Homeनागपूर न्यूजकिन्नरांना मिळणार आता ‘शासकीय’ओळख

किन्नरांना मिळणार आता ‘शासकीय’ओळख

Advertisements
Advertisements

 सारथी ट्रस्टने केले पहील्यांदाज विशेष शिबिराचे आयोजन
नागपूर,ता.३ जुलै: शहरात किन्नरांची संख्या उल्लेखनीय असली तरी त्यांची शासन दरबारी नोंदच नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता.आता मात्र शहरातील किन्नरांना जिल्हा प्रशासनातर्फे ओळखपत्रासह एलजीबीटी समुदायातील सदस्यांना महत्वाची कागदपत्रे मिळावती,यासाठी ५ दिवसांचे विशेष शिबिर सीताबर्डी येथील सारथी ट्रस्ट कार्यालयात पार पडले.

विदर्भात पहील्यांदाज अशा प्रकारचे शिबिर पार पडले.किन्नरांसाठी अनेक शासकीय योजना आहेत,मात्र त्यांचा लाभ या घटकापर्यंत पोहोचत नाहीत.एक तर एखाद्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी किन्नर हे सरकारी कार्यालयांमध्ये जाणेच टाळतात.बरेचदा त्यांच्या वाट्याला हेटाळणीचाच अनुभव येत असतो.

त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी सारथीच्या परिसरात हे शिबिर आयोजित केले होते व संबंधित विभागाच्या कर्मचा-यांना तेथे पाठवलं होते.

शिबिरात किन्नरांना ओळखपत्र यासह आधार,पॅन कार्ड,रेशन कार्ड,संजय गांधी निराधार योजनेचे ओळखपत्र,अशी कागदपत्रे तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

एलजीबीटी समुदायातील जवळपास २०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.साधारण १५ दिवसांत त्यांना त्यांची संपूर्ण कागदपत्रे मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी सारथी ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक निकुंज जोशी,सारथीचे अध्यक्ष् आनंद चांदरानी उपस्थित होते.विद्या कांबळे यांनी आभार मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी ट्रांस वुमेन आंचल वर्मा यांनी विशेष सहकार्य केले तर जिल्हाधिकारी कार्यालयातून मयुरी टेकाडे,चंद्रशेखर क्ष्ेत्रपाल,प्रतिभा निललुधे,अशफाक बेग,भूपेंद्र मोंढेकर,कविराज कांबळे,रेणुका मदामे,डॉ.नंदश्री भुरे आदी यांचे सहकार्य लाभले.

Latest बातम्या