फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज४५ वर्षावरील नागरिकांचे रविवारी लसीकरण

४५ वर्षावरील नागरिकांचे रविवारी लसीकरण

Advertisements

नागपूर, ता. १५ : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना रविवारी १६ मे रोजी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दूसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करुन दिले आहे. मनपाच्या सर्व ९६ केन्द्रांवर लसीकरण केल्या जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दूसरा डोज दिला जाणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे कोव्हॅक्सीनचा फक्त दूसरा डोज उपलब्ध आहे. तसेच १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण राज्य शासनाचे निर्देशानुसार सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली.

केन्द्र शासनाच्या नविन निर्देशानूसार आता कोव्हिशिल्डचा दुसरा डोज १२ ते १६ आठवडयाच्या मधात नागरिकांना दयायचे आहे. म्हणून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्या पुर्वी घेतला त्यांना दूसरा डोज़ दिला जाईल. तसेच ड्राइव इन वैक्सीनशन केंद्रवर ६० वर्ष वरील नागरिकांचा लसिकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या