Homeनागपूर न्यूजनागपूरच्या निवडणूक निर्णय अधिका-याविरुद्ध ॲड.उके यांची सदर पोलिस ठाण्यात तक्रार

नागपूरच्या निवडणूक निर्णय अधिका-याविरुद्ध ॲड.उके यांची सदर पोलिस ठाण्यात तक्रार

Advertisements

बावणकुळे यांच्या प्रतिज्ञापत्राची छानणी अयोग्यरितीने केल्याचा आरोप

प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयक अनेक महत्वपूर्ण त्रुटींकडे हेतुपुरस्सर केले दुर्लक्ष:उकेंचा दावा

निवडणूक निर्णय अधिका-याला निवडणूकीपासून दूर ठेवण्याची मागणी

नागपूर,ता. २८ नोव्हेंबर: नागपूर विधानसभा निवडणूक-२०२१ (स्थानिक स्वराज संस्था ) यात उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि. २२.११.२०२१ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक दोष इतके गंभीर आहेत कि त्या आधारावर सबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामांकन पत्र रद्द करणे गरजेचे होते, मात्र असे घडले नाही, या पुढे देखील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कलम १२५-ए लोकप्रतिनिधी कायदा यानुसार कारवाई होवू शकते आणि त्यांची निवडणूक रद्द होवू शकते. या करीता सबंधित निवडणूक निर्णय अधिकारी या फौजदारी कृत्य कलम १२९ Representation of Peoples Act , 1951 याप्रमाणे जबाबदार आहेत. सबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामांकनपत्र व संबंधित प्रतीज्ञापत्रातील अनेक बाबींची योग्य छाननी(scrutiny) न करता दुर्लक्षित केले असल्याची तक्रार आज ॲड.सतीश उके यांनी सदर पोलिस ठाण्यात केली.

आपल्या तक्रारीची एक प्रत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे.

प्रतिज्ञापत्रातील या मुद्दांवर उके यांनी नोंदवला आक्षेप-

१] स्तंभ क्र. ७ (ब) यात पान क्र. १५ यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या मालकीची अनु.क्र. १ वर लिहिलेली “सुरादेवी” येथील जमीन याचे ठिकाण ,स्थळ, मतदारांपासून लपविण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही तसेच ही जमीन स्वतःच्या नावाने ‘वारसाप्राप्त’ लिहिली असताना व ती स्वतः संपादित झाली असे असताना त्या संपादनाचा दिनांक “ निरंक” असा नमूद करुन ही माहिती लपवली. . पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीचे “बाबुळखेडा” येथील जमीनीचे ठिकाण, स्थळाचा उल्लेख न करता मतदारांपासून ही बाब लपवण्यासाठी त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही . पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीचे “सिंदी (उमरी) नरखेड ” येथील जमीन याचे ठिकाण स्थळ देखील मतदारांचे पासून लपवले तसेच तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा आजच्यास्थितीत असलेला बाजारभाव, किंमत लपवण्यासाठी त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही .

२] स्तंभ क्र. ७ (ब) यात पान क्र. १६ वर, पत्नी ज्योती बावनकुळे यांनी कोराडी ता. कामठी येथील सर्व्हे न. ३/१ ही शेत जमीन त्यांनी दि. ३०/०१/२०१९ रोजी त्यांची मुलगी पायल लो. आष्टणकर हिला बक्षिशपत्राद्वारे मालकी दिली असतांना ( हि बाब प्रतिज्ञापत्रात पान क्र. १७ वर नमुद्सुद्धा आहे) ती जमीन बावणकुळे यांच्या पत्नीच्या मालकीची राहिलेली नसतांना बावणकुळे यांनी आपल्या प्रतीज्ञापत्रात पत्नीच्या मालकीची दाखवून, तिची आज स्थितीतील किमत रुपये १८२७३९३७ हे पत्नीच्या नावाच्या संपतीत लिहिली .

३] स्तंभ क्र. ७ (ब) यात पान क्र. १९ वर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या मालकीची अनु.क्र. ३ वर लिहिलेली “मौजा महादुला, नगर पंचायत महादुला , घर क्र. १०२९/५” येथील जमीन/वाणिज्यिक इमारत याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्याकरीता त्या मालमत्तेचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही, तसेच ही जमीन स्वतःच्या नावाने ‘वारसाप्राप्त’ लिहिली असताना ती स्वतः संपादित झाली असे नमूद केले. त्याचा संपादनाचा दिनांक “ निरंक” असा नमूद केला ,ही माहिती मतदारांपासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव किमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही .

४] स्तंभ क्र. ७ (ब) यात पान क्र. १९ व २० वर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या मालकीची अनु.क्र. ३ वर लिहिलेली “मौजा महादुला, नगर पंचायत महादुला , घर क्र. ८१/२ ” येथील जमीन / वाणिज्यिक इमारत याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्या करीता त्या मालमत्तेचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही तसेच ही मालमत्ता “१९९४-१९९५” साली खरेदी केली, त्या खरेदीचा दिनांक न लिहिता ही माहिती लपविली.ही मालमत्ता किती मूल्यात खरेदी केली हे “ निरंक” लिहून ती माहिती मतदारांपासून लपवली . मतदारा पासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव किमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही.

५] स्तंभ क्र. ७ (ब) अनु. क्र. चार यात पान क्र. २१ यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेली “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २८(अ), घर क्र. ५०९ ” येथील जमीन याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही,ही माहिती मतदारांपासून लपवली . पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेली “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २८(अ), घर क्र. ५०९ ” येथील जमीन याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही,ही माहिती लपवली आणि ही संपत्ती ‘वारसाप्राप्त’ आहे काय यावर “निरंक” लिहिले आणि आणि खरेदीचा दिनांक सुद्धा “ निरंक” लिहिला.
याप्रमाणे आजस्थितीत रु. ५०७९२४८ किमतीची ही संपत्ती ज्योती बावनकुळे यांच्याकडे कशी आली आणि खरेदीचा दिनांक यासमोर सुद्धा “निरंक” लिहून ही माहिती लपवली . मतदारांपासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव किमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही.

६] स्तंभ क्र. ७ (ब) अनु. क्र. चार यात पान क्र. २१ यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेली “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २७(ई), घर क्र. ४८३ ” येथील जमीन याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्या करीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही, तसेच ही मालमत्ता वारसाप्राप्त आहे किवा कसे याबाबत “पुनर्वसन पट्टा” असे लिहिले परंतु तो संपदित केल्याचा दिनांक “ निरंक” असे लिहून ती माहिती लपवली. . पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेल्या “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २७(ई), घर क्र. ४८३ ” येथील जमीन याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही,ही माहिती लपवली आणि ही संपत्ती वारसाप्राप्त आहे काय यावर “निरंक” लिहिले आणि खरेदीचा दिनांक सुद्धा “ निरंक” लिहिला .याप्रमाणे आजस्थितीत रु. २३९४७६१ किमतीची ही संपत्ती ज्योती बावनकुळे यांच्याकडे कशी आली आणि खरेदीचा दिनांक यासमोर सुद्धा “निरंक” लिहून ही माहिती लपवली . मतदारांपासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव किंमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही.

७] स्तंभ क्र. ७ (ब) अनु. क्र. चार यात पान क्र. २१ यावर पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेल्या “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २४ सी, २५ सी , २६ सी . घर क्र. ५०८ ” येथील जमीनीचे ठिकाण स्थळ मतदारां पासून लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही,ही माहिती लपवली आणि ही संपत्ती प्लॉट क्र. ( २४ सी, २५ सी , २६ सी ) हे वेगवेगळे असतांना त्याचे क्षेत्रफळ वेगवेगळे लिहिले नाही , ही मालमत्ता वेगवेगळी असतांना त्याची माहिती वेगवेगळी लिहिली नाही. मतदारांपासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव किमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही.

८] स्तंभ क्र. ७ (ब) अनु. क्र. चार यात पान क्र. २३ यावर पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेल्या “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २८ अ, घर क्र. ५१० ” येथील जमीनीचे ठिकाण ,स्थळ मतदारांपासून लपविण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही,ही माहिती लपविली . मतदारां पासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव, किंमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही.

९] स्तंभ क्र. ७ (ब) अनु. क्र. चार यात पान क्र. २३ यावर पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या मालकीच्या निवासी संपत्ती वर लिहिलेल्या “मौजा कोराडी, प्लॉट क्र. २८ अ, घर क्र. ५११ ” येथील जमीन याचे ठिकाण स्थळ मतदारांपासून लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही,ही माहिती लपवली . मतदारांपासून तेथील जमिनीवर किती किमतीची मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा आजस्थितीत असलेला बाजारभाव, किंमत लपवण्याकरीता त्या जमिनीचा तालुका आणि जिल्हा लिहिला नाही.

१०] या व्यतिरिक्त पान क्र. स्तंभ ९ यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या व्यवसाय किवा नोकरीचा तपशील यात स्वतः करिता केवळ “ शेती “ नमूद केले आहे परंतु स्तंभ क्र. ७ (ब) यात पान क्र. १९ वर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या मालकीच्या अनु.क्र. ३ वर लिहिलेल्या “मौजा महादुला, नगर पंचायत महादुला , घर क्र. १०२९/५” येथील जमीन/वाणिज्यिक इमारत व “मौजा महादुला, नगर पंचायत महादुला , घर क्र. ८१/२ ” येथील जमीन / वाणिज्यिक इमारत यात ‘चालत असलेला व्यवसाय ’या बाबत माहिती दिली नाही .

तसेच स्तंभ ९-अ यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतरांच्या नावाने जनप्रतिनिधी व मंत्री असतांना, गैरकायदेशीर प्रभावाने, भ्रष्ट गुन्हेगारी कृत्याच्या माध्यमाने केलेले उद्योग व या कमाईने जमविलेली शेकडो कोटींचे बेनामी संपत्ती , व्यवसाय यांची देखील माहिती यात नमूद केली नाही .

वरील माहिती, नामांकनपत्र व प्रतिज्ञापत्र स्वीकारतांना, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नमूद करून घेणे व ते दोष दर्शविणे आणि मुदतीपूर्वी त्याची पूर्तता करून घेणे याची जबाबदारी आणि त्यानंतर नामांकनपत्राच्या छाननित (scrutiny) या मुद्दांवर कारवाई करणे गरजेचे होते .

परंतु तसे न केल्याने सबंधित निवडणूक निर्णय अधिकारी या फौजदारी कृत्य कलम १२९ Representation of Peoples Act , 1951 याप्रमाणे जबाबदार आहेत आणि हे कलम दखलपात्र आहे या करीता त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तक्रार सदर पोलिस ठाण्यात ॲड.उके यांनी नोंदवली.

यासोबतच मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना देखील सबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना ,विधान परिषदेच्या या निवडणुकीत बदलण्यात यावे व त्यांच्यावर प्रशसकीय कारवाई करण्याची मागणी करत निवेदन सादर केले.

Latest बातम्या