

नागपूर,ता. ३ सप्टेंबर २०२१: मानवी सेवेचं व्रत घेऊन नि:शुल्क जयपुर फुट शिबिराचे आयोजन समाधा आश्रम नागपूरतर्फे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान समाधा आश्रम,जरीपटका येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे हे चौथे वर्ष असल्याचेे संयोजक चंद्रकुमार टेकचंदानी यांनी पत्रकार भवनाज आयोजित पत्र-परिषदेत सांगितले.
या शिबिराचा लाभ वैदर्भियांसोबतच छत्तीसगढ,राजसस्थान इ.राज्यातील लाभार्थी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत साढे तीनशेपेक्ष्ा अधिक लाथार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला असून ज्यांना पाय नाहीत किवा एकच पाय आहे त्यांना शिबिरादरम्यान डॉक्टर्स लाेकांची तज्ज्ञ चमू संपूर्ण मोजमाप करुन त्यांना कृत्रिम पाय बसवून देत असतात.हे कृत्रिम पाय याच ठिकाणी कार्यशाळेत तयार केले जातात.याशिवाय त्यांना बैसाखी,बूटे इ.साहित्य देखील नि:शुल्क दिली जातात.
अगदी शेवटच्या क्ष् णी देखील कोणी गरजू शिबिरात येतो त्याला देखील परत पाठवले जात नसल्याचे टेकचंदानी यांनी सांगितले.
शिबिरात १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ४ वा.दरम्यान, जयपुरचे तज्ज्ञ डॉक्टर्स हे लाभार्थींच्या पायाचे माप घेतील तर १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायं.५ वा.दरम्यान ते कृत्रिम अंगाची तपासणी करतील यानंतर सायंकाळी ६ ते ८ वा.दरम्यान या कृत्रिम अंगांचे वितरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१९ ता.वितरण सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहतील तर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे देखील शिबिराला त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार भेट देणार असल्याचे टेकचंदानी यांनी सांगितले.
बाहेर गावावरुन येणा-या लाभार्थींच्या राहण्या व जेवनाची नि:शुल्क व्यवस्था समाधा आश्रमतर्फेच करण्यात आली आहे मात्र येण्या-जाण्याचा खर्च हा लाभार्थींनाच करावा लागेल,असे ते म्हणाले.
लाभार्थींनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड सोबत आणावा,असे आवाहन त्यांनी केले.कृत्रिम पायासाेबतच हल्के आणि टिकाऊ कृत्रिम अंगांचे देखील वाटप शिबिरात केले जाईल.पोलियोग्रस्त लोकांसाठी केपिलर्स व बुट दिले जातील,या शिवाय बैसाख्या व स्पलिंट्स याचे देखील नि:शुल्क वाटप होईल.
नोंदणीसाठी हिरालाल ९०७५५७६८६१, अधिक माहितीसाठी दिलीप हेमराजानी ९०२१७२८९४९ तसेच दर्शन ठारवानी ९७६६५४६४२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पत्र परिषदेत सह-संयोजक सच्चानंद केवलरामानी,राजू हरवानी आदी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा