Homeनागपूर न्यूजसोमवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

सोमवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

नागपूर, ता ८: राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर सोमवारी ९ आगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षा व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामबाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाल, दिघोरी आणि आयुष रुग्णालय, सदर येथे उपलब्ध आहे.

Advertisements

Latest बातम्या