फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगरजू कलावंतांना माजी महापौरांचा मदतीचा हात

गरजू कलावंतांना माजी महापौरांचा मदतीचा हात

Advertisements

ऑस्कर संगीत अकादमीच्या गरजू कलावंतांना केले धान्य किटचे वाटप

नागपूर,ता. १ जून: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी महापौर संदीप जोशी यांनी सेवा प्रकल्पाची घोषणा केली होती,याच दिवशी एकूण २०० गरजू कलावंतांना तसेच क्रीडा प्रशिक्ष् कांना धान्य किटचे वाटप केल्या जाईल असे देखील सांगितले होते.

शहरातील शासन दरबारी नोंदणीकृत अश्‍या ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीने संदीप जोशी यांना त्यांच्या अकादमीतील काही अत्यंत गरीब व गरजू कलावंतांना देखील ही मदत मिळावी म्हणून विनंती केली होती,या आवाहनाला प्रतिसाद देत माजी महापौरांनी ऑस्करच्या गरजू कलावंतांना नुकतेच धान्याची किट वाटप करुन मदतीचा हात दिला.

१ जून रोजी मेडीकल येथील पं.दिनदयाल उपाध्याय थाली वाटप केंद्रात गरजू कलावंताना सकाळी ११ वाजता माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले.गेल्या संपूर्ण वर्षभर तसेच २०२१ मधील देखील ६ महिने उलटले तरी सरकारने अद्याप सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली नसल्याने शहरातील अनेक कलावंतांच्या घरी अक्ष् रश: उपासमार घडतेय.
दररोजचा प्रंपच कसा चालवावा,आपल्या चिल्यापिल्यांच्या तोंडी कसा घास भरवावा या विवंचनेत शहरातील हा स्वाभिमानी कलावंत पूरता निराश झाला आहे.अश्‍यावेळी समाजातील दानदात्यांकडूनच त्यांना मदतीची अपेक्ष् असते.संदीप जोशी यांनी गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गरजू कलावंतांच्या मदतीचे तसेच क्रीडा प्रशिक्ष् कांना हातभार लावण्याची घोषणा केली असता या कलावंतांच्या आशा पल्लवीत झाल्या.

ऑस्कर अकादमीने संदीप जोशी यांना अत्यंत हलाकीच्या स्थितीत आयुष्य कंठत असलेल्या कलावंतांना मदतीचे आवाहन केले असता त्यांच्या या अावाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत संदीप जोशी यांनी ऑस्करच्या ३० कलावंतांना धान्य किटचे वाटप केले.यामध्ये भाेयर हे गायक तर चक्क ही मदत स्वीकारण्यासाठी रणरणत्या उन्हात पायी चालत मेडीकलमधील या केंद्रावर आले होते!अशीच आणि एवढीच हलाकीची स्थिती आज शहरात अनेक कलावंतांची झाली आहे.

वैशाली कारमोरे या नृत्यांगनाला पती नसून लहानशी ३ वर्षाची मुलगी आहे.ऑकेस्ट्राचे शो बंद झाल्याने त्यांच्यासमाेर देखील जगण्याची व जेवणाची भ्रांतच होती.पुष्पलता भोर या गायिकेचा मागच्या लॉकडाऊनमध्ये अपघात झाल्याने त्यांचा पायच जायबंद होता.त्यांना देखील माजी महापौर यांच्या मदतीमुळे आधार मिळाला.किरण दीडशे या गायिकेला देखील पती नाही लहान मुलगा आहे.अश्‍या अनेक अत्यंत गरजू आॅस्करच्या कलावंतांना या धान्य किट देण्यात आल्या.

सुरक्ष्ति अंतराचे सर्व नियम पाळत ऑस्करचे फक्त आठ गरजू सदस्य या मदत वाटप केंद्रात उपस्थित होते.उर्वरित धान्य किट ऑस्करचे सहसचिव शेखर शामकूंवर यांना सुपुर्द करण्यात आले.कलांवंत जगतात माजी महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या मदतीचा हात याबाबत आभार व्यक्त केला जात आहे.

आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे आभार मानतो:पी .कुमार(अध्यक्ष्,ऑस्कर संगीत अकादमी)
माजी महापौर संदीप जोशी यांनी शहरातील ज्या पाल्यांनी आपले पालक करोनामुळे गमावले आहेत अश्‍या पाल्यांची जवाबदारी ‘सोबत’या संस्थेच्या सोबतीने स्वीकारली.त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी शहरातील कलावंतांना देखील मदतीचा हात देण्याची घोषणा केली होती.ऑस्कर संगीत अकादमीने त्यांना ऑस्करच्या अत्यंत गरीब व गरजू कलावंतांना देखील मदतीचा हात देण्याची विनंती केली होती.या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आमच्या ३० कलावंतांना धान्य किटचे वाटप केले यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच माजी महापौर म्हणून तसेच जनतेचे लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून ते सदैव या पुढे देखील कलावंतांच्या पाठीशी असेच उभे राहतील अशी आशा बाळगतो.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या