फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजलज शर्मा यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात संदीप जोशी यांचे उद्या उपोषण

जलज शर्मा यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात संदीप जोशी यांचे उद्या उपोषण

Advertisements

डॉ.राजेश सिंघानियाविरोधात अद्याप कारवाई नाहीच

नागपूर,ता. १४ मे: ‘व्हीम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया यांची एक ऑडीयो क्लिप नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच व्हायरल झाली.यात ते रुग्णाच्या मुलाला जयेश साखरकर याला पाच लाखांच्या बिलाच्या संदर्भात दमदाटी करीत ‘सब हॉस्पीटल्स मे ब्लॅक चल रहा है’अश्‍या स्वरुपाची असंवेदनशील,डॉक्टरकीच्या पेशाला न शोभणारी व माणूसकीला काळीमा फासणारे संभाषण करताना आढळले होते.

खासगी रुग्णालयांवर देखदेख ठेवण्याची मनपाच्या ज्या अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्यावर जवाबदारी आहे त्यांच्याकडे जयेश साखरकर यांनी डॉ.सिंघानियाविरोधात ४ मे रोजी तर माजी महापौर संदीप जोशी यांनी ६ मे रोजी लिखित तक्रार करुन देखील व्हीम्स रुग्णलयाविरुद्ध जलज शर्मा यांनी कोणतीही कठोर कारवाई केली नसल्याने माजी महापौर संदीप जाेशी यांनी उद्या शुक्रवार दि. १५ मे रोजी शर्मा यांच्या कक्षासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे या रुग्णालयाला नोटीस पाठवण्यासाठी देखील जलज शर्मा यांनी ७ दिवसांचा वेळ घेतला.ही नोटीस म्हणजे ‘चोरालाच विचारणे बाबा रे तू चोरी केली आहेस का?’अशी टिका जोशी यांनी केली.जयेश साखरकर व डॉ.सिंघानिया यांच्यात झालेले संपूर्ण धक्कादायक संभाषण लिखित स्वरुपात व शब्दश: पाठवून देखील जलज शर्मा यांनी या रुग्णालयाला फक्त नोटीस पाठवण्याची औपचारिकता पूर्ण केली.

जयेश साखरकर याची तक्रार प्राप्त होताच डॉ.सिंघानिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई जलज शर्मा यांनी पार पाडायला हवी होती मात्र ‘शेतच कूंपण खातंय’ही विदारक परिस्थिती नागपूरकर जनतेवर बघण्याची वेळ आली असल्याचे जोशी यांनी सांगितले.

सब हॉस्पीटल्स मे ब्लॅक चल रहा है भाई!

ज्याप्रमाणे शहरातील खासगी रुग्णालयांनी गरजू आणि गरीब रुग्णांची लृट माजवली आहे ते बघता नोटीस पाठवण्या पलीकडे जलज शर्मा हे काहीही करीत नाही,शर्मा व त्यांनी नेमूण दिलेले ‘ऑडीटर्स’ यांचेच या रुग्णलयांशी साटेलोटे असून ऑडीटर्स हे चक्क लृट करणा-या रुग्णलयांसोबत ‘सेट’झाले आहेत, शहरातील १५ ते २० खासगी रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांची प्रंचड लृट करीत असून, याचे पुरावे देखील जलज शर्मा यांना देण्यात आले तरी देखील ८ दिवस उलटून गेल्यावरही नोटीसीशिवाय शर्मा यांनी या रुग्णालयांवर कोणतीही कारवाई केली नाही.

ही खासगी रुग्णालये करोनाबाधितांचा उपचार चक्क २० टक्के कोट्यातून करीत आहेत,ऑगस्ट २०२० मध्ये शासनाने लागू केलेल्या ८०-२० टक्के कोट्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत याचे देखील पुरावे दिले असताना या रुग्णालयांविरुद्ध कोणतीही कारवाई शर्मा यांनी केली नाही.या सर्व बाबी लक्षात घेऊनच या शहराचा माजी महापौर म्हणून सर्वसामान्य रुग्णांच्या प्रश्‍नाकरिता,त्यांच्या न्याय हक्काकरीता उद्या शनिवार १५ मे रोजी मनपा प्रशासकीय इमारतीतील अति.आयुक्त जलज शर्मा यांच्या कक्षासमोर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लाक्ष् णिक एक दिवसाच्या उपोषणाला बसणार असून त्यानंतरही कारवाई झाली नाही तर गुरुवार दि.२० मे पासून शर्मा यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच लृट करणा-या रुग्णालयांना ज्याप्रमाणे जलज शर्मा हे पाठीशी घालत आहेत त्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ‘आमरण’ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला.

याची संपूर्ण जवाबदारी जलज शर्मा यांच्यावरच राहील याची देखील जाणीव जोशी यांनी शर्मा यांना करुन दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या