Homeनागपूर न्यूजबंटी शेळके यांच्या ‘संघ से संसद तक’रॅली दरम्यान काॅंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

बंटी शेळके यांच्या ‘संघ से संसद तक’रॅली दरम्यान काॅंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

Advertisements


नागपूर,ता. १ ऑगस्ट: अखिल भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांची आज १ ऑगस्ट पासून प्रस्तावित ‘संघ से संसद तक’या बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी महाल संघ मुख्यालय जवळ भारतीय जनता पक्ष् युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की झाली.संघ मुख्यालयाच्या रस्त्यावरच बंटी शेळके यांच्या रॅलीचा मार्ग भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी रोखला त्यामुळे दोन्ही पक्ष्ा कडील युवा वर्गामध्ये शाब्दिक चकमकीसोबतच धक्काबुक्की ही झाली.

बंटी शेळके यांच्या २५०० किलोमीटरच्या या रॅलीचा प्रारंभ संघ मुख्यालया जवळून होणार होता मात्र त्या आधीच त्यांच्या रॅलीचा मार्ग भाजपच्या युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी रोखला परिणामी शेळके यांना आपला मार्ग बदलावा लागला असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावेळी बंटी शेळके यांनी मी गणपती मंदिरात दर्शनाला जात असल्याचे सांगून मला गणपतीचे दर्शन ही घेण्यापासून रोखण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले.मी हिंदू असून मला देव दर्शनाचा अधिकार आहे मात्र मला मंदिरापर्यंतही जाऊ दिले गेले नाही,याचा मी निषेध करतो,असे ते म्हणाले.

या सर्व घडामोडीत दोन्ही पक्ष्ाच्या ४०० ते ५०० कार्यकर्ते हे आपापसातच भिडले असल्याने काही काळ या भागात तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती.यानंतर बंटी शेळके हे दिल्लीसाठी रवाना झाले.आज ते मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले असून उद्या ते हरियाणाकडे रवाना होतील असे त्यांचा जनसंपर्क विभागातून सांगण्यात आले आहे.’जनता जगाओ भाजपा भगाओ’हा नारा घेऊन त्यांनी या रॅलीचा प्रारंभ केला आहे.

Latest बातम्या