहेत व ते त्यांना समजले आहेत आणि आरोप निश्चितीत त्यांच्या विरुद्ध कसलाही पुराग्रह झालेला नाही, याबाबत हमी (Undertaking ) न्यायालयात सादर करण्यास निर्देशित केले आहे.

आरोपी चे वकील अॅड. उदय डबले यांनी, त्यांनी आरोपी देवेंद्र फडणवीस यांना आरोप बरोबर समजावून सांगितले आहेत याबाबत‘लिखित स्वरुपात माहिती’ (‘पुर्सीस’)सादर करण्यास निर्देशित केले .

यासोबतच तक्रारदार ॲड.सतीश उके यांना साक्षीदारांची यादी नव्याने सादर करण्याचे आदेश दिले.

Latest बातम्या