

शिक्षक संस्था महामंडळाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन
नागपूर, ११ सप्टेंबर: केंद्रीय प्रवेश पद्धती कॅपद्वारे सध्या अकरावीचे प्रवेश सुरू असून अनेक अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अद्याप २० प्रवेशदेखील झाले नाहीत. विद्यार्थी प्रवेश कमी झाल्यास शिक्षकांची नियुक्ती करणे शाळा व्यवस्थापनाला अडचणीचे जाणार आहेत.
त्यामुळे नागपूर शहरातील सुमारे २५ अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
ज्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशाअभावी शिक्षक अतिरिक्त ठरत असतील किवा त्यांच्या तुकडया कमी होत असतील किवा त्यांचे अनुदान कमी करण्यात येत असेल किंवा शिक्षक कपात लावण्यात आली असेल, अशा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह त्वरित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे विभागीय सचिवाच्या नावाने विनंतीपत्र तयार करून ते मुख्याध्यापकांनी गुरुवार दि. १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत शालेय कामकाजाच्या वेळेत हिंदू मुलींची शाळा, गांधीगेट, महाल, नागपूर येथे आणून दयावे.
त्यावर योग्य तो विचार करून पुढील प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष किशोर मासुरकर आणि म.रा. शिक्षण संस्था महामंडळाचे रविंद्र फडणविस यांनी दिले आहे. अधिक माहितीकरिता 9422104067 किंवा 7767988667 या क्रमांकावर संपर्क साधावा.




आमचे चॅनल subscribe करा
