फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजप्रशासकीय अनास्थेचा आणखी एक डेंग्यू बळी: आम आदमी पक्षाचा आरोप

प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक डेंग्यू बळी: आम आदमी पक्षाचा आरोप

Advertisements

नागपूर, दि. २९ जुलै: नवी मंगळवारी तलाव  परिसरातील अशोक निखारे वय ४३ वर्ष या नागरिकांचा डेंग्यू या आजाराने बळी गेला . आम आदमी पक्षाच्या वतीने नुकतेच दि २६ जुलै ला नारे निदर्शने आंदोलन करून तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची  मागणी मनपा प्रशासनाला करण्यात आली होती मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे ४३ वर्षीय निखारे यांचा दूर्देवी मृत्यू झाला. सध्या संपूर्ण शहरच डेंग्यूच्या विळख्यात सापडले असताना मनपा प्रशासन आणखी किती मृत्यूंची वाट बघणार आहे?असा संतप्त सवाल आम आदमी पक्षातर्फे करण्यात येत आहे.

उत्तर नागपूर प्रभाग ५ अंतर्गत नवी मंगळवारी भागात सुमारे ३०० वर्ष जुना तलाव असून गेल्या २० ते ३० वर्षापासून हा तलाव दुर्गंधीयुक्त झाला असून रोगराईस आमंत्रण देणारा झालेला आहे . हा तलाव पूर्वी तीन एकर परिसरात होता . या तलावाचे पाणी परिसरातील लोक पिण्यासाठी वापरत असत . कालांतराने तलावाच्या आजूबाजूला अतिक्रमण झाल्यामुळे तलाव फारच लहान झालेला आहे . या तलावात गडर लाईनचे पाणी तसेच आजूबाजूला घाण आणि कचरा व निर्माल्य यामूळे तलाव दूषित झाला आहे . यामूळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराशी सामना करावा लागत आहे .

तलावाच्या सौंदर्यीकरण करण्याकरिता येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक , स्थानिक आमदार व खासदारांना व मनपा अधिकारी यांना निवेदने दिलीत परंतू याकडे दुर्लक्ष केल्या गेले .यापूर्वी २६ मार्चला सहायक आयुक्त सतरंजीपूरा झोन यांना आम आदमी पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले .तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यांत आला होता, परंतू प्रशासनाने निवेदानाला केराची टोपली दाखविली . नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले जात असतांना उत्तर नागपूरातील या ऐतिहासीक तलावाकडे स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाचे दूर्लक्ष दिसून येते .

आम आदमी पार्टी उत्तर नागपूरचे सह संयोजक विजय नंदनवार यांच्या नेतृत्वात संजय निपाणे अतिरिक्त  आयुक्त , नागपूर महानगर पालिका यांना निवेदन देण्यांत आले .  सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने दिनांक २६ जुलै दुपारी २ ते ४ या वेळात नारे निदर्शनेकरण्याचा इशारा देण्यात आले .या उपरोक्त ही कार्यवाही न झाल्यास ,  ३ ऑगस्ट ला दुपारी १२ ते २ या वेळेत सतरंजीपूरा झोन कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यांत येईल व ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून तलावाजवळ बेमुदत साखळी उपोषण करण्यांत येईल असा इशारा  आम आदमी पक्षातर्फे देण्यात आला.

शहर सचिव भूषण ढाकुलकर नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, उत्तर नागपुर संयोजक  रोशन डोंगरे यांच्या मार्गदर्शनात व उत्तर नागपूर संघटन मंत्री प्रदीप पौनिकर, प्रभाग ५ चे संयोजक विजय नंदनवार, प्रभाग ५ सचिव राज कुंभारे प्रभाग ५ युवा संयोजक योगेश पराते यांच्या नेतृत्वात ही मागणी करण्यात आली. 

गुणवंत सोमकुंवर ,  स्वप्नील सोमकुवर ,  सलाम भाई, पंकज मेश्राम, हरीश वेळेकर, विजय धकाते, आकाश कावळे, प्रभात अग्रवाल, मोरेश्वर मौंदेकर, स्वीटी इंदूरकर, लीना गजभिये, आशा रंगारी, शुभम मोरे, हरीश निमजे, जगदीश गजभिये, मानसिंग अहिरवार, नितेश परसराम, ,आशिष हातीपर्शॅल, निळकंठ टाकळीकर, मंगेश ढवळे, अमित अंबादे, सोमेश पाटील, किशोर मौंदेकर, गणेश राऊत , अरुण गुणारकर , जयप्रकाश पौनीकर , डॉ नत्थूजी समदे यांनी उपाेषणाचा इशारा दिला आहे .

नागपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.. डेंग्यू आजाराच्या प्रकोपाने हजारो नागपूरकर आजारी पडत आहे.. तेव्हा  डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम आदमी पार्टी नागपूरतर्फे  “डेंग्यू मलेरियाला देण्याची मात आप देईल आपल्याला साथ”  हे जनहिताचे अभियान राबविण्यात येत आहे.

मध्य नागपूर प्रभाग १८ सिरसपेठ, वकीलपेठ, दर्शन कॉलनी, पारडी, गोळीबार चौक, मानेवाडा सहित संपूर्ण नागपूर मध्ये आम आदमी पार्टी चे सेवादार कार्यकर्ते घरो घरी जाऊन डेंग्यू नाशक फवारणी, फॉगींग करून डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी जनजागृती करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संकल्पनेतून हे अभियान नागपूर मध्ये आम आदमी पार्टी तर्फे राबविण्यात येत आहे . आम आदमी पार्टीच्या या डेंग्यू विरूद्ध लढ्यात मोठ्या संख्येत नागपूरकर सहभागी होऊन या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.

संपुर्ण नागपूर मध्ये लाखो जनतेच्या सुरक्षेसाठी आम आदमी पार्टीच्या या डेंग्यू विरूद्ध लढ्यात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आप युवा आघाडी राज्य समिती सदस्य कृतल पियुष आकरे  यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीच्या या डेंग्यू विरूद्ध लढ्याला घरो घरी पोहोचवण्यासाठी आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे, कृतल आकरे, प्रतीक बावनकर, मंगेश दिवटे, गिरीश तितरमारे, बबलू मोहाडीकर, अक्षय दुपारे, सौ. विषाखा दुपारे, कुणाल ढाकरे, पार्थ मिरे, अनुप खड्डकर, सह आम आदमी पार्टीचे समस्त सेवादार कार्यकर्ते सहभागी आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या