Homeनागपूर न्यूजमोदी सरकार उत्तरप्रदेशचे तुकडे करणार तत्पूर्वी वेगळा विदर्भ द्या:राम नेवले

मोदी सरकार उत्तरप्रदेशचे तुकडे करणार तत्पूर्वी वेगळा विदर्भ द्या:राम नेवले

Advertisements

९ ऑगस्ट क्रांती दिनापासून आंदोलन

नागपूर,ता. १६ जून: उत्तरप्रदेशात भाजप सरकार येत्या विधान सभेच्या निवडणूकीत योगींच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यास राजकीय खेळी खेळून उत्तर प्रदेश राज्याचे विविध तुकडे करुन म्हणजे पूर्वांचल,पश्‍चिमांचल व बुंदेलखंड अशी छोटी राज्ये निर्माण करुन सत्ता मिळवणार असल्याची चर्चा सुरु आहे मात्र उत्तर प्रदेशच्या विभाजनापूर्वी विदर्भ राज्याची निर्मिती करा,अन्यथा विदर्भाची जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष् राम नेवले यांनी दिला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व जनतेनी आंदोलनासाठी तयार राहण्याचे आव्हान राम नेवले यांनी केले.

पेट्रोल डिझेल दरवाढविरुद्ध आंदोलन-

विदर्भ राज्य समितीच्या वतीने आज संपूर्ण विदर्भात जिल्हा व तालूकास्तरावर पेट्रोल-डिझेल व गॅसच्या प्रचंड दरवाढीसाठी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी नारे-निर्दशने करण्यात आली.जिल्हाधिकारी व तालूकास्तरावर एसडीओ,तहसिलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन देण्यात आले.

करोना काळात उद्योग धंदे बंद आहेत.व्यापार,व्यवहार बंद असून गेल्या १५ महिन्यांपासून जनता बेरोजगार आहे.कोरोनाच्या महामारीमुळे दवाखाने,औषधी यामध्ये जनतेचा खिसा हा रिकामा झाला आहे.केंद्र सरकार मात्र देशातील नागरिकांना गुलाम समजून पेट्रोल,डिझेल व गॅसच्या दरवाढीतून त्यांना लृटत आहे.जनता आता हे सहन करणार नाही.भाजपच्या केंद्र सरकारने या सर्व दरवाढी त्वरीत मागे घ्याव्या अन्यथा विदर्भातील जनता भाजपच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा आक्रोश आजच्या आंदोलनातून विदर्भ राज्य आंदोलन समितीने निदर्शनास आणून दिला.

विदर्भ राज्य आंदोलन समिती शहर शाखेतर्फे नागपूरात आज विदर्भ चंडीका,शहीद चौक येथे समितीचे पदाधिकारी यांनी रस्त्यावर उभे राहून प्रचंड नारे निदर्शने केली.हातात फलक व जय विदर्भाचे झेंडे घेऊन पेट्रोल डिझेल दवाढ मागे घ्या’’वा रे मोदी तेरी सरकार पेट्रोल डिझेल छू रहे आसमान’‘लृट लिया लृट लिया,मोदी तुमने लृट लिया,सारे जनता को लृट लिया’‘वेगळा विदर्भ झालाच पाहीजे’‘विदर्भ आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’ आदी घोषणांनी शहीद चौक दणाणून टाकला.

यावेळी शहीद चौकात पार पडलेल्या बैठकीत राम नेवले यांनी कार्यकत्यांना आवाहन केले,केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ मागे घ्यावी,विदर्भ राज्याची निर्मिती करावी व राज्य सरकारने कोरोना काळातील वीज बिलातून विदर्भातील जनतेला मुक्त करावे अन्यथा ९ ऑगस्ट क्रांती दिवसापासून संपूर्ण विदर्भात मोठे आंदोलन छेडण्यात येईल.

बैठकीत राम नेवले यांच्या सह युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष् मुकेश मासुरकर,प्रशांत जयकुमार,गुलाबराव धांडे,विणा भोयर,नंदकिशोर बोंद्रे,सचिन लोणकर,गणेश शर्मा आदींची भाषणे झाली.

या आंदोलनात रेखा निमजे,सुनिता येरणे,तात्या मत्ते,नरेश निमजे,रविंद्र भामोडे,ज्योती खांडेकर,प्रशांत मुळे, विक्की पाठक,उषा लांबट,शोभा येवले,अनिलकुमार केशरवाणी,नौशाद हुसेन,अन्ना राजेधर,विजय मौदेकर,राजेंद्र सतई,प्रशांत तागडे,संगीता अंबारे,भरत बाव्हीस्टाले, माधुरी चव्हाण,समिक्ष्ा मासुरकर,संजय जिभे,शादाब खतीब,हेमंत चकोले आदींनी सहभाग नोंदवला.

Latest बातम्या