
ज्वाला धोटे, आभा पांडे उभ्या ठाकल्या समोरासमोर
जनतेच्या कामासाठी पक्ष् सोडावा लागला तरी सोडेल:आभा पांडे
राष्ट्रवादीच्या नेत्या शत्रू क्रमांक एक भाजपसोबत!पक्ष्ाने आत्मचिंतन करावं:ज्वाला धोटे
नागपूर,ता. २२ ऑगस्ट २०२१:शहरातील गंगा-जमुना वस्ती हा विषय नागपूरवासीयांसाठी देखील आता फार संवेदशनशील बनला आहे.स्थानिक रहीवाश्यांच्या तक्रारीनंतर गेल्या १२ दिवसांपासून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावर ही वस्ती ११ ऑगस्टपासून सील करण्यात आली आहे. या विरोधात राष्ट्रवादी अर्बन महिला सेलच्या अध्यक्ष्ा ज्वाला धोटे यांनी दंड थोपटले असून देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी त्यांनी तीव्र आंदोलन करत या ठिकाणचे बॅरिकेट्स उखडून टाकले मात्र यानंतर देखील गंगा-जमुना वस्ती बंदिस्तच राहील्याने, राखी पोर्णिमेला पुन्हा वारांगणांच्या समर्थनार्थ वस्तीत जाण्याचा निर्णय पत्र परिषद घेऊन ज्वाला धोटे यांनी जाहीर केला व आज सकाळी १०.३० वाजता, ज्वाला धोटे वारांगणांच्या वस्तीत पोहचल्या मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे या देखील त्यापूर्वीच सकाळी १० वा.पासून गंगा-जमुना ‘हटाव’ची मागणी करणा-या स्थानिक रहीवाश्यांच्या समर्थनार्थ तळ ठोकून उभ्या असल्याने आज बरेच तास या ठिकाणी चांगलाच राडा झाला.एकाच राजकीय पक्ष्ाच्या दोन रणरागिणी एकाच मुद्दावर मात्र वेगवेगळी भूमिका घेत आपापसात भिडल्या.
आभा पांडे व ज्वाला धोटे सामोरासमोर आले असता त्यांना आवरण्यात पोलीसांची चांगलीच दमछाक झाली,ज्वाला धोटे यांच्या मागे संपूर्ण वारांगणाची वस्ती उभी होऊन नारेबाजी करीत होती तर आभा पांडे तसेच भारतीय जनता पक्ष्ाच्या या प्रभागातील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली गंगा-जमुना हटावसाठी आंदोलन करणा-या स्थानिक रहीवश्यांनी देखील जोरदार नारेबाजी करुन पोलीसांच्या कायर्वाहीचे मात्र अभिनंदन केले व त्यांच्या समर्थनार्थ टाळ्या
वाजवल्या.
बराच वेळ दोन्ही पक्ष्ाकडून जोरदार नारेबाजी होत राहीली,पोलीसांचा दोन्ही बाजूच्या नेतृत्वापैकी किमान एकाने तरी माघार घेऊन या परिसरातून निघून जाण्यास सांगण्यातच संपूर्ण कस लागला मात्र समाेरचा पक्ष् हटत नाही तोपर्यंत दूसरा पक्ष् हटणार नसल्याची भूमिका घेत होता यामुळे अभूतपूर्व असा गोंधळ या परिसरात निर्माण झाला व याचा सर्वात मोठा फटका येथून जाणा-या वाहनचालकांनाही बसला.
कालच गंगा-जमुना वस्तीचा प्रश्न कायमचा मिटावा याकरिता अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व उपायुक्त लोहित मतानी यांनी वारांगणांशी संवाद साधला होता व त्यांच्या पुर्नवसनाचे आश्वासन दिले होते.याप्रसंगी यावेळी महिला व बालकल्याण विकास विभाग,समाजकल्याण विभाग,विधी व सेवा प्राधिकरण,राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेचे अधिकारी देखील उपस्थित होते मात्र वारांगणांनी पोलीसांचा पुनर्वसन व स्वयंरोजगाराचा प्रस्ताव साफ धुडकावून लावला.
ज्वाला धोटे यांनी या परिसरातून वारांगणांना हूसकावून लावण्यापेक्ष्ा पोलिसांनी अवैध धंद्यांवर अंकूश लावावा व अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने धंदा करवून घेणा-यांवर थर्ड डिग्री वापरावी अशी मागणी केली होती तर आभा पांडे यांनी स्थानिक रहीवाश्यांना गंगा-जमुना वस्तीमुळे होणा-या त्रासाची दखल घेऊन, ही वस्ती येथून स्थानांतरीत झालीच पाहीजे,अशी भूमिका घेतल्याने ‘न भूतो ना भविष्यती’असा संघर्ष या दोन्ही राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये निर्माण होऊन त्याचे पडसाद आजच्या राड्यात उमटले.
वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नावर पक्ष् ही सोडेल-आभा पांडे(राष्ट्रवादीच्या नेत्या व ज्येष्ठ नगरसेविका)
गंगा-जमुना वस्तीचा येथील स्थानिकांना खरोखरंच खूप त्रास आहे,ज्या घरात आई-वडील दोघेही नोकरी करतात त्यांची तरुण मुलगी एकटी घरात राहू शकत नाही,वस्तीत येणारे ग्राहक तिलाच येऊन ’रेट’विचारतात!वारांगणांच्या वस्तीत जेव्हा-जेव्हा छापा पडतो ग्राहक अर्धनग्न अवस्थेत रहीवाश्यांच्या घरासमोरुनच पळ काढतात,रहीवाश्यांच्या तरुण मुला-मुलींवर याचा काय परिणाम होतो,याचा विचार कोणी केला आहे का?वारांगणांना‘ पोट’ आहे तर स्थानिकांना ‘प्रतिष्ठा’ नाही का?वारांगणांच्या वस्तीमुळे स्थानिकांच्या मुलांची लग्ने जुळत नाही.सतत या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लाेकांची वर्दळ असते.तडीपार गुंडांसाठी तर हे सुरक्ष्ति आश्रयस्थळच झाले आहे.
वारांगणांच्या या वस्तीत फक्त ५ ते १० टक्के महिला या गरीब आहेत इतरांची मात्र नागपूरच्या विविध भागात ४-४ बीएचकेचे फ्लॅट्स आहेत,ते ही अगदी एम्प्रेस सिटीत!जे खरोखरंच बेरोजगार अाहेत त्यांना पोलिस आयुक्तांनी रोजगारासाठी मार्गदर्शन करुन देखील त्या नकार देतात,मग या कसल्या गरीब?यांना कष्टाचे काम नको,आज तर ज्वाला धोटे यांनी शहरातील तृतीय पंथियांना देखील या ठिकाणी आणून आंदोलन केले!तृतीयपंथियांचा या प्रश्नाशी काय संबंध आहे?
६ वर्षांपूर्वी जांबुवंतराव धोटे यांनी देखील याच वस्तीच्या बचावासाठी आंदोलन केले त्यावेळी देखील मी विरोधात उभी होते.त्यांचा मला फोन आला‘तुमचं काम चांगलं आहे मात्र आज तुमचं काम चांगलं नव्हतं’,त्यावेळी मी त्यांना एवढंच बोलले ’हा व्यवसाय जर तुमच्या अंगणात तुमच्या तरुण मुलीसमोर सुरु झाला तरी तुमची हीच भूमिका राहणार का?’यावर त्यांनी फोन ठेऊन दिला.आज त्यांचीच मुलगी ज्वाला धोटे त्या वारांगणांची ‘भाऊ’ झाली,वारांगणांकडून राख्या बांधून घेतल्या,नुसते बॅरिकेट्स हटवून निघून जाने म्हणजे आंदोलन होत नाही,स्थानिक रहीवाश्यांच्या समस्या ही त्यांना सोडवाव्या लागणार आहेत,जे मी करते अाहे,त्यावेळी मला पोलिसांची साथ नव्हती,यावेळी मात्र आमच्या बाजूने पोलिस विभाग देखील असल्याचे खास ‘सत्ताधीश’सोबत बाेलताना आभा पांडे म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या येत्या २८ ऑगस्ट रोजी नागपूरात येणार असून ज्वाला धोटे त्यांच्यासमोर वारांगणांच्या समस्या मांडणार आहेत,तुमची भूमिका काय?असा प्रश्न विचारला असता मी देखील स्थानिक रहीवाश्यांना घेऊन त्यांच्या ख-या समस्याशी सुळे यांना अवगत करु व आपली भूमिका मांडू,त्यांना एकतर्फी माहितीवर अवलंबून राहू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.शेवटी माझा लढा हा माझ्या नागरिकांसाठीच असतो,या लढ्यात मी ‘राजकारण किवा पक्ष् ’मध्ये आणत नाही आणि रहीवाश्यांच्या प्रश्नावर पक्ष् मध्ये येत असेल तर वेळप्रसंगी मी पक्ष्ाचा देखील त्याग करेल,असा निर्धार त्या व्यक्त करतात.
शत्रू क्रमांक १ भाजपसोबत आभा पांडे उभ्या,पक्ष्ाने आत्मचिंतन करावे-ज्वाला धोटे(अध्यक्ष्,राष्ट्रवादी अर्बन महिला सेलच्या अध्यक्ष्ा)
आमच्या समोर आभा पांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणा-या रहीवाश्यांची संख्या ही फार कमी होती.संपूर्ण रहीवाश्यांची त्यांना साथ मिळालीच नाही मात्र दूसरीकडे हजारो वारांगणा या रस्त्यावर उतरल्या होत्या,हे कशाचे निर्दशक आहे?एकाच पक्ष्ाचे असताना विरोधाभासी भूमिकेत का?या प्रश्नावर खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना,मी आभा पांडे यांच्यापेक्ष्ा राष्ट्रवादीत किती तरी ज्येष्ठ आहे,त्या जरी माझ्या आईच्या वयाचा असल्यातरी पक्ष्ात त्या माझ्यापेक्ष्ा फार कनिष्ठ स्थानी असल्याचे ज्वाला धोटे म्हणाल्या.
भूमिकेबाबत बोलाल तर राष्ट्रवादीच्या अर्बन सेल च्या प्रांताध्यक्ष् वंदना चव्हाण यांनी सुरवातीपासून माझ्या भूमिकेला आपले समर्थन दिले आहे.माझ्या आंदोलनाला त्यांचा संपूर्ण पाठींबा आहे.त्यांनीच पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत बोलून वारांगणांवर अन्याय होता कामा नये,शासनाच्या सर्व सुविधा व योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी शब्द टाकला आहे.पक्ष्ाकडून मला समर्थनच आहे.
मी आज राष्ट्रवादीच्या पक्ष्ाच्या बॅनरखाली वारांगणांच्या न्याय हक्कासाठी हा लढा देत आहे तर आभा पांडे या राष्ट्रवादीच्या शत्रू क्रमांक १ भाजपच्या बॅनरखाली उभ्या होत्या,भाजपच्या नगरसेवकांच्या सोबतीने त्या उभ्या झाल्या याचे त्यांनी आत्मचिंतन करावे,भाजपच्या गटात उभे राहणा-या आभा पांडेबाबत किमान राष्ट्रवादी पक्ष्ाने तरी आत्मचिंतन करावे,पक्ष्ासाठी ही फार मोठी शाेकांतिकाच असल्याचे त्या म्हणाल्या.

आमचे चॅनल subscribe करा