

नागपूर, १७ ऑगस्ट : निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशनचे संस्थापक सचिन घोडे यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
हुडकेश्वर खूर येथे शिवाजी चौकात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राध्यापक प्रफुल गेडाम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यावेळी झेंडावंदन करण्यात आले. सोबतच, परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.
कार्यक्रमाला गीतकार किर्तीनंद गजभिये, सरपंच मीना शेंडे, उपसरपंच अभय भगत, सरपंच कमलाकर शेंडे, जिल्हापरिषद केंद्र प्रमुख श्री भाणारकर, ग्रामसचिव चंद्रकांत सोनवणे, खरेदी विक्री संचालक सुरेश घोडे, माजी सरपंच खंडू मसराम, सदस्य ईश्वर मसराम, प्रिया घडेकर, सीमा काष्टे, मुख्याध्यापक श्री बकाले, ढोणे,सातपुते मॅडम, प्रिया भगत, बोरजे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
निःस्वार्थचे संयोजक शुभम हटवार, तुषार देशमुख, सचिन गायधने, हरीश बाळबुद्धे, सुमित मेश्राम, संकेत घोडे, भरत चरडे, दिलीप काष्टे, विक्की धरमारे, विशाल धरमारे, सौरभ भगत, मयूर धरमारे, प्रशांत घोडे, हर्षाली घोडे, प्रीती गजभिये, वैशाली वैद्य, सुजाता भगत, विनोद घोडे, रोशन चरडे, अनिकेत मेश्राम, गोपाल हटवार, प्रथमेश काष्टे, कुणाल हटवार, करण चरडे, अन्वित घोडे, मनोज चरडे, तुषार धरमारे, प्रणय चरडे, सुरेंद्र वैद्य, अमित भगत, लक्ष्मण बाळबुधे, शंकर ठाकरे, उत्तम मेश्राम, सुरेश वरठी, वामन बोबडे, शंकर मेश्राम यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.




आमचे चॅनल subscribe करा
