फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनवी मंगळवारी तलावाची त्वरीत स्वच्छता करा

नवी मंगळवारी तलावाची त्वरीत स्वच्छता करा

Advertisements

आम आदमी पक्ष्ातर्फे अतिरिक्त मनपा आयुक्त संजय निपाणे यांना निवेदन

आंदोलनाचा दिला इशारा

नागपूर,ता. २० जुलै: उत्तर नागपूर प्रभाग ५ अंतर्गत नवी मंगळवारी भागात सुमारे ३०० वर्ष जुना तलाव असून गेल्या २० ते ३० वर्षांपासून हा तलाव दुर्गंधीयुक्त व रोगराईस आमंत्रण देणारा झालेला आहे . हा तलाव पूर्वी तीन एकर परिसरात होता . या तलावाचे पाणी परिसरातील लोक पिण्यासाठी वापरत होते . कालांतराने तलावाच्या आजूबाजूला अतिक्रमण झाल्यामुळे तलाव फारच लहान झाला . या तलावात सिवरेजचे पाणी तसेच आजूबाजूला घाण, कचरा व निर्माल्य यामूळे तलाव पूर्णपणे दूषित झाला आहे . यामूळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराशी सामना करावा लागत आहे .या विषयी आम आदमी पार्टी उत्तर नागपूरचे सह संयोजक विजय नंदनवार यांच्या नेतृत्वात संजय निपाणे अतिरिक्त आयुक्त , नागपूर महानगर पालिका यांना निवेदन देण्यांत आले .

तलावाच्या सौंदर्यीकरण करण्याकरिता येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक , स्थानिक आमदार व खासदारांना व मनपा अधिकारी यांना निवेदने दिलीत परंतू याकडे दुर्लक्ष केल्या गेले .यापूर्वी २६ मार्चला सहायक आयुक्त सतरंजीपूरा झोन यांना आम आदमी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले .

तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यांत आला , परंतू प्रशासनाने निवेदनाला केराची टोपली दाखविली . नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले जात असताना उत्तर नागपूरातील या ऐतिहासीक तलावाकडे स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाचे अक्ष्म्य दूर्लक्ष दिसून येते .

सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने दिनांक २६ जुलै दुपारी २ ते ४ दरम्यान नारे निदर्शने करण्यात येईल , तसेच 3३ ऑगष्ट ला दुपारी १२ ते २ या वेळांत सतरंजीपूरा झोन कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा इशारा आम आदमी पक्ष्ाने दिला.

या उपरोक्त काहीही कार्यवाही न झाल्यास दि ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून तलावाजवळ बेमुदत साखळी उपोषण करण्यांत येईल असा इशारा देण्यांत आला .

यावेळी आम आदमी पक्षाचे शहर सचिव भूषण ढाकुलकर , उत्तर नागपूर विधानसभा संयोजक रोशन डोंगरे , संघटन मंत्री प्रदिप पौनीकर ,सचिव गुणवंत सोमकुवर, प्रभाग सचिव राज कुंभारे , वार्ड अध्यक्ष योगेश पराते , अमित अंबादे , उत्तर नागपूर महिला संघटन मंत्री स्विटीताई इंदोरकर , उत्तर नागपूर युवा संयोजक स्वप्नील सोमकुंवर , जगदिश रोकडे इ. पदाधिकारी उपस्थित होते .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या