फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजझाडे लावा, मोफत ऑक्‍सीजन मिळवा: निःस्वार्थने केले पर्यावरण दिनाला वृक्षारोपण

झाडे लावा, मोफत ऑक्‍सीजन मिळवा: निःस्वार्थने केले पर्यावरण दिनाला वृक्षारोपण

Advertisements

नागपूर, ५ जून : कोरोना काळात ऑक्‍सीजनची इतकी कमतरता भासली की लोकांना त्‍यासाठी पैसा खर्च करावा लागला. झाडे लावली तर अखंडपणे आपल्‍याला मोफत ऑक्‍सीजन मिळत राहील, या भावनेने नि:स्‍वार्थ सेवा फाउंडेशनच्‍यावतीने पर्यावरण दिनाला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्‍यात आले.

मागील सात वर्षांपासून सतत सामाजिक कार्यासाठी स्‍वत:ला वाहून घेतलेल्‍या नि:स्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन आजपर्यंत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, गाव सौंदर्यीकरण असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले व श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्‍ते सुमारे ५०  वृक्ष लावण्यात आले.

निःस्वार्थ परिवार हे फक्त झाड लावीत नाही तर त्या झाडाचे संगोपन देखील करतात. निःस्वार्थचे कार्य उत्कृष्‍ट आहे. सचिन घोडे हे समाजकरिता अविरत निस्वार्थ सेवा देत आहे, असे उद्गार यावेळी तहसीलदार मोहन टिकले यांनी काढले.

निःस्वार्थचे संस्थापक सचिन घोडे यांच्‍यासह माजी सरपंच कमलाकर शेंडे, उपसरपंच अभय भगत, निःस्वार्थ संयोजक गोपाल हटवार,शुभम हटवार,प्रशांत घोडे, संकेत घोडे, दिलीप काष्टे, सौरभ भगत, सुमित आकरे, तुषार देशमुख,मयूर धरमारे, सुमित मेश्राम, कुणाल हटवार,चद्रकांत काष्टे, सचिन गायधने, हरीश बाळबुधे, मनोज चरडे, प्रथमेश काष्टे, अनिकेत मेश्राम, रोशन चरडे, प्रणय चरडे, साहिल भगत, विनोद मोरे, सुरज शिंदे, हर्षाली घोडे, प्रीती गजभिये, सीमा काष्टे, मनीषा घोडे, वैशाली वैद्य, सुजाता भगत, सुरेश घोडे, लक्ष्मण बाळबुधे, शंकर ठाकरे, प्रशांत लांडगे ,सुरेश वरठी, उत्तम मेश्राम, रामकुमार, गजानन लुंगे यांचे सहकार्य लाभले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या