फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाछापरु नगर लसीकरण केंद्रावरुन तरुणाईने महापौरांना हूसकावले!

छापरु नगर लसीकरण केंद्रावरुन तरुणाईने महापौरांना हूसकावले!

Advertisements

(करोना विशेष)

महापौर आल्या पावली परतलेत

नागपूर,ता. ६ मे २०२१: १ मे पासून १८ वर्षे वयावरील तरुणाईला केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लसीकरणाला सुरवात झाली मात्र अगदी पहील्याच दिवसापासून नागपूर महानगरपालिका, लसीकरणाची व्यवस्था ही ज्या पद्धतीने हातळत आहे ते बघता तरुणाईमध्ये मनपाप्रति बराच रोष आहे,आज वर्धमान नगर येथील छापरु नगर येथील लसीकरण केंद्रावर महापौर दयाशंकर तिवारी यांना तरुणाईच्या याच रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना घडली.

या केंद्रावर सकाळी ८ वा.पासूनच तरुणाईने गर्दी केली.करोनाच्या भयंकर लाटेमुळे प्रत्येकाच्या मनात जीवाची भीती निर्माण झाली आहे.प्रत्येकाला लस घेऊन जिविताची सुरक्ष्तिता करायची घाई झाली आहे,इतर देशामध्ये लसीकरणाची प्रक्रिया ही जलद गतीने पार पडली असून ब-याच प्रमाणत अन्य देशात करोना आटोक्यात आला आहे.भारतात करोनाची पहीली लाट ही सप्टेंबर २०२० मध्ये आली,यानंतर दूसरी लाट फेब्रुवारी २०२१ मध्ये आली,या लाटेने अनेकांचे जीव घेतले तर लाखांच्या वर संसर्गितांची संख्या झाली,या लाटेने तरुणाईला देखील सोडले नाही,अनेक तरुण हकनाक बळी पडलेत.

१ मे पासून केंद्राने १८ वर्षे वयावरील तरुणाईला लसीकरणाची परवानगी देताच तरुणाईच्या मनात आशेचे किरण फूलले.मात्र नागपूर महानगरपालिकेच्या अत्यंत ढिसाळ कारभारा पुढे तरुणाईचा तीव्र संताप जागोजागी उमटत आहे.याचीच परिणीती आज छापरु नगर लसीकरण केंद्रावर देखील झाली.

सर्वसामान्य जनता मानसिकरित्या पुरती बेजार झाली असताना महापौरांना अाणि मनपा पदाधिका-यांना उद् घाटनाचा सोस आवरता अावरत नसल्याचे दिसून पडतंय.महापौर म्हणून लसीकरण केंद्रांची पाहणी करायचीच असल्यास सकाळी ८ वा.महापौर केंद्र का नाही गाठत?तरुणाईशी संवाद का नाही साधत?त्यांच्या अडचणी का नाही समजून घेत?वेळेवर ११ वा.अगरबत्ती ओवाळायला येत असतील तर तरुणाई आता हे खपवून घेणार नसल्याची टिका समाज माध्यमांवर आज चांगलीच उमटली.

महापौरांनी देखील आजच्या या घटनेतून बोध घेत लसीकरण ही मनपाची ‘जवाबदारी’ आहे,जनतेवर करण्यात येणारा ‘उपकार’नाही,याची जाणीव ठेवीत केंद्रांचे उद् घाटन सोहळे आणि उद् बत्ती ओवाळणे बंद करावे,लसीकरण केंद्रांची पाहणी करुन सर्वसामान्य जनतेला योग्यप्रकारे लसीकरणाची सुविधा मिळत आहे की नाही,फक्त याची काळजी वाहावी,असा सल्ला शहराच्या या प्रथम नागरिकाला देण्यात येत आहे.

१ मे रोजी गांधी नगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात देखील महापौर याच अर्हिभावात लसीकरण केंद्रावर दाखल झाले.तेव्हा देखील सकाळी ८ वा.पासून ताटकळत बसलेली तरुणाई ही महापौर ११ वा.या केंद्रात दाखल होताच चांगलीच भडकली होती.त्यावेळी देखील त्यांच्या उद् घाटन सोहळ्यांची बरीच निंदा नालस्ती समाज माध्यमावर उमटली होती,हे विशेष!

(बातमी संबंधित सर्व व्हिडीयोज ६ मे २०२१ रोजीच्या sattadheesh youtube channel वर उपलब्ध)

………………………………….

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या