फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकंत्राटदाराची मनमानी, अधिकाऱ्याला न जुमानता सुरू केले काम !

कंत्राटदाराची मनमानी, अधिकाऱ्याला न जुमानता सुरू केले काम !

Advertisements

नागपूर,ता.३ सप्टेंबर: गोपाल नगर मुख्य रस्त्यावरच असलेल्या भाजप नगरसेवकाचे आधी अतिक्रमण काढा मगच रस्त्याच्या कामाला सुरवात करा अशी लिखित निवेदने संबधित यंत्रणांना देऊनसुद्धा नगरसेवकाच्या अतिक्रणाला हात ही न लावता कंत्राटदाराााने काम सुरु केल्याने नागरिकांचा संताप झाला व सर्वांनी एकत्रित येऊन कंत्राटदाराला काम बंद करण्यात भाग पाडले.

याशिवाय सिमेंट रस्ता बनवितांना १.३० ते २ फूट खोदून रस्त्याचे काम करा जेणेकरून जनतेच्या घरात पाणी घुसणार नाही अशी येथील स्थानिक नागरिकांनी मागणी महापालिकेचे आयुक्त, कार्यकारी अभियंता व लक्ष्मी नगर झोन मधील आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांच्या या मागण्या मान्य करत येथील जनतेला, आधी अतिक्रमण काढू नंतरच काम सुरू करू असे आश्वासन देत झोन आयुक्त व संबंधित अभियंता यांनी कंत्राटदाराला अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरू करण्याची ताकीत दिली होती.
तरी देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना

न जुमानता कंत्राटदाराने रस्त्याचे खोदकाम सुरू केले. ही बातमी येथील स्थानिक नागरिकांना मिळताच सर्वे नागरिक पडोळे चौक येथे पोहोचले व कंत्राटदाराला काम बंद करण्यास भाग पाडले. कंत्राटदाराने आपला मोर्चा माटे चौकाकडे वळविला असतांना सर्व नागरिक माटे चौकात जमा झाले व आधी रस्त्याच्या मधात येणारे नगरसेवकाचे अतिक्रमण काढा व नंतरच काम सुरू करा अशी मागणी करत तेथील काम देखील कंत्राटदाराला काम बंद करण्यास भाग पाडले.

घटनेची माहिती मिळताच राणाप्रताप नगर पोलीस स्टेशनचे पोलीस व प्रभाग ३७ चे कार्यकारी अभियंता घटना स्थळी पोहोचले. कंत्राटदाराने आम्हाला कुठलीही माहिती न देता काम सुरू केले होते, पण आता नगरसेवकाचे अतिक्रमण काढल्यावरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येथील अशी येथील स्थानिक नागरिकांना त्यांनी ग्वाही दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या