Homeनागपूर न्यूजमनपा केन्द्रांमध्ये ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी सोमवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

मनपा केन्द्रांमध्ये ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी सोमवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

नागपूर, ता. ११: शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे फक्त ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केन्द्रावर सोमवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. केन्द्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला होता त्यांना दुसरा डोज देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे.

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सकाळी १० पासून मर्यादित स्वरूपात केल्या जाईल. सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.

१८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सकाळी १० वाजत सुरु होईल.

Advertisements

Latest बातम्या