
खाजगी रुग्णालयांत होत आहे गरजू रुग्णांची लूट:प्रशासन मौन
रुग्णालयाच्या बिलासाठी आईने ठेवले मंगळसूत्र गहाण!
आम आदमी पक्ष्ातर्फे कार्यवाहीची मागणी.
नागपूर,ता. ३० एप्रिल: हिंगणा महाजनवाडी येथील शक्ती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांना अवास्तव बिल आकारून वेठीस धरण्याचा प्रकार घडला.मागील काही दिवसांपासून शक्ती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाजनवाड़ी, हिंगणा येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहे. हे हॉस्पिटल डॉ देवेंद्र केहकाडे यांचे आहे.

कोरोना संसर्गित रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्या अगोदर रु.१,५०,००० चे पॅकेज आहे असे सांगण्यात येतं व त्यांच्या कडून रु.७०,००० ते रु. ८०,००० अगाऊ रक्कम आकारण्यात येते. बिलाची तपशीलवार माहिती मागितल्यास ‘बिल देणार नाही तुमचे पैकेज होते’ असे सर्रास सांगण्यात येते, ही अक्षरशः रुग्णांची लुबाडणूक आणि आर्थिक लूट आहे. एखाद्या रुग्णाणे बिला करीत आग्रह धरल्यास तर फोटो कॉपी वर स्टॅम्प मारून बिल देतात.

भूषण जगरे या रुग्णाला देखील या रुग्णालयाचा असाच जीवघेणा अनुभव आला असून या रुग्णालयाचे हे पॅकज भरण्यासाठी त्याच्या आईजा ८० हजार रुपयात आपले मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ अाल्याची व्यथा त्याने व्हीडियोद्वारे मांडली आहे.
भूषण जगरे या रुग्णाला ऑक्सीजन लावण्यात आले नाही तसेच वेंटीलेटर सुद्धा लागले नाही, रैमडेसीवीर इंजेक्शन सुद्धा देण्यात आले नाही तरी सुद्धा बिल रु.१,६१,००० झालें. दिलेल्या बिला मध्ये बेड चार्जेस रु.१२००० लावण्यात आले आहे.
शासकीय दर कोरोना रुग्णा साठी रु.४००० पेक्षा अधिक घेता येत नाही तरी सुद्धा सर्विस चार्ज, कंसल्टिंग चार्ज, आर एम ओ चार्ज व मोनेटरिंग चार्ज हे आकारण्यात आले आहे. पीपीई किटचेच १६ हजार रुपयांपेक्ष्ा जास्त बिल या गरीब रुग्णाच्या माथ्यावर मारण्यात आले.
जिल्हा अधिकारी, एसडीओ ग्रामीण, मनपा आयुक्त व पोलिस विभाग यांना शक्ती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महाजनवाड़ी, हिंगणा यांच्यावर योग्य ती कार्यवाहीची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आलेली आहे.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात आपचे शहर सचिव भूषण ढाकूलकर, विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य शाखा उपाध्यक्ष् निहाल बारेवार, विशाल चौधरी, हरीश गुरबानी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
