
पालकांची ‘शिक्ष् णाकिधारी हटाव नागपूरचे शिक्ष् ण बचाव’ मोहीम
नागपूर,ता. ५ जून: करोना महामारीच्या प्रादुर्भावाने सर्वाधिक भरडला गेला तो सामान्य मध्यमवर्गीय माणूस.एकीकडे रोजगार गेले,कामधंदे बंद झाले,उत्पन्न थांबले मात्र दैनदिन खर्च हे ‘आ’वासून मात्र त्याच्या मागे जसे त्या तसे कायम राहीलेत.यात आरोग्याच्या गंभीर बाबीसोबतच आपल्या पाल्यांच्या शैक्ष् णिक भवितव्याचा प्रश्न देखील निगडीत झाला.अश्यावेळी खासगी शाळांद्वारे पालकांची होणारी आर्थिक कुचंबना ही देखील तेवढीच तापदायक आणि त्रासदायक ठरली असताना शिक्ष् णाधिकारी यांच्यासारख्या अधिका-यांची पालकांसोबत तुच्छ वागणूक ही पालकांचा संताप आणखी वाढवणारी ठरली.
शहरातील काही नामांकित शाळांनी शुल्क न भरणा-या विद्यार्थ्यांच्या घरीच त्यांची टीसी पाठवण्याची अमानवीय आणि असंवेदनशील कृती केली.त्यामुळे पालक हे चांगलेच संतप्त झाले.जागरुक पालक पारिषदेने शिक्ष् णाधिकारी चिंतामण वंजारी यांची भेट घेतली.
सध्या शाळा बंद असून ऑनलाईन क्लास सुरु आहेत तरीही शाळांकडून मनमानेल त्याप्रमाणे शाळा संचालकांकडून शुल्क आकारले जात आहे यामुळे पालकांमध्ये चांगलाच रोष आहे.अनेक शाळांपुढे आंदोलने सुरु आहेत.अशातच विद्यार्थ्यांच्या घरी चक्क टीसीच पाठवल्याने पालक थक्क झाले .आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी चिंतातूर झालेल्या पालक हे शाळांच्या या अश्या असंवेदनशील कृतीमुळे चांगलेच भडकलेत.
पालक संघटनांनुसार,शिक्ष् णाधिकारी वंजारी यांनी त्यांना गुरुवारी सकळी ११ वाजता बैठकीसाठी वेळ ही दिला होता.सकाळी पालक आपले सर्व काम धंदे सोडून शिक्ष् ण उपसंचालक कार्यालयात ही पोहोचले,पण शिक्ष् णाधिकारी हे चक्क अनुपस्थित हाेते.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत एवढ्या गंभीर प्रश्नासंबधी शिक्ष् णाधिकारी यांनाच गांर्भीय नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.शाळांचे शुल्क हे थोडेफार प्रमाणात जरी असते तर उधार उसणवारी करुन शुल्क भरता आले असते मात्र अनेक शाळांनी पालकांना १६ ते २० हजारांच्या घरात पहील्या तिमाहीचे शुल्क भरण्यास सांगितले!
आधीच बेरोजगारी व आर्थिक संकटांशी झुंजणा-या पालकांसमोर आपल्या पाल्यांच्या भवितव्याबाबत पराकोटीची भीती दाटून आली.अश्यावेळी शिक्ष् णाधिकारी यांच्यासारख्या जवाबदार अधिका-याकडून पालकांना न्यायाची अपेक्ष्ा होती.मात्र पालकांचा रोष बघून पोलिसांचे पथक उपसंचालक कार्यालयात बोलावण्यात आले.पोलिसांनी पालकांचे व शिक्ष् णाधिकारी यांचे दूरध्वनीवरुन बोलणे ही करुन दिले पण शिक्ष् णाधिकारी यांनी अशी बैठकच बोलाविली नसल्याचे पोलिसांना कळवले!
शिक्ष् णाधिकारी बैठकीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत पालक चांगलेच संतापले.जोपर्यंत शिक्ष् णाधिकारी कार्यालयात येऊन तोडगा काढणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातच ठिय्या देणार असा निर्धार पालकांनी केला.
दरम्यान,शिक्ष् ण उपसंचालक डॉ.वैशाली जामदार या कार्यालयात पोहोचल्या.त्यांनी शिक्ष् णाधिका-यांना कार्यालयात बोलावून घेतले.जवळपास ३ तास पालक कार्यालयातच ठाण मांडून होते.अखेर शिक्ष् णाधिकारी चिंतामण वंजारी कार्यालयात पोहोचले.त्यांनी पालकांना शाळांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले.त्यानंतरच पालकांनी कार्यालय सोडले.
मात्र २४ तास ही उलटत नाही तोपर्यंत हे आश्वासन हवेत विरले.यामुळे काही पालकांनी कार्यालय गाठून शिक्ष् णाधिकारी यांना जाब विचारला,मात्र शिक्ष् णाधिकारी यांची देहबोली व अधिकार पदाची गुर्मी पालकांवर भारी पडली!
जे करायचे आहे ते करा,माझ्यावर गुन्हा दाखल करा,अशी गुर्मी शिक्ष् णाधिकारी यांनी पालकांना दाखवल्याचा व्हिडीयो आज सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला.पालकांच्या न्याय प्रश्नांना बगल देत या शिक्ष् णाधिका-यांनी चक्क आपल्या कार्यालयातूनच पळ काढला!कोणताही न्याय तोडगा न काढता जवाबदारीपासून पळ काढणा-या या शिक्ष् णधिका-यांचा पगार मात्र अगदी वेळेवर मायबाप सरकार त्यांच्या खात्यात जमा करेल!हा पैसा शेवटी कर भरणा-या जनतेचाच असतो एवढी देखील जाणीव शिक्ष् णाधिका-यांनी ठेवण्याचे सौजन्य दाखवले नाही.या देशात ‘नोकरशाही’किती मुजोर झाली आहे,हे करोना काळात अधिक ठलकपणे अधोरेखित झाले,एवढंच!
पाल्य आणि पालक यांच्यातील भावनिक नाते,पाल्यांच्या शिक्ष् णाचा झालेला खेळखंडोबा,पालकांची करोनामुळे झालेली आर्थिक कुचंबना हे समजून घेण्याची पात्रता जर मायबाप सरकारला व या सरकारच्या ‘पात्र’अधिका-यांजवळ नसेल तर करोना महामारीचा जोर ओसरल्यावर व आर्थिक बाबीत स्थिरस्थावर झाल्यावर हेच पालक मतदार म्हणून या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,असे खासगीत बोलल्या जात होते.
वेळेवर आरोग्य सुविधा मिळाली नाही,ऑक्सीजन,औषधे पुरविण्यात मायबाप सरकार चक्क अपयशी ठरलीत.कुटुंबात मृत्यूचे सत्र अनुभवले.त्या त्रासदीतून मुक्त होत नाही तर खासगी शाळांनी या आपत्तीकाळाचे कोणतेही भान न ठेवता,पालकांना पाल्यांच्या फि साठी वेठीस धरले अश्यावेळी सरकार म्हणून, जवाबदार अधिका-यांवर शिक्ष् ण मंत्री वर्षा गायकवाड कारवाई करतील का?अश्या मुजोर शिक्ष् णाधिका-यांची उचलबांगडी करतील का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
