

‘एक साथ’ स्वाक्ष् -या मारुन गंटावार झालेत मोकळे!
‘धन्य धन्य’ असे डॉक्टर करोनाकाळात जनतेला लाभले!
नागपूर,ता. २१ जून: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार हे बहूचर्चित नाव नागपूरकर जनतेला चांगलेच परिचयाचे आहे.गेल्या काही वर्षांपासून त्यांची वादग्रस्त कारर्कीद माध्यमांमध्येही चांगलीच गाजली मात्र मजाल आहे कोणाची त्यांच्या पदाला एक ही सत्ताधारी धक्का लावेल?घेईल त्यांची नोकरी?कराेना महामारीच्या जीवघेण्या तडाख्यात नागपूरकर जनता होरपळून निघाली असताना,शासकीय व खासगी रुग्णालयांच्या दारावरच ऑक्सीजन अभावी तडफडून मरत असताना ज्या शासकीय नोकरीचा पगार डॉ.गंटावार लाटतात ती नोकरी त्यांनी संपूर्ण कराेना काळात कधी केलीच नाही,स्वत:चे खासगी रुग्णालय सांभाळले, एवढ्यावरही मनपा सत्ताधा-यांचे त्यांच्यावरील ‘अर्थपूर्ण ’प्रेम आटले नाही म्हणून आता तर ते चक्क आपले हजेरी पुस्तक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.संजय चिलकर यांच्या कक्ष्ातून स्वत:च्या कक्ष्ात मागवून एकसाथ स्वाक्ष्-या करुन मोकळे ही होतात!
मनपा प्रशासन ज्या नियमांवर चालतं त्या नियमांची ऐसीतैसी करुन, मनपातील भाजप सत्ताधारी व प्रशासनाचे अतिशय प्रिय असणारे डॉ.प्रवीण गंटावार यांच्यासाठी सगळे नियम चक्क खड्डयात जातात असे चित्र सध्या मनपात उमटले आहे.
शुक्रवार दि.१८ जून २०२१ रोजी डॉ.गंटावार यांनी मनपाचे सगळे नियम खड्डयात घालून इतर सगळे अारोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्या कक्ष्ात जाऊन सही करत असताना डॉ.गंटावारांनी ती हजेरी पुस्तिकाच आपल्या स्वत:च्या कक्ष्ात मागवली,त्यावर एकसाथ हजेरी तारखांसमोर स्वाक्ष् -या केल्या व आपल्या पायाची धूळ झाडत निघून गेलेत…..!
२००९ साली मनपातील भाजपच्या सत्ताधा-यांनी मनपातील अनेक पात्र व प्रामाणिक आरोग्य अधिका-यांना डावलून डॉ.गंटावार यांची या पदासाठी निवड केली.भाजपच्या त्या ज्येष्ठ नेत्यांनी डॉ.प्रवीण गंटावार व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावारांमध्ये ‘नेमकी’ कोणती ‘पात्रता’बघितली हा भाग वेगळ्या बातमीचा होऊ शकतो.
मात्र डॉ.गंटावारांची एकंदरित कारर्कीद ही अतिशय वादग्रस्त राहीली आहे हे दूधखुळ्या पोराला ही माहीती आहे. अधिक संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांना व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २२ डिसेंबर २०२० रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला .सत्र न्यायालयाने मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता.
न्या.पुष्पा गणेडीवाल यांच्या एकलपीठासमोर नागपूर खंडपीठात ही सुनावणी झाली होती.डॉ.गंटावारांच्या वतीने बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता यांनी न्यायालयाला सांगितले की,डॉ.गंटावार एमबीबीएस डॉक्टर आहेत,गेल्या अनेक वर्षापासून ते मनपात कार्यरत आहेत तसेच खासगी प्रॅक्टीस देखील करतात(मूळात सरकारी सेवेत असणा-या आरोग्य अधिका-यांना खासगी प्रेक्टीस करता येत नाही,असा नियम आहे)त्यांच्याविरुद्ध अपसंपदेच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही पुराव्यांचा आधार घेण्यात आला नाही.
राज्य सरकारने गंटावार यांना अटकपूर्व जामीन देण्यासाठी विरोध केला होता.परंतु डॉ.गंटावार हे तपास अधिका-यांना पूर्ण सहकार्य करीत असून त्यांना एसीबी कार्यालयातून बोलावण्यात आल्यानंतर ते तिथे ही हजर राहत आहेत,असे कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने गंटावार दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंटावार दाम्पत्याविरोधात १ जुलै २०२० रोजी हा गुन्हा दाखल केला होता.
वादग्रस्त नेता व कुख्यात गुंड साहिल सय्यद याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असल्याचा ठपका देखील याच नागपूरकरांच्या सेवत असणा-या डॉ.गंटावार यांच्यावर ठेवण्यात आला होता.नेत्यांच्या मदतीने वसूली करणा-या साहील सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुस-याच्या मालकीची जमीनींची विक्री केली होती.
२५ जुलै २०२० रोजी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्र परिषद घेऊन डॉ.गंटावार हे गुंड प्रवृत्तीचे साथीदार असल्याचा आरोप केला होता,हे विशेष!डॉ.गंटावार यांनी कोराडी मार्गावरील अलॅक्सिस हॉस्पीटलवरील कारवाई ही गुंडप्रवृत्तीच्या सांगण्यावरुन केली.या कारवाईपूर्वी त्यांनी ६ वेळा या रुग्णालयाची तपासणी केल्यावर एकदा ही कारणे दाखवा नोटीस दिली नाही,शिवाय,कारवाई करताना पीसीपीएनडीटी कायद्याचेही उल्लंघन केले.सातत्याने नेहमीच्या भेटीत ते ‘एकत्रित बसून प्रश्न सोडवा’असा सल्ला ॲलेक्सीस रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना साहील सय्यदबाबत देत होते.यावरुन या रुग्णालयामागे असलेल्या जमीनीचा गंध येतो,असा गंभीर आरोप महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला होता.न्यायालयाने देखील डॉ.गंटावार यांच्यावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले होते,डॉ.गंटावार हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत की गुंडांचे?अशी शंका दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली होती.
आज तेच गुंडांचे सहकारी असण्याचा आरोप असणारे डॉ.गंटावार दयाशंकर तिवारी हे महापौर पदी रुजू असताना ही अद्याप आपल्या पदावर कायम आहेत…….!त्यामुळे नागपूरकर जनतेवर ऐन करोनाच्या काळात ‘ये रिश्ता क्या कहलाता है….पवित्र रिश्ता’म्हणायची वेळ आली….!
अलॅक्सीस हॉस्पीटलवरील डॉ.गंटावारांनी केलेली कारवाई न्यायालयाने अवैध ठरवून मनपावर कठोर ताशेरे ओढले होते.या रुग्णालयाच्या जेनेटिक क्लिनिकची नोंदणी डॉ.गंटवारांनी रद्द करुन तेथील ८ वैद्यकीय यंत्रे जप्त केली होती.या कारवाईत डॉ.गंटावारांनी पक्ष् पाती भूमिका बजावली,कारवाईत कायद्याचे पालन केले नाही असे कडक ताशेरे नागपूर खंडपीठाने ओढले होते.
याच ‘गाजलेल्या’ गंटावारांची मनपात २ ऑक्टोबर २०२० रोजी पदोन्नती झाली.अपसंपेदचा आरोपाखाली जामीनीवर असणा-या डॉ.गंटावार यांना आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी आरोग्य अधिकारीचा अतिरिक्त पदभार सोपवला……!
हनी ट्रॅप आणि बोगस स्टिंग ऑपरेशन करुन अनेकांना ब्लॅकमेल करणारा,अनेकांच्या मालमत्ता बळकवणारा कुख्यात गुंड साहिल सय्यद आणि त्याची मैत्रीण नीलिमा जयस्वाल-तिवारी यांना भक्कम पुराव्यासह पाचपावली पोलिसांनी जुलै महिन्यात अटक केली होती.याच साहील सय्यदची एक वादग्रस्त ऑडियो क्लिप त्यावेळी जबरदस्त व्हायरल झाली होती ज्यात डॉ.गंटावारांना, दयाशंकर तिवारी व तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्याकडून खूपच जास्त त्रास दिल्या जात असल्याने या दोघांनाही ‘हनी ट्रॅपमध्ये’अडकवण्याचे षडयंत्र रचले होते…….!
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र ही लिहले हाेते.१८ जुलै २०२० रोजी गृहमंत्र्यांचे फडणवीस यांना पत्र मिळाले ‘ऑडियो क्लिपची म्हणाल त्या संस्थेमार्फत चौकशी करु मात्र प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये…..!’१८ जुलै २०२० रोजी पुन्हा फडणवीस यांचे गृहमंत्र्यांच्या निष्पक्ष् चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन न्यायाधीशांकडे ऑडियो क्लिप सादर करणार असल्याचे पत्र गेले….!.
डॉ.गंटावार हे असे एवढे बहूचर्चित व्यक्तीमत्व आहे के जे राज्याच्या राजकारणालाही ढवळून टाकण्याची ताकद ठेवतात.त्यांना डॉ.संजय चिलकर यांच्या अधिकार कक्ष्ात असणारी हजेरी पुस्तिका नियम कायदे मोडून स्वत:च्या कक्ष्ात मागवून एकसाथ त्यावर स्वाक्ष् -या करुन निघून जाण्यासारखी गोष्ट मग ‘चिल्लरच’ आहे.
करोनाने ‘जनता मरती है तो मरने दो,दूनिया गई भाड में’या तत्वावर चालणा-या मनपाच्या डॉ.गंटावार यांच्यावर अडीच कोटींच्या अपसंपदेचा आरोपाखाली जरी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ४ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल केला व त्यांच्या रामदासपेठ येथील फॉरच्यून रेसिडेन्सी या आलिशान फ्लॅटमधून तसेच धंतोली येथील त्यांच्या ‘कोलंबिया’ रुग्णालयातून अनेक रुग्णांच्या जमीनीच्या रजिस्ट्री जप्त झाल्या असल्या व यानंतर १३ जुलै २०२० नंतर ईडीचा ससेमारा त्यांच्या मागे लागला असला तरी पुढील महिन्यात या सर्व घडामोडींना एक वर्ष पूर्ण होणार आहे मात्र मनपा प्रशासनाला व मनपा सत्ताधा-यांना संपूर्ण नागपूरात ‘म्हणूनच’नागपूरकर जनतेच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी डॉ.प्रवीण गंटावार व जनतेच्या कराच्या पैशांमधून तेवढाच लाखोंचा पगार घेणा-या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांच्यापेक्ष्ा जास्त ‘कार्यक्ष् म व कर्तृत्ववान’डॉक्टर नाही मिळत असल्यानेच ते अद्यापही आपल्या पदावर कायम आहेत,ताहयात कायम असणार….किमान भाजपची सत्ता मनपातून हद्दपार झाल्याशिवाय तरी डॉ.गंटावार या ‘बाप माणसाला’ कोणीही तिथून हद्दपार करु शकत नसल्याचे वास्तव जनतेलाही माहिती आहे.




आमचे चॅनल subscribe करा
