फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगडकरी रमले शनिशक्तिपीठात: आर्यभट ॲस्ट्रोनॉमी पार्कचेही केले कौतूक

गडकरी रमले शनिशक्तिपीठात: आर्यभट ॲस्ट्रोनॉमी पार्कचेही केले कौतूक

Advertisements

नागपूर,ता.११ नोव्हेंबर: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढत त्यांच्यातील भाविक स्वभावाप्रमाणे, मध्य भारतातील अध्यात्मिक पर्यटनस्थळ म्हणून जलद् गतीने विकसित होऊ पाहणा-या श्रीक्षेत्र चक्रवर्ती नगरी,चौकी,कानोलीबारा,हिंगणा येथील श्री शनि शक्तिपीठाला नुकतीच भेट दिली.

याच ठिकाणी निर्मित आर्यभट ॲस्ट्रोनॉमी पार्कचेही त्यांनी काैतूक केले.संपूर्णत: निसर्गाच्या सानिध्यात असणा-या व तिन्ही बाजूने हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या ठिकाणी, उभारण्यात आलेल्या या भव्य अध्यात्मिक वास्तू बघून ते विशेष प्रभावित झाले. ओंकांरेश्‍वर ज्योतिष अखाडाद्वारे संचालित श्री शनिशक्तिपीठ तसेच ॲस्ट्रोनॉमी पार्कसाठी याच जागेची निवड का केली,असा प्रश्‍न त्यांनी संचालक आचार्य भूपेश घाडगे यांना केला व या वास्तूचे महत्व जाणून घेतले.

भारताची मूळ अशी वैदिक परंपरा येणा-या पिढीला कळावी यासाठी आर्यभट पार्कची निर्मिती केली असल्याचे भूपेश घाडगे यांनी सांगितले.या वास्तूला भौगोलिक,पारंपारिक, ऐतिहासिक तसेच ज्योतिषशास्त्रदृष्टया विशेष महत्व असल्याचे घाडगे सांगतात.या वास्तूत वर्तुळाकार,वृत्ताकार व षडचक्राकार यंत्रांची स्थापना करण्यात आली असून अश्‍या वास्तूमध्येच श्री शनिदेवाच्या मंदिरांची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा वेदांमध्ये अधोरेखित आहे.

या वास्तूचे महत्व गडकरी यांना विशद करताना घाडगे यांनी सांगितले, की स्कंध पुराणात या जागेला विशेष महत्व आहे.याच ठिकाणी पांडवकालीन देशातील दुस-या क्रमांकाचे गुरु बृहस्पतीचे मंदिर आहे.या परिसराला पौराणिक काळात ‘चक्रवर्ती नगरी’असे संबोधले जात होते.

ही वास्तू भारतातून जाणा-या रेखांश आणि अक्षांशाचा मध्य साधते त्यामुळेच हे स्थान ॲस्ट्रोनॉमीसाठी महत्वाचे ठरते.

हा संपूर्ण अध्यात्मिक परिसर बघून प्रभावित झालेले गडकरी यांनी आचार्य भूपेश घाडगे यांना या वास्तूबाबत पुढील संकल्पना आणखी कोणत्या आहेत,असा प्रश्‍न विचारला,यावर भारतीय ज्योतिषशास्त्राच्या आधारे अचूक तिथी,वार,नक्षत्र, योग,करण, असे आर्यभट काळातील वैज्ञानिक कालगणनेचे साधन जगापुढे यावेत या उद्देशाने, तसेच नवीन पिढीला ज्योतिष व विज्ञान यांची अभूतपूर्व सांगड कळावी म्हणून या यंत्रांची लवकरच स्थापना येत्या काळात करण्यात येणार असल्याची माहिती घाडगे यांनी दिली.

याप्रसंगी गडकरी यांनी श्री शनिदेवाची आस्थेेने पूजाअर्चनाही केली.गडकरी यांच्यासोबत आमदार समीर मेघे,माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळेेेे हे देखील उपस्थित होते.याप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्य अभियंता उपाध्येय यांची देखील उपस्थिती होती.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आचार्य पूजा घाडगे,रामदास फूलझले महाराज,रमेश मिश्रा,देवेंद्र डायरे,सचिन हांडे यांनी अथक परिश्रम घेतले.

गडकरी यांच्या हस्ते ‘सूर्य घड्याळाचे’उद् घाटन-
यावेळी गडकरी यांच्या हस्ते या पवित्र वास्तूमध्ये स्थापित करण्यात आलेल्या सूर्य घड्याळाचे(सन डायल)चे उद् घाटन करण्यात आले.सूर्याच्या प्रतिबिंबाच्या आधारे अचूक वेळ सांगणारी मध्य भारतातील ही पहीली अशी घड्याळ आहे.श्री शनिशक्तिपीठ,आर्यभट ॲस्ट्रोनॉमी पार्क तसेच अचूक वेळ दर्शवणारे सूर्य घड्याळ यामुळे हे क्षेत्र लवकरच मध्य भारतातील पर्यटनासाठी प्रसिद्ध होणार असल्याचा विश्‍वास घाडगे यांनी गडकरी यांच्याकडे व्यक्त केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या