फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजखासगी रुग्णालयांत रुग्णांची लृट, प्रशासन झक मारतंय का?

खासगी रुग्णालयांत रुग्णांची लृट, प्रशासन झक मारतंय का?

Advertisements


माजी महापौर संदीप जोशी यांचा संताप:सुधरुन जा,दिला इशारा

नागपूर,ता. २८ एप्रिल: शहरात दिवसेंदिवस करोनामुळे आरोग्याची स्थिती ही अतिशय भीषण होत चालली असताना शहरातील काही डॉक्टरांनी मात्र गरजू रुग्णांची अक्ष् रश: लृट चालविली असल्याचा संताप माजी महापौर संदीप जोशी यांनी व्हीडीयोद्वारे व्यक्त केला,एवढंच नव्हे तर या पुढे सुधरुन जा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचा प्रशासनाला इशारा देखील त्यांनी दिला.

या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही वैद्यकीय अधिकारी,प्रशासकीय अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. मात्र असे असताना देखील एकीकडे काही प्रामाणिक डॉक्टर्स व रुग्णालये चांगले काम करीत आहे त्याचवेळी दूसरीकडे काही रुग्णालयांनी मात्र डिपॉझिटच्या नावाखाली ‘मृतांच्या टाळूवरचे लोणी’खाण्याचे काम सुरु केले असल्याची गंभीर टिका त्यांनी केली.

आपल्या आरोग्य मंत्र्यांचे निर्देश आहे कोणत्याही रुग्णाकडून एक ही पैसा अनामत रक्कम ही घेता येणार नाही आधी उपचार सुरु करा अन्यथा आम्ही कारवाई करु मात्र आरोग्य मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून शहरातील अनेक खासगी रुग्णालये ही त्यांच्या दारावर येणा-या गरजू रुग्णांकडून अनामत रक्कम आधी वसूल करताना दिसतेय.सर्वदूर हीच लृट चालू आहे याची काय प्रशासनाला कल्पना नाही?प्रशासन काय झक मारतंय का?

ही अनामत रक्कम तरी किती असावी?तर लाखो रुपये!बिले ही किती काढतात?तर फक्त तीन दिवसांचे अडीच ते तीन लाख बिल?एका दिवसाचे दीड लाख बिल?

प्रशासनाने मार गाजावाजा करुन खासगी रुग्णालयांमध्ये ऑडिटर बसवले मात्र भ्रष्टचाराला सोकावलेले हे ऑडिटर यांनी गरीब,गरजू रुग्णांची बाजू घ्यायची तर खासगी रुग्णालयांकडूनच टक्केवारी घेऊन रुग्णालयांशी ‘सेट’झालेले दिसतात,असा घणाघाती आरोप माजी महापौरांनी केला.वरुन त्यांना तोंड वर करुन हे सांगायला देखील लाज वाटत नाही,ज्या ऑडिटर्सला या आपातकालीन महामारीच्या काळामध्ये गरीब,गरजू रुग्णांची बाजू घ्यायची तर ते रुग्णालयांची बाजू घेतात!

अतिशय बेशरम अशी ही काही खासगी रुग्णालये आहेत आणि ऑडिटर हे जर असे ‘सेट’झाले असतील तर ही अतिशय लाजिरवाणी बाब असून प्रशासनाला एकच विनंती करतोय अश्‍या ऑडीर्ट्सला सांभाळून ठेवा.नियम हा आहे ही संपूर्ण खासगी रुग्णालये ही ८०-२० टक्क्यांनी चालावी.कोविडच्या या काळात ८० टक्के खाटा या कोविडच्या शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच रुग्णांना लाभतील,फक्त २० टक्के खाटा या खासगी रुग्णालयांना व्यवसायिक दराने देता येणार आहेत.

मात्र या पद्धतीने ही रुग्णालये चालताना दिसत नाही,यानंतर असे आम्ही चालू देणार नाही म्हणजे नाही ,माजी महापौरांनी कडक शब्दात प्रशासनाला सज्जड दम दिला.

नागपूरात खरोखरंच काही चांगल्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या प्रामाणिकपणे काम करतात यात स्वच्छ असोसिशएन असेल,कॅग असेल किवा सिटीजन फोरम असेल किवा युवा मोर्चा असेल,अश्‍या काही संस्था या प्रामाणिकपणे काम करतात आहेत.या पुढे या संस्थांच्या खांद्याला खांदा लावून मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी ४ मोबाईल क्रमांकांवर नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले.या ४ क्रमांकावर केव्हाही आपले विनंती पत्र,अर्ज नागरिकांनी टाकावे,बिले टाकावी.याशिवाय मनपा मुख्यालयातील सत्ता पक्ष् कार्यालयात दररोज ४ ते ६ दरम्यान मी स्वत: नागरिकांच्या तक्रारींसाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व नियम पाळून भेटावे किवा या ४ क्रमांकवरच आपल्या तक्रारी मांडा,असे आवाहन त्यांनी केले.

गरजू,गरीब रुग्णांची लृट या पुढे थांबविण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी नागपूरकरांना दिले.
या क्रमांकांवर करा संपर्क-

आनंद- ९८२२२०४६७७
शौनक-७४४७७८६१०५
अमेय-९५६१०९८०५२
मनमीत-७७४४०१८७८५

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या