फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधक्कादायक!मनपाचे अतिरिक्त आयुक्त अधिकाराविनाच करीत होते बिलांवर स्वाक्ष् -या!

धक्कादायक!मनपाचे अतिरिक्त आयुक्त अधिकाराविनाच करीत होते बिलांवर स्वाक्ष् -या!

Advertisements

आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशाने आरोग्य विभाग पुन्हा राम जोशींकडे!

जुलै २०२० मध्येच मुंढेंनी काढला होता राम जोशींकडून आरोग्य विभाग!

नागपूर,ता. ११ जून: माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आयुक्त पदी असताना त्यांनी मनपात मुख्यालयातील प्रशासनात अनेक महत्वाचे बदल केले होते त्यात एक महत्वाचा बदल म्हणजे त्यांनी तात्काळ आदेशाने अति.आयुक्त राम जोशी यांच्याकडून आरोग्य विभाग काढून घेतला होता मात्र तरीदेखील गेल्या दीड वर्षांपासून राम जोशी हे आरोग्य विभागाच्या प्रत्येक बिलावर स्वाक्ष् री करीत होते याचा अर्थ त्यांनी नियमबाह्यरित्या ते आरोग्य विभागाचा कार्यभार पाहत होते का?अशी चर्चा आता मनपात चर्चिली जात आहे.

विशेष म्हणजे आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी बुधवार दि.९ जून २०२१ रोजी नव्याने आदेश काढत विविध विभागामध्ये कामाकाजाची जवाबदारी निश्‍चित करणारे परिपत्रक काढले.प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणयाच्या हेतूने हे आदेश पारित करण्यात आले.

३१ जुलै २०२० रोजी तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश परित करी आयुक्त,अति.आयुक्त(सामान्य)अति.आयुक्त(शहर)व अति.आयुक्त(सेवा)यांच्याकडे विविध विभागांची विभागणी केली होती.मुंढे यांच्या बदलीचे आदेश २७ ऑगस्ट २०२० रोजी मनपात येऊन धडकले होते हे विशेष!तत्पूर्वी त्यांनी अति.आयुक्त राम जोशी यांच्याकडून आरोग्य विभाग काढून घेतला असल्याची चर्चा आहे.राधाकृष्णन बी.यांनी १ सप्टेंबर २०२१ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.

राधाकृष्णन.बी यांनी मात्र ९ जून २०२१ रोजी काढलेल्या आदेशाप्रमाणे आयुक्त,अति.आयुक्त(सामान्य)अति.आयुक्त(शहर)व अति.आयुक्त(सेवा)यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागांमध्ये फेरबदल करण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्याचे नमूद करीत आरोग्य विभागाची जवाबदारी पुन्हा राम जोशी यांच्याकडे सोपवली!जर राम जोशी यांच्याकडे पूर्वीपासूनच ही जवाबदारी होती तर पुन्हा नव्याने परिपत्रकात तसे नमूद करण्याची काय आवश्‍यकता होती?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

कामात सुसूत्रता आणण्यासाठी या सर्व अति.आयुक्तांकडे विभागांची विभागणी करण्यात येत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले असून अति.आयुक्त राम जोशी(शहर) यांच्याकडे अतिक्रमण व्यवस्थान विभाग,सचिवालय विभाग, अग्निशमन विभागासह आरोग्य विभाग(वैद्यकीय)सोपवण्यात आले,याचा अर्थ आरोग्य विभाग या पूर्वी राम जोशी यांच्याकडे नव्हता का?असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

आयुक्तांकडे सामान्य प्रशासन विभाग,नगररचना विभाग,वित्त व लेखा विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग तसेच पर्यावरण विभागाचा कारभार असून अति.आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे शिक्ष् ण,माहिती व तंत्रज्ञान,उद्यान व वृक्ष् प्राधिकरण,शहर वाहतूक(नियोजन)व व्यवस्थापन व कर विभागाचा कार्यभार असून,अति.आयुक्त संजय निपाणे(सेवा)यांच्याकडे समाजविकास,विद्युत,घनकचरा व्यवस्थापन,लेखा परिक्ष् ण व मालमत्ता विभागाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्या १५ महिन्यांपासून नागपूर शहरात कोविडचा प्रकोप हा दोन्ही लाटेत चरम बिंदूवर होता,अश्‍यावेळी आरोग्य विभाग याची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण होती.करोना आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात केंद्र व राज्यांकडून आपत्ती व्यवस्थानासाठी मनपाला जवळपास ४० ते ५० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला असल्याची चर्चा आहे.

नागपूरकर जनतेला मात्र या निधीचा कोणताही उपयोग झाला नसून साधे ऑक्सीजन बेड्स ही वेळेवर मनपाच्या दवाखान्यात उपलब्ध होऊ शकले नाहीत,हे वास्तव आहे.मनपाच्या याच दवाखान्यांची अवस्था बघून तत्कालीन मनपा आयुक्त यांनी महाराष्ट्राच्या उपराजधानीतले मनपा रुग्णालये हे अक्ष् रश: ‘उकीरडे’असल्याची खोचक टिका केली होती.

गेल्या १५ वर्षांपासून मनपात भारतीय जनता पक्ष्ाची सत्ता आहे मात्र आरोग्याच्या दृष्टिने प्राथमिक उपचारही देण्यास मनपाचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरले आहेत.मुंबई,ठाणे या शहरातील महापालिकेच्या दवाखान्यात ह्दयांच्या देखील शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात,नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्यातून साधे अपेन्डिक्सची शस्त्रक्रिया देखील केली जात नाही, एक्सरे करणारी एक्सरे मशीन देखील मनपा रुग्णालयात उपलब्ध नाहीत.

अश्‍यावेळी करोना आपत्तीकाळात केंद्र व राज्यांकडून जो कोट्यावधीचा निधी मिळाला तो तरी किमान मनपाच्या दवाखान्यांची दशा सुधारण्यासाठी उपयोगी पडायला हवा होता मात्र ‘भ्रष्टाचाराची कीड’ ही कितपत मनपाच्या आरोग्य विभागाला लागली आहे,त्याचे वाभाडेच काल गुरुवार दि. १० जून रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी पत्र परिषदेत काढले होते.कोविड काळात सेनिटायझर खरेदी,मास्क खरेदी,रेमडिस्विहर खरेदी,ऑक्सीमीटर खरेदी, पीपीई किट इ.साहित्यांच्या पुरवठादारांना ‘अवास्तव’ बिले देणे,कोविड केअर केंद्रे,विलगकरण केंद्रे,कनटेन्टमेंट झोनमध्ये टिनांचे शेड लावण्याचे कंत्राट,विलगीकरण केंद्रात चहा,नाश्‍ता,जेवणाचा पुरवठा इ. प्रत्येक बाबींचे आरोग्य विभागाने काढलेले बिल हे सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारे आहेत.या सर्व बाबींवर केंद्र व राज्यांकडून मिळणा-या पैशांचा अपहार करण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप संपूर्ण पुराव्यानिशी आभा पांडे यांनी काल केला होता.

अश्‍यावेळी ‘दूभती गाय’ ठरणा-या आरोग्य विभागाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी काढून घेतल्यानंतर देखील आजपर्यंत संपूर्ण बिलांवर अति.आयुक्त राम जोशी यांच्या स्वाक्ष-या कश्‍या?हा प्रश्‍न मनपा मुख्यालयाच्या वर्तुळात आता चर्चिल्या जात आहे.

राम जोशी यांनी आयुक्त राधाकृष्णन बी.यांना अंधारात ठेऊन आजपर्यंत हा कार्यभार केला आहे का? व आता पुन्हा कायदेशीररित्या हा विभाग आयुक्तांकडून पुन्हा मिळवला आहे का?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.मुंढे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाच्या प्रत्येक गोष्टीत राम जोशी यांची ढवळाढवळ असल्यामुळेच मुंढे यांनी त्यांच्याकडून हा विभाग काढून घेल्याचे बोलले जात आहे.अतिशय शिस्तप्रिय समजल्या जाणारे मुंढे यांनी ठोस कारणाशिवाय हा विभाग राम जोशी यांच्याकडून काढून घेतला नसावा,अशी देखील खासगीत चर्चा आहे.

अश्‍या वेळी राम जोशी यांच्याकडे या विभागाची सूत्रेच नसताना त्यांच्या आजपर्यंत बिलांवर स्वाक्ष् -या कश्‍या?किंवा राम जोशी यांना पुन्हा आरोग्य विभागाची जवाबदारी सोपवण्या मागे आयुक्त राधाकृष्णन बी.यांनाच आपल्यावरची जवाबदारी झटकायची होती,अशी देखील चर्चा मनपात रंगली आहे.

अधिकृतरित्या जरी मनपाच्या आरोग्य विभागाशी संबधित साढे चार कोटींचा घोटाळा गाजत असला तरी वास्तवतेत हा चाळीस कोटींचा घोटाळा असल्याचे खासगीत बोलले जात आहे!या ४० कोटींंपैकी १५ कोटी मनपाचे स्वत:चे असून ‘एक हात से दे दूसरे हात से ले’वाला कारभार यात दडला असल्याचे उघडपणे आता बोलले जात आहे.खरंच मनपाचे स्वत:चे असलेले १५ कोटी तरी नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ‘सत्कारणी’लागतील की त्याचा ही हिशेब ‘बिलांवर काही वास्तवतेत काही‘असा ‘अवैधच’राहील,असा प्रश्‍न नागपूरकरांना आता पडला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या