Homeनागपूर न्यूजभाजप नेत्याचे एकीकडे मंदिर उघडा ‘आंदोलन ’ दूसरीकडे ताजबाग ‘दर्शन!'

भाजप नेत्याचे एकीकडे मंदिर उघडा ‘आंदोलन ’ दूसरीकडे ताजबाग ‘दर्शन!’

Advertisements

विचारधारा एक: आचरण विरोधाभासी!

समाज माध्यमांवर उठली टिकेची झोड

नागपूर,ता. १७ सप्टेंबर: विश्‍व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात आज मेडीकल चौकातील राजाबक्षा हनुमान मंदिराच्या प्रांगणात आघाडी सरकारच्या मंदिराबाबतच्या ध्येय-धोरणांवर प्रहार करीत ‘मंदिर उघडा’आंदोलन करण्यात आले मात्र त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी आज  हजरत सैय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन दरगाह शरीफवर, राष्ट्रीय सतसंगाचे अध्यक्ष् पद्मश्री मुमताज अली खान यांच्यासोबत श्रद्धा आणि भक्तीभावाची चादर चढवली,एकीकडे विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल हे मंदिरे उघडा म्हणून आंदोलन करतात तर दूसरीकडे भाजप आमदार हे आघाडी सरकारचा ‘सर्वच धार्मिकस्थळे बंद म्हणजे बंदच‘हा आदेश असतानासुद्धा दरगाहवर चादर चढवतात ,दर्शन घेतात याबाबत चांगलेच आश्‍चर्य व्यक्त केले जात होते.

‘पार्टी विथ डिफरेन्स’असे ब्रिदवाक्य मिरवणा-या मात्र प्रत्यक्षात ‘कथनी व करनी’ मध्ये पराकोटीची विसंगत वर्तवणूक असणा-या भाजप पक्ष् व या पक्षातील काही नेत्यांबाबत समाज माध्यमात त्यामुळेच तीव्र प्रतिक्रिया उेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेमटली .विचारधारेची समानता यावरुन विश्‍व हिंदू परिषद तसेच बजरंग दल या संघटना भारतीय जनता पक्ष्ाच्याच उपशाखा मानल्या जातात.एवढंच नव्हे तर भाजपला केंद्रात सत्ताधारी होण्यास याच संघटनांचा महत्वपूर्ण वाटा होता मात्र आज याच संघटना जणू निर्भेळ बहूमत मिळाले असल्याने भाजपसाठी ‘महत्वहीन’झाल्या असून संघ विचारधारेचे मूळ उगमस्थान असणा-या शहरात म्हणूनच आज नागपूरकरांना एकाच विचारधारेच्या दोन नेत्यांच्या दोन वगेळ्या ‘त-हा’अनुभवयाला मिळाल्या.

करोना प्रादुर्भावाच्या संभावित तिस-या लाटेच्या सांशकतेने अद्याप आघाडी सरकारने कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्थळांना भाविकांसाठी उघडण्याची परवानगी दिली नाही मात्र बाबा ताजुद्दीन दरगाहाचे दर्शन भाजप आमदार मोहन मते यांना सहज सुलभ कसे?असा प्रश्‍न विचारला जात असून याचा अर्थ महाराष्ट्राच्या उपराजधानीत फक्त मंदिरांवरच निर्बंध आहेत का?इतर धर्माची धार्मिक स्थळे ही राजरोसपणे उघडी आहेत का?अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे.

नुकतेच भाजपतर्फे मंदिर उघडण्यासाठी साखळी आंदोलनही पार पडले मात्र आज भर पावसात या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पावसापासून बचावासाठी मंदिर परिसरात देखील आश्रय घेऊ देण्यात आला नाही,त्यामुळे परिसराबाहेरच आंदोलनकर्त्यांची हनुमतांची चौपाई,स्तुती सुमने,महाआरती इ.सर्व काही बंद प्रवेशद्वाराच्या बाहेर पार पाडले दूसरीकडे भाजप आमदार हे मात्र बाबा ताजुद्दीन यांच्या दरगाहवर अगदी ‘नतमस्तक‘झालेले दृष्य उमटले होते.

एकीकडे हिंदूत्व आणि धर्म रक्ष् णाच्या बाबीवर २ वरुन ३०० पल्याड संसदेत संख्याबळ झाले असताना आचरण मात्र ‘काँग्रेसीच’असल्याची बोचरी टिका ही भाजप आमदारवर उमटली होती.

पंधरवाड्यात येऊन ठेपलेला नवरात्र उत्सव हा शक्तीची देवता माँ दूर्गा यांच्या प्रत्यक्ष् दर्शनानेच साजरा करता यावा व मंदिरांच्या प्रांगणात दरवर्षी तेवणा-या देदिप्यमान अखंड ज्याेतची आराधना गेल्या वर्षी करोना महामारीच्या प्रकोपामुळे शक्य झाली नसल्याने निदान या वर्षी तरी तो नवस ती उर्जा चूकू नये यासाठी हिंदू भाविक हा कासाविस झाला असताना दूसरीकडे मंदिरांसाठी आंदोलन करणा-या भाजप पक्ष्ाचाच आमदार मंदिरे बंद असताना बाबा ताजुद्दीन यांच्या दरगाहाचे प्रत्यक्ष् दर्शन घेतानाची घटना ही प्रखर हिंदूत्वावादी संघटनांना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आज चांगलीच जिव्हारी लागली.

एकीकडे आघाडी सरकारला ‘तिघाडी मोगलाई‘सरकार म्हणून वांझोटी टिका करायची दूसरीकडे
हिंदूंची मंदिरे सरकारी बरहूकूमप्रमाणे बंद असताना इतर धार्मिक स्थळांचे श्रद्धापूर्वक ‘दर्शन’घ्यायचे,यावरुन भाजप पक्ष्ाची ’विचारधारा’केंद्रात सत्तेवर आरुढ होताच कोणत्या दिशेने भरकटली आहे,यावर देखील बरीच टिका आज सेेेेेेेेेेेेेेेेेेमाजमाध्यमावर उमटली होती.

Latest बातम्या