
स्मार्ट सिटी ऑपरेशन केंद्राचा असा ही महिमा
नागपूर पाेलिसांचा ‘तिसरा डोळाच’
अनेक गुन्ह्यांची उकल: वाहतूक नियम मोडणा-यांवर वचक
नागपूर,ता. २९ सप्टेंबर २०२१: मनपा मुख्यालयातील सहाव्या मजल्यावरील ‘अटलबिहारी बाजपेयी स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर’हे अलीबाबाच्या गुहेप्रमाणेच अद् भूत,अनाकलनीय व गूढ असं भासतं.या कक्षातील भल्या मोठ्या स्क्रीनवर नागपूर शहराच्या एकूण ७०० चौकात लावण्यात आलेल्या ३६०० कॅम-यांवरील दृष्य उमटतात तेव्हा नजर एका ही दृष्यावर स्थिर ठेवणे अवघड होऊन बसतं मात्र या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलिस व वाहतूक पोलिसांची चमू यांची तीक्ष्ण नजर, ही एक क्षण ही स्क्रीनवरुन हटत नाही,त्या ठिकाणी बसल्या बसल्याच लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला सुचनाही जातात,वाहतूक नियम मोडणा-यांना ई-चालानाची ‘भेट’देखील लगेच पाठवली जाते तर अपघात,गुन्हेगारीवर देखील वचक ठेवण्याचे अतिशय कौतूकास्पद काम हे स्मार्ट सिटी ऑपरेशन केंद्र करीत आहे.
या कक्षात आज पत्रकारांची सदिच्छा भेट आयोजित करण्यात आली होती.यावेळी नागपूर स्मार्ट सिटीचेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे मुख्य व्यवस्थापक डॉ.शील घुले यांनी या कक्षातील संपूर्ण यंत्रणेची माहिती पत्रकारांना करुन दिली.गुन्हेगारी जगतातील काही थरारक अनुभव देखील त्यांनी सांगितले.यात एका सिग्नलवर थांबलेल्या शहरातील नामचीन गुडांना स्मार्ट सिटी केंद्रवरील कर्तव्यावर असणा-या पोलिस अधिका-याने लगेच ओळखल्याने पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत सूचित करण्यात आले.त्यांच्या वाहनांच्या क्रमांकासह ते शहरातील अनेक चौकात पोलिसांच्या तिस-या डोळ्याच्या ‘रडार’वर आलेत आणि अवघ्या ४ तासात ते पोलिस ठाण्याच्या सळाखींमागे होते!
सीसीटीव्ही कॅम-यांमध्ये कैद होणारे अपघात मात्र वाहनचालकांच्या अतिशय रॅश ड्रायव्हिंग,निष्काळजीपणा,वाहतूक नियमांचे पालन न करणे व राँग साईडने वाहन दामटणे यामुळे घडले आहेत .अनेक जीव वाचवता आले असते,घरी कुटुंबिय डोळ्यात प्राण आणून आपल्या माणसाची वाट पाहात असतात मात्र नागपूर शहरातील अनेक वाहनचालकांच्या ‘अती मस्ती’मुळे अनेक जीव हकनाक वाहनाच्या चाकांखाली बळी पडलेल्याचा घटनाही या कॅम-यांनी अचूक टिपले.
गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारे,मोबाईल हिसकावणारे,महिलांच्या हातातील बॅग हिसकावून पळणारे,ट्रिपल सीट दूचाकी भर रस्त्यांवर विना हेलमेट दामटणे अश्या किती तरी घटनांवर या कक्षातील स्मार्ट कॅम-यांची स्मार्ट नजर असते.पोलिस विभाग या सुविधेचा पूरेपूर वापर करतोय आणि गुन्हेगारांना जेरबंद करतोय.

एवढंच नव्हे तर झेब्रा क्रॉसिंगच्या समोर वाहने उभी करने,सिग्नल तोडून वाहन दामटणे,विमा हेलमेट वाहन चालवणे,नो पार्किंगमध्ये वाहने लावणे अश्या सर्व कायदेशीर गुन्हयांवर देखील वाहतूक शाखेच्या दहा झोनच्या दहा पोलिसकर्मींची दक्ष नजर असते.स्क्रीनवर दृष्य उमटताच,आपल्या समोरील लॅपटॉपवर त्या वाहनांचा क्रमांकाचा पाठपुरावा करुन लगेच वाहतूक नियम मोडणा-या नागपूरकरांना ई-चालानची भेट पाठवली जाते.
डॉ.घुले यांनी सांगितल्याप्रमाणे नागपूर शहरावर फक्त ३६०० कॅम-यांनीच नव्हे तर ५ ड्रोन्स व मोबाईल सर्विलेंस व्हॅन(एमएसवी)च्या माध्यमातून देखील २४ तास नजर ठेवली जाते.त्यामुळे रात्रीच्या अंधारात जिथे उजेडाची थोडी जरी तिरीप मिळाली तरी गडद अंधारात देखील घटनास्थळांवरील वाहनांचा क्रमांक स्क्रीनवर उमटतो.
या कक्षाला भेट दिल्यावर स्वत: पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच माजी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्येय यांनी देखील या कक्षामुळे पोलिस दलाला अतिशय महत्वाचे बळ मिळाले असल्याची स्तुती केली आहे.
विशेष म्हणजे या सर्व सीसीटीव्ही फूटेज १५ दिवस साठवून ठेवण्याची क्षमता या यंत्रणेमध्ये आहे तसेच दर एका तासाने रिपोर्ट देखील मिळत असते.यावेळी पीएसआय उमाकांत राठोड यांनी स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष व पोलिस यंत्रणा यांच्याविषयी माहिती दिली.
केबल कट हीच एक डोकेदुखी-
नागपूर शहरात सतत कुठे ना कुठे खोदकाम सुरु असतं.यात ओसीडब्ल्यू,खासगी कंत्राटदार,मेट्रो,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,विज वितरण विभाग इ.द्वारे रस्त्यांचे खोदकाम करताना अनेकवेळा स्मार्ट सिटी नियंत्रण कक्षाचे फायबर कापले जातात अश्यावेळी त्या ठिकाणचे २५० ते ३०० कॅमरे हे एकसाथ बंद होतात.नुकतेच रविनगर येथील खाेदकामात फायबर कापल्या जाणार असल्याने कॅमरे काढून ठेवण्याचे निवेदन खोदकाम करणा-यांतर्फे करण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती वगळता ज्या विभागांकडून खोदकाम करताना फायबर कापले जातात, नियमानुसार त्याच विभागाकडून नुकसान भरपाई करुन घेतली जाते,असे डॉ.घुले यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
