
बॉलिवूड तारकांची देखील राहणार उपस्थिती
नागपूर,ता. २९ ऑक्टोबर: ‘हैलोवीन’हा एक उत्सव आहे जो दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.विशेष करुन हा सण पाश्चात्य देशात खूप उत्साहात साजरा केला जात असतो मात्र हा सण किवा उत्सव एखाद्या ‘ विनोदी किवा हास्यप्रकारात’ साजरा होत असतो.हा सण इंग्लंड,न्यूजीलैंड,ऑस्ट्रेलिया,कनाडा तसेच भारताच्या काही भागात साजरा केला जातो.हेलोवीनचा अर्थ आहे पवित्र करणे,पूर्ण विश्वाला स्वच्छ आणि स्वस्थ ठेवणे असा याचा अर्थ असून हा सण संपूर्ण रात्रभर साजरा केला जात असतो.आता उपराजधानी नागपूरात देखील पहील्यांदा हेलोवीन पार्टीचे आयोजन रविवार,दि.३१ ऑक्टोबर रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १२ वा.दरम्यान करण्यात आले आहे.
पत्र परिषदेत हेलोवीन पार्टीची आयोजक भूमिका सिन्हा यांनी उपरोक्त माहिती दिली.ही पार्टी नागपूरकर तरुणाईसाठी नवीन आहे मात्र पुणे,मुंबई सारख्या शहरात दर वर्षी अशी पार्टी या तारखेला आयोजित केली जाते ज्यात तरुणाई ही हास्य विनोदाच्या थीममध्ये मनसोक्त आनंद घेत असते.नागपूरात आयोजित पार्टीमध्ये देखील ‘हॉरर’थीम घेण्यात आली असल्याचे भूमिका यांनी सांगितले.
या पार्टीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १५९९ रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. पत्र-परिषदेला गोकूल सहारे उपस्थित होते.
बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती-
चित्रपटसृष्टितील सुप्रसिद्ध निर्माते पहलाज निहलानी यांची या पार्टीत विशेष उपस्थिती राहणार अाहे.यावेळी ते त्यांच्या आगामी चित्रपटातील दोन नवीन चेहरे उपस्थितांसमोर उघड करणार आहे.याशिवाय श्वेता सिन्हा,सोनी सिंग,नमीता शाह,कवंलजित सिंग या लोकप्रिय विभूतींची देखील उपस्थिती राहणार असल्याचे भूमिका यांनी सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा