फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'निःस्वार्थ' सेवा परिवाराने घेतली कोविडची लस

‘निःस्वार्थ’ सेवा परिवाराने घेतली कोविडची लस

Advertisements

नागपूर:  निःस्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशन हुडकेश्वरच्‍यावतीने कोरोना काळात जीव धोक्‍यात घालून सेवा कार्य करणा-या सर्व अठरा वर्षांवरील संयोजकांना कोविड लस देण्‍यात आली.

नि:स्‍वार्थ फाउंडेशनचे संस्‍थापक सचिन घोडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली मागील दिड वर्षापासून हे सर्व संयोजक गरजू लोकांना धान्‍य वाटप करणे, सॅनिटायझरची फवारणी, मास्‍कचे वाटप, आरोग्‍य शिबिरांचे आयोजन, ऑक्सिजन कॉन्‍सन्‍ट्रेटरचे वितरण असे सेवाकार्य करत होते.

आतापर्यंत सरकारने अठरा वर्षांवरील युवकांना व्‍हॅक्सिन न देण्‍याचे ठरवले होते. पण नंतर युवकांसाठी लसीकरणाचा मार्ग खुला झाला आणि २१ जूनपासून मोठ्या संख्‍येने युवकांचे लसीकरण करण्‍यात आले आहे.

मधल्‍या काळात मुबलक प्रमाणात लस उपलब्‍ध नसल्‍यामुळे नोंदणी केल्‍यानंतरही अठरा वर्षांवरील लोकांचे लसीकरण होऊ शकले नव्‍हते. पाचगाव प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार व त्‍यांच्‍या वैद्यकीय चमूच्‍या सहयोगाने लसीकरणाची व्‍यवस्‍था झाली आणि फाउंडेशनच्‍या संयोजकांना नुकताच लशीचा पहिला डोज देण्‍यात आला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या