
तन्मय फडणवीस लसीकरण प्रकरण
नागपूर,ता. २० एप्रिल: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेता देवेंद्र फडणवीस यांच्या तथाकथित पुतण्याने तन्मय फडणवीसने काल इन्सटाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यात तो नागपूरातील नॅशनल कँसर इन्सिटीट्यूटमध्ये करोनाची लस टोचून घेत आहे.या पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच वादळ आहे,काँग्रेस पक्ष्ाने देखील यावर टिका केली मात्र सर्वात जास्त मोहोळ उठले ते सोशल मिडीयावर.आज नागपूरात सेवांकूर नियंत्रण कक्ष्ाचे उद् घाटन करताना पत्रकारांनी फडणवीस यांना याबाबत छेडले असता,अद्याप माझ्या पत्नीचे व मुलीचे लसीकरण झाले नसून तन्मयचे लसीकरण मार्गदर्शक तत्वाप्रमाणे झाले असेल तर हरकत नाही,असे फडणवीस म्हणाले.
मूळात देशातच १८ वर्षे वयावरील तरुणांना येत्या १ मे पासून लसीकरणाची सुरवात होणार असल्याची घोषणा कालच सोमवार दि. १९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली,मात्र तन्मय हा या निकषामध्ये अद्याप तरी बसत नसताना त्याने कँसर रुग्णालयात लस टोचून घेतलीच कशी?यावर बराच काथ्याकुट काल सोशल मिडीयावर झाला.
सर्वात महत्वाचे म्हणजे फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद भूषवले असताना त्यांनाच मार्गदर्शकतत्वाचा विसर पडला आहे का?लसीकरणासाठी वयाचा निकष त्यांना माहिती नाही का?फक्त ‘फडणवीस’ हे आडनाव व नाते असल्यामुळेच तन्मय याला महाराष्ट्राच्या उपराजधानीत भाजपच्याच मालकी हक्काच्या समजल्या जाणा-या नॅशनल कँसर इन्सिटीट्यूटमध्ये सगळे नियम व कायदे धाब्यावर बसवून ‘युवराज’प्रमाणे वागणूक कशी मिळाली?असा संताप व्यक्त केला जात आहे.
फडणवीस यांनी पुश्ती जोडत तन्मय लसीकरणाच्या पात्रतेच्या निकषात बसत नसेल तर हे सर्वथा अयोग्य असल्याचे म्हटले.निकषात पात्र नसल्यानेच माझी पत्नी व मुलगी यांचे लसीकरण अद्याप झाले नाही.आज जरी १८ वर्षांपेक्ष्ा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळले पाहिजे,हे माझे ठाम मत आहे,अशी मखलाशी त्यांनी जोडली.
मात्र येरवी-तेरवी लहान लहान नियम मोडणा-यांना नागपूरचे पोलिस हे रस्यावर अडवून दंड ठोठावतात,दंडूकांचा प्रसाद देतात. फडणवीस यांच्या पुतण्याने तर करोना संदर्भातला राष्ट्रीय नियमच मोडला,मग एक साधासा गुन्हा देखील त्याच्या नावावर दाखल होऊ नये?असा संताप व्यक्त केला जात आहे.
नियम मोडणा-यांना सर्वांना सारखाच न्याय,सारखीच शिक्ष्ा,ही मागणी आता सोशल मिडीयावर चांगलीच जोर धरत आहे.लसीकरणात युवांचा ‘आयकॉन’होऊ पहाणा-या ‘युवराज तन्मय ’याच्यावर गुन्हा नोंदवा,ही मागणी जोर धरत आहे.
एवढंच नव्हे तर इन्सटाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टवर संपूर्ण महाराष्ट्रातून टिकेची झोड उठली आहे.अनेकांनी तर तन्मय याची तिरकस शब्दात चांगलीच फिरकी घेतली आहे.‘फडणवीसांचा पुतण्या खरंच ४५ वर्षाचा आहे तो संतूर साबण लावतो म्हणून तरुण दिसतोय,विनाकारण वाद टाळा’अशी फिरकीही एका नेटीझनने घेतली.
‘४५च्या आत मिळतो वॅकिस्नेशनचा टिका..जर देवेंद्र फडणवीस असेल तुमचा काका’एका नेटीझनने असे यमक जुळवले.
तन्मय फडणवीस ४५ वर्षापेक्ष्ा मोठा आहे का?फ्रंटलाईन वर्कर आहे का?आरोग्य कर्मचारी आहे का?जर नसेल तर त्याला एवढ्या मोठ्या रुग्णालयाच्या जवाबदार वैद्यकीय अधिका-यांनी लस दिलीच कशी?तन्मयचा आधार कार्ड या अधिका-यांनी तपासला नाही का?कि फडणवीस असल्याकारणाने त्याला सेल्यूट ठोकून लस टोचली?लस टोचणा-या त्या अधिका-याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी नेटीझन्सनी केली.
’
भाजपकडे रेमडेसीवीरप्रमाणे लसींचासुद्धा गुप्त साठा आहे का?’असा टोला अनेक नेटीझन्सनी हाणला.
एकाने माझा प्रश्न अगदी सोपा असल्याचे सांगत भारतात ४५ वर्षाखालील लोकांना लस द्यायला परवानगी देण्यात आली आहे.नाही दिली तर हा आहे विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आणि डाळ घोटाळ्यातील आरोपी शोभा फडणवीस यांचा वयात बसत नसलेला नातू, केंद्रसरकारी रुग्णालयात लस कसा घेऊ शकतो?आता तरी तुमचा विश्वास बसत आहे का महाराष्ट्रात औषधांचा साठा करुन ब्लॅकमध्ये कोण विकत आहे ते?असा बोचरा प्रश्न या नेटीझनने उपस्थित केला.
तर एका नेटीझनने ‘शासनाने लसी वाया घालवल्या या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपातील तथ्याचा पुरावा हाती लागला..उद्धवजी या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे‘असा टोला हाणला.
माजी मुख्यमंत्री यांचा पुतण्या आणि माजी मंत्र्यांच्या नातवाला सर्व नियम शिथिल असतील तर नॅशनल कँसर इन्सटिटयूट नागपूर ने १८ वर्षावरील सर्वांचेच लसीकरण आता करावे,अशी मागणी अनेकांनी केली.
‘रेमडिसिवीर‘औषधांचा काळाबाजार करणा-याला वाचवण्यासाठी जो फडणवीस रात्रभर पोलिसांचे हात-पाय चेपू शकतो,तिथे एक-दोन लसींचा गोंधळ याच्याकरिता असत्यनारायणाच्या प्रसादासारखे आहे’असा देखील टोला नेटीझन्सनी हाणला.
थोडक्यात नागपूर शहरात अनेक तरुणांचा करोनामुळे दरराेज तडफडून जीव जात असताना ‘फडणवीस ’हे आडनाव व नातं वापरुन नियमबाह्यरितीने तन्मय फडणवीस याने ज्यापद्धतीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लस टोचून घेतली त्यावर अनेक नेटीझन्सने सोशल मिडीयावर तीव्र नापसंदी जाहीर केली.

आमचे चॅनल subscribe करा