फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजक' उभा कटीवर ठेवून हात : समीर हेजीबने उलगडला सहजपाठ

क’ उभा कटीवर ठेवून हात : समीर हेजीबने उलगडला सहजपाठ

Advertisements

‘आबार एसेछे आषाढ’ उपक्रमाचा समारोप

नागपूर,२५ जुलै:’क’ चा काय सुरेख थाट, उभा कटीवर ठेवून हात’ख’ ला झाला खोकला, खोकून खोकून थकला गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी रचलेल्‍या रविंद्र संगीताचा एक प्रकार असलेल्‍या ‘सहजपाठ’ला अतिशय सोप्‍या आणि सहज पद्धतीने उलगडत नेत परफॉर्मिंग आर्टिस्‍ट समीर हेजिब यांनी उपक्रमाचा समारोप केला.

पत्रभेट संपादकीय मंडळाच्‍यावतीने मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्‍या ‘आबार एसेछे आषाढ’ या उपक्रमाचा आज समारोप झाला. या उपक्रमाचे शेवटचे पुष्‍प समीर हेजीब यांनी गुंफले.

१९७७ साली पु.ल. देशपांडे शातिनिकेतला गेले असता महिनाभर तेथे राहिले. त्‍या प्रवासाची डायरी त्‍यांनी ‘मुक्‍काम शांतिनिकेतन’ नावाने प्रकाशित केली. त्‍याआधी १९७० ला ते तेथे गेले असता त्‍यांनी बंगाली भाषा बोलायला, लिहायला शिकून घेतले. त्‍याच दरम्‍यान त्‍यांचा टागोरांच्‍या ‘सहजपाठ’शी परिचय झाला. टागोरांनी आपल्‍या शेवटच्‍या काळात ‘सहजपाठ‘ ही बंगाली अंकलिपी तयार केली हेाती. मुळाक्षरांच्‍या या कविता पुलंनी मराठीत भानुवादित केल्‍या, असे समीर हेजीब म्‍हणाले.

सहजपाठ’ मधील काव्‍यरचना या केवळ शालेय शिक्षणापर्यंत मर्यादित नसून जीवनाच्‍या अनुभवांशी सांगड घालून अनुभूतीत रूपांतरीत करणा-या आहेत. या माध्‍यमातून टागोरांनी इन्‍फॉर्मल एज्‍युकेशनची सुरुवात केली, असे ते म्‍हणाले.

समीर हेजीब यांनी त्‍यांच्‍या तीस मुलांच्‍या चमूसह ‘सहजपाठ’चे शांतिनिकेतन कसे सादरीकरण केले, याच्‍या काही सचित्र आठवणी सांगितल्‍या.

‘रोज वाटे एका फुला, कधी उडता येईल का ?’ या टागोरांच्‍या ‘इच्‍छा’ कवितेतून मुलांच्‍या इच्‍छा कशा व्‍यक्‍त होतात, याचाही उलगडा त्‍यांनी यावेळी केला. ‘अहह अबबचे गाणे’ या गीताचे गुरुमंदिरच्‍या बालउपासकांनी सादरीकरण केले.

तत्‍पूर्वी, प. पू. सद्गुरूदास महाराज लिखित ‘मागणे ते एक तुजप्रति आहे !’ या लेखाचे स्मिता महाजन यांनी अभिवाचन केले. सूत्रसंचालन स्मिता महाजन यांनी तर आभार प्रदर्शन अपूर्वा मार्डीकर यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या