Homeनागपूर न्यूजमहामेट्रोच्या आजारी संचालकांमुळेच मेट्रो प्रकल्पाला उशिर!

महामेट्रोच्या आजारी संचालकांमुळेच मेट्रो प्रकल्पाला उशिर!

Advertisements

प्रशांत पवार यांचा दावा: उपचारांमध्ये झाला लाखोंचा अपहार

ईडीने करावी चौकशी

नागपूर,ता. ३ ऑगस्ट: महामेट्रो हा शासनाचा प्रकल्प असल्यामुळे मेट्रोच्या संचालक व अधिका-यांना शासनाकडून वेतन व भत्ते सहीत मेडीकलच्या देयकांची देखील सोय आहे मात्र या सोयीचा फायदा महामेट्रोच्या अधिका-यांनी उचलावा तरी किती?तर महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्ष्ीत यांचे २०१८-१९ या वर्षाचे मेडीकल देयक हाेते तब्बल ६४ लाख रुपये! तर रामनाथ सुब्रमण्यम यांचाही मेडीकल क्लेम होता ११३.७६ कोटी रुपयांचा!महामेट्रोच्या अश्‍या आजारी संचालक व अधिका-यांमुळेच मेट्रोचा प्रकल्प हा निर्धारित वेळेत म्हणजे २०१९ मध्ये पूर्ण झाला नाही उलट त्याची मुदत आता आणखी वाढवून २०२४ झाली आहे, त्यामुळे अश्‍या आजारी संचालक व अधिका-यांची हकालपट्टी करण्यात यावी तसेच त्यांच्या आरोग्यावर खर्च झालेल्या जनतेच्या पैशांच्या अपहाराची ईडीने चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी आज पत्र परिषदेत केली.

महामेट्रोच्या अश्‍या आर्थिक अनियमिततेचा भुर्दंड नागपूरकर जनतेला मेट्रोसोबतच्या कराराप्रमाणे २०४२ पर्यंत भरायचा आहे.महामेट्रो नागपूरकरांकडून विकास शुल्क म्हणून २०४२ पर्यंत तब्बल २२ हजार कोटी रुपये वसूल करणार आहे,असे सांगत महामेट्रोच्या संचालक व अधिका-यांच्या मेडीकल देयकांची इडी किवा ऑडीटर यांनी चौकशी केल्यास जनतेसमोर सत्य येईल,असे ते म्हणाले.
कोट्यावधी रुपये महामेट्रोचे संचालक व अधिकारी हे जर आपल्या आरोग्यावर खर्च करत असतील तर अश्‍या ‘आजारी’अधिका-यांमुळेच मेट्राचे अद्याप ४० टक्के काम शिल्लक असल्याचे ते म्हणाले.

आमदारांच्या घरासमोर मेट्रोच्या शिल्लक कामांची लावणार छायाचित्रे-
२०१६ मध्ये तब्बल ८ हजार ६८० कोटींचा हा प्रकल्प नागपूरात आणण्यात आला.हा प्रकल्प कराराप्रमाणे २०१९ मध्ये पूर्ण व्हायला हवा होता मात्र २०२१ उजाडले तरी मेट्रोचे ४० टक्के काम अद्याप शिल्लक आहे.त्यामुळे ‘जय जवान जय किसान’संघटना लवकरच या संपूर्ण शिल्लक कामांची छायाचित्रे शहरातील अामदार व जनप्रतिनिधींच्या घरासमोर लावणार असल्याचे पवार यांनी सांगितले.शहरातील जनप्रतिनिधी एवढ्या महत्वाच्या प्रकल्पाकडे लक्ष् का देत नाही?याकडे लक्ष् वेधण्यासाठी हे छायाचित्रे लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

मेडीकल सायंससाठी आव्हान!
२०१८-१९ साली मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्ष्ीत यांना एकाच वर्षी ६४ लाख रुपये मेडिकलवरील उपचारासाठी लागले पण ‘जय जवान जय किसान’संघटनेने या विषयावर पत्र परिषद घेतल्यानंतर २०१९-२० मध्ये फक्त अडीच लाख रुपयेच त्यांच्या उपचारावर शासनाचे खर्च झाले २०१७-१८ मध्ये ही ब्रिजेश दीक्ष्ीत यांच्या उपचारावर ४९ लाख २० हजार रुपये खर्च झाले हाेते मग ज्या व्यक्तीच्या उपचारावर गेल्या दोन वर्षात ५० लाख रुपयांच्या जवळपास खर्च होत होते,आमच्या संघटनेने आवाज उठवल्या बरोबर गेल्या वर्षी फक्त अडीच लाखात ते आरोग्यदायी कसे झाले?

याचप्रमाणे महेश कुमार या अधिका-यांच्या उपचारावर २०१७-१८ मध्ये ४९ लाख २० हजार,२०१८-१९ मध्ये ११ लाख ७८ हजार,सुनील माथूर यांच्या उपचारावर अनुक्रमे २१ लाख ६५ हजार व २१ लाख ७८ हजार खर्च झाले,एस.शिवनाथन यांच्या उपचारावर २०१७-१८ मध्ये १२ लाख २० हजार तर २०१८-१९ मध्ये १९ लाख १७ हजार खर्च झाले,रामनाथ सुब्रमण्यम यांच्या उपचारावर २०१७-१८ मध्ये ९२ लाख ७१ हजार म्हणजे एक कोटींच्या जवळपास खर्च झाले तर २०१८-१९ मध्ये एक कोटी १३ लाख ७६ हजार रुपये खर्च झाले . मात्र या सर्वांचे २०१९-२० मध्ये अडीच लाख,४४ हजार,१ लाख ६० हजार,५३ हजार व १० लाख २६ हजार उपचाराचे बिल निघाले त्यामुळेच मेडीकल सायंससाठी हा संशोधनाचा विषय आहे की कोट्यावधींचे बिल निघणा-या मेट्रोच्या या अधिका-यांचे बिल अचानक हजारांच्या घरात कसे गेले?
भ्रष्ट अधिका-यांचा भरणा-

महामेट्रोमध्ये सर्वाधिक भरणा हा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवृत्त भ्रष्ट अधिका-यांचा असल्याची खरमरीत टिका याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केली.महामेट्रोमध्ये ६० टक्के भरणा अश्‍या भ्रष्ट अधिका-यांचा असून ‘जो भ्रष्ट तोच योग्य’असा उरफाटा कारभार महामेट्रोने राबवला असल्याचे पवार हे म्हणाले.मेडीकल क्लेममध्ये ही एवढा मोठा भ्रष्ट कारभार केल्यानंतर देखील कॅग किवा ऑडिटरला हे कसे कळले नाही?सगळे मिळून जनतेला लूटत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मिहानमध्ये ६० वर्षावरील एक ही अधिकारी कार्यरत नाही मग महामेट्राेने ६० टक्के निवृत्त अधिका-यांचाच भरणा का केला?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या निवृत्त तसेच एवढ्या आजारी अधिका-यांमुळेच महामेट्रोचा प्रकल्प २०२४ पर्यंत लांबला असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.

गडकरींनाही भेटणार-
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी महामेट्रोवर एवढे भ्रष्टाचार व गैरकार्यभाराचे आरोप होत असल्यामुळे या प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी.एवढा भ्रष्टाचार ब्रिजेश दीक्ष्ीत किवा त्यांच्या हाता खालच्या माणसांनी केला आहे का? याची चौकशी केली पाहिजे अशी आमची गडकरींकडे मागणी आहे.यामुळे आमचा व जनतेचा भार हल्का होईल,यासंबधी आम्ही गडकरी यांच्याकडे लवकरच त्यांची वेळ घेऊन भेटणार असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.

Latest बातम्या