फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजझोन सभापतींंची कार अन्‌ जनतेला पडलेला प्रश्‍न!

झोन सभापतींंची कार अन्‌ जनतेला पडलेला प्रश्‍न!

Advertisements

भर दूपारी बर्डी मार्केटमध्ये दोन तास मुलांची भटकंती

नागपूर,ता. १७ मे: सध्या नागपूर महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कारणाने गाजेल याचा कोणताही नेम राहीला नाही, करोना,खाटा,रेमडिसीव्हिर,ऑक्सीजन,लसीकरण, मुख्यमंत्र्यांना लसीकरणासाठी लिहलेले पत्र, मनपात सत्ता असतानाही चौका चौकात बंगालमधील हिंसेसाठी केलेले मूक आंदोलन,हे सर्व करोनाने पीडीत आणि मनपा सत्ताधा-यांच्या प्रतारणेने पीडीत नागपूरकर जनता आपले आप्त-स्वकीयांचे प्राण गमावून मूकपणे बघतच होती यात आज आणखी एका आश्‍चर्यजनक घटनेची भर पडली.

भर दूपारी २ वाजता नेहरु नगरच्या झोनच्या सभापती स्नेहल बी.बेहरे यांची शासकीय गाडी अचानक बर्डी मेनरोडवर सर्वदूर लॉकडाऊनमुळे शुकशुकाट असताना येऊन थांबली.शासकीय गाडी असल्याने वाहनातून शासकीय व्यक्ति किवा राजकीय पदाधिकारीच खाली उतरतील अशी जनतेला अपेक्ष्ा होती मात्र….शासकीय वाहनातून उतरली तीन युवा मुले!

विशेष म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तशी अगदी फॉर्मल वस्त्र परिधान करुन, ही तीन युवा मंडळी तब्बल दोन तास बंद बर्डी मार्केटच्या सर्व दूकानांसमोर फिरस्ती करीत होती.मोदी नं ३ ची संपूर्ण गल्ली पालथी घातल्यानंतर मेनरोडवर ही युवा मंडळी आली.
जनतेला ही कोडं पडलं,नेमकी ही मंडळी शोधतेय काय?ते ही रणरणत्या उन्हात तब्बल दोन तास!अनेकांचे मोबाईल कॅमरे त्यांच्यावर फोकस झाले,वाहन चालकाच्या हे लक्ष्ात आले त्याने लगेच शासकीय गाडी तेथून दामटली.

सीताबर्डी पोलीस ठाण्यापासून फेरा मारुन जानकी टॉकिज समोर आणली व युवा मंडळीला घेऊन धूम ठोकली!

झोन सभापतीचे पद हे मिनी ‘महापौरांचे’पद समजलं जातं.नेहरु नगरच्या झोन सभापतींचे वाहन भर उन्हात लॉकडाऊन असताना व बर्डीवर शुकशुकाट असताना नेमकी कशासाठी हजर झाली?यावर आज सोशल मिडीयवर चांगलीच चर्चा रंगली.

अनेकांनी भाजपच्या कारभारावर चांगलेच ओरखडे उमटवले.सभापती यांना हक्क आहे ते केव्हाही,कुठेही शासकीय किवा राजकीय कामांसाठी हजर राहू शकतात,वाहनांचा उपयोग करु शकतात,मात्र शुकशुकाट असलेल्या बर्डी मेनरोडवर शासकीय वाहनातून तीन युवा मंडळी त्यात दोन तरुण व एक तरुणी उतरतात तर…चर्चा तो होनी ही थी!

मनपाने ८० खासगी एंजसीकडून मनपा अधिकारी व पदाधिका-यांना वाहन पुरविण्याचा कंत्राट केला आहे.यात पेट्रोल,वाहनाचे मॅन्टनेंस व वाहन चालक हा खर्च अंतर्भुत आहे.प्रत्येक वाहनामागे जवळपास २८ हजार रुपयांची देयके मनपाचे लेखा व वित्त विभागाकडून दर महा वाहन मालकांना दिल्या जातो.

२८ हजार महिन्याकाठी खर्च हाेणारा हा पैसा नागपूरकर जनतेच्या कष्टाच्या कराच्या पैश्‍यातून होत असतो त्यामुळे सभापती असो किवा मनपाचा इतर कोणताही अधिकारी,शासकीय वाहनांचा उपयोग खासगी कामांसाठी करु नये,असे अपेक्ष्ति असते,शासकीय वाहनातून तीन तरुण मंडळी ही जेव्हा रणरणत्या उन्हात बर्डी मेनरोडवर उतरते तेव्हा आम जनतेचे लक्ष् त्यांच्याकडे जाणे स्वाभाविक ठरतं.

वाहन चालकाच्या लक्ष्ात ते ट्रॅप होत असल्याचे लक्ष्ात येताच वाहन घेऊन पळ ठोकणे आणखी संशयाला वाव देणारे ठरले,म्हणूनच आज दिवसभर नेहरु नगर झोन सभापतींचे हे शासकीय वाहन आज सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरले.

अनेकांनी ‘खरेदी की वसूली‘येथपर्यंतची टिका केली.याबाबत ‘सत्ताधीश’ने नेमके कारण समजून घेण्यासाठी नेहरु नगर झोन सभापतींना अनेक वेळा फोन लावला मात्र कॉल रिसिव्हि झाला नाही.करोना महामारीच्या काळात झोन सभापतींचा फोनच रिसिव्ह होत नसेल तर करोना संसर्गाने गलितगात्र झालेल्या सामान्य जनतेला त्या वेळेवर किती मदत करत असतील हे ही निर्दशनास आलं.

सर्वात महत्वाचे म्हणजे विनाकरण रस्त्यांवर फिरणा-यांकडून मनपाचे उपद्रव शोध पथक दररोज लाखोंचा दंड वसूल करते,मग झोन सभापतीच्या वाहनातून उतरलेल्या व विनाकरण शुकशुकाट असलेल्या दूकानांसमोरुन तब्बल दोन तास भटकंती करणा-या तरुणाईकडून मनपाचे उपद्रव शोध पथक आता दंड वसूल करेल का?असा प्रश्‍न विचारला जात आहे.सत्ताधा-यांना एक न्याय व सर्वसामान्य जनतेला वेगळा न्याय हे योग्य आहे का?असा संताप देखील माध्यमात उमटला.

थोडक्यात मनपा सत्ताधा-यांच्या कोणत्याही कृतीवर नागपूरकर जनतेचा पराकोटीचा रोष प्रकट होत असल्याचे वास्तव समाेर आले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या