फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकाँग्रेसचे युवा कार्यकर्ते आंदोलनस्थळाऐवजी पोलिस ठाण्यात!

काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आंदोलनस्थळाऐवजी पोलिस ठाण्यात!

Advertisements

प्रभागातील समस्यांमुळे महापौरांचा करणार होते घेराव

नागपूर, २३ आॅगस्ट २०२१ :सध्या नागपूरात गंगा-जमुना परिसरातील आंदोलने जोरदार गाजत आहेत,आंदोलन करुन आपल्या मागण्यांकडे शासन,प्रशासनाचे लक्ष् वेधणे हा नागरिकांचा,राजकीय पक्ष्ांचा संवैधानिक अधिकार आहे,अशी समजूत कायम आहे मात्र आज सोमवार रोजी नागपूर महानगरपालिका मुख्यालयात प्रभाग-४ च्या नागरिकांच्यावतीने युवा काँग्रेसच्या नेतृत्वात, महापौरांना निवेदन व घेरावची घोषणा काल करण्यात आली होती,यासाठी सकाळी ११ वाजताची वेळ ही निर्धारित करण्यात आली होती मात्र आंदोलनकर्त्यांचे ‘आगमन आणि प्रस्थान ’आंदोलनस्थळी होण्या ऐवजी चक्क यशोधरा पोलिस ठाण्यात झाले!

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात महापौर दयाशंकर तिवारी यांचा घेराव करण्यात येणार होता तत्पूर्वीच ‘फोनाफाेनी’ झाल्यामुळे यशोधरा पोलिस ठाण्यातील पोसिलांनी आंदोलकांच्या मुख्य कार्यकर्त्यांची उचलबांगडी पोलिस ठाण्यात केली!

याबाबत आंदोलनापूर्वी तुम्ही यशोधरा नगर पोलिस ठाण्याची परवानगीच घेतली नसल्याचे कारण पोलिसांनी त्यांना सांगितले.आंदोलक म्हणाले,तुमची परवानगी का?मनपा मुख्यालय तर दुस-या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं?यावर यशोधरा पोलिस ठाण्यातील पोलिसांचे उत्तर होते ‘तुम्ही आमच्या हद्दीतून घेराव घालण्यास जात आहात म्हणून!’

आजवर महापौर आणि भाजपने मनपात काँगेसची सत्ता असताना नाही केलीत का आंदोलने?असा प्रश्‍न बाबू खान, अध्यक्ष उत्तर नागपुर कांग्रेस कमेटी (अल्पसंख्यक विभाग) विचारतात!काँग्रेसने हेच केले होते का तुमच्यासोबत?या प्रभागात रस्तेच नाही आहेत,आहे तो नुसता चिखल,घाण,डेंग्यूमुळे तरुण मुलगा मेयोमध्ये भरती आहे,त्याच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरच सांगतात,प्रभागातील अर्धे नागरिक आजारी आहेत,५ महिन्यापूर्वीच प्रभागातील अल्ताफ भाई यांची मुलगी साप चावल्याने दगावली,भयंकर समस्या आहेत,स्मार्ट सिटीचे स्मार्ट नगरसेवक सांगतात हा प्रभाग नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येतो,आम्ही का बनवावे रस्ते?

(छायाचित्र-डेंग्यूमुळे मृत्यूच्या दारावर पोहोचलेला या प्रभागातील तरुण)

महापौर सांगतात घाण स्वच्छ करवून देतो,डेंग्यूची फव्वारणी करायला सांगतो पण तुमच्या प्रभागात रस्ते आम्ही बनवणार नाही!मग दाद मागायची कुठे?चारही ले-आऊ्टस पैकी एका ले-आऊटमध्ये एका कंत्राटदाराने किमान एक कच्चा रस्ता नागरिकांसाठी बांधून दिला पण उर्वरित ३ ले-आऊट्सची दशा तर अतिशय भीषण आहे,महापौर,स्थायी समितीकडे आमच्या प्रभागात रस्ते बांधायला पैसे नाहीत मग आम्ही घेराव नाही करणार तर काय करणार?

कच्चा रस्ता असल्याने पाण्याचे डबके तयार झाले आहेत,ज्यातुन मार्ग काढताना परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्याच प्रमाणे येथील नागरिकांची मागील अनेक दिवसा पासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन बसविण्याची मागणी आहे, ज्याकडे मनपा प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. येथील नागरिकांना टँकरवर निर्भर राहावं लागत आहे. तसेच या प्रभागात खाली असलेल्या भुखंडावर पाण्याचे कृत्रिम डबके तयार झाले आहेत. ज्यामुळे डांसाचा प्रकोप वाढला आहे. रहिवासी क्षेत्र असल्याने नागरिकांनमध्ये डेंगूची भीती निर्माण झाली आहे. या परिसरात डेंगूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. प्रभागात स्वछता राखण्याकरिता व डेंगूचा प्रकोप वाढणार नाही ही दक्षता घेण्याच्या मागणीसाठी महापौरांचा घेराव करण्याचे ठरले होते!

जास्त बोललात तर लाठीचार्जची धमकी पोलिसांनी दिली.अखेर पालकमंत्री नितीन राऊत यांच्या स्वीय सहायकांना फोन लावण्यात आला.ते धावत पळत यशोधरा नगर पोलिस ठाण्यात आले आपले ओळखपत्र दाखवले तेव्हा यशोधरा पोलिस ठाण्यातील पोलीसही वरमले आणि शांततेत महापौरांना निवेदन देण्याची तंबी दिली पण घेराव घालायचा नाही असे बजावले आणि सोडून दिले!

पण सोडण्यापूर्वी मोबाईलमधले सगळे ऑडीयो आणि व्हिडीयोज ‘आठवणीने’ डिलीट केले!

गौतम अंबादे, अध्यक्ष उत्तर नागपुर कांग्रेस कमेटी (अनुसूचित जाती विभाग) आणि बाबू खान, अध्यक्ष उत्तर नागपुर कांग्रेस कमेटी (अल्पसंख्यक विभाग) यांच्या नेतृत्वात मनपा मुख्यालय परिसरात महापौर कक्षा समोर नारे निर्देशने करुन समस्यांवर महापौरांचे लक्ष वेधण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका नेहा निकोसे, आशा उइके, नगरसेवक परसराम मानवटकर, शाहिदा उईके, राकेश निकोसे, मुलचंद मेहर, सतीश पाली, निलेश खोबरागडे, सचिन वासनिक, राकेश इखार, निशाद इंदुरकर, राजेश कोहडे, विपुल महले रितेश भगत मोहम्मद नईम अंसारी इस्माइल भाई आसिफ भाई सुल्तान भाई बबलू भाई अब्दुल वाहिद भाई आदिसह नागरिक उपस्थित होते.

(छायाचित्र-हे आहे स्मार्ट नागपूर!प्रभाग क्र.४!)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या