

खाजगी पॅथॉलॉजी लॅबमधील कोव्हीड चाचणी अहवालामध्ये घोळ
नागपूर,ता. १५ मार्च: मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे १० एप्रिल २०२१ रोजी सुशीला भाऊराव गाडगे, प्लॉट नंबर १२, धरमपेठ सायन्स कॉलेज च्या मागे अंबाझरी लेआऊट ह्यांनी आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्यासाठी आपला नमुना तपासणीसाठी दिला. त्याचे शुल्क देखील नियमबाह्य पद्धतीने ३,७०० रुपये गूगल पे द्वारे दिले.शासनाने फक्त ५०० रुपये आरटी-पीसीआरचे निर्धारित केले आहे.
परंतु चार दिवसानंतर आज त्यांना त्यांचा अहवाल मिळाला त्यात नमुना देण्याची तारीख १४ एप्रिल २०२१, त्यांचे वय तसेच त्यांचा आधार क्रमांक पुर्णतः चुकीचा नमूद केलेला आहे!
या अहवालावरून असे लक्षात येत आहे की हा तपासणी अहवाल सुशीला गाडगे यांचा नसून आणखी कुणाचा तरी त्यांना देण्यात आला. कोरोना महामारीचा उद्रेक आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता तसेच कामाची व्याप्ती बघता अहवालाची नीट तपासणी न करता इतर कुणाचा तपासणी अहवाल कुण्या दुसऱ्याला देण्याच्या असा हलगर्जीपणा म्हणजे अमाप पैसा कमविण्यासाठी चा गाेरख धंधा बनला असल्याचे लक्ष्ात येतं.महत्वाचे म्हणजे शासन व प्रशासनाचे यावर कोणतेही अंकूश नाही.
अश्या चुकीच्या अहवालामुळे कुणाच्या जीवावर अरिष्ट ओढवू शकतं याचे सुद्धा भान या खासगी लॅब संचालकांना राहीले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. करोना चाचणीच्या तपासणी अहवाला मध्ये इतक्या अक्षम्य चुका करून ठेवल्या आहेत की त्यांचा कोव्हीड नमुना अहवाल हा सुद्धा बरोबर आहे की नाही यात शंका निर्माण झालेली आहें.
गाडगे यांचा कोरोना अहवाल आज चार दिवसांनी चूक कि बरोबर यात शंका असल्यामुळे त्यांचे तीन ते चार दिवस निघून गेले आहेत आणि अश्या अवस्थेत त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले किंवा प्रकृती ढासळली तर याला जबाबदार कोण ? याचे उत्तर मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी द्यावे अशी मागणी आम आदमी पक्षाच्या अध्यक्ष् कविता सिंघल यांनी केली आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांनी हा अहवाल तयार केला आहे व ज्यांची स्वाक्षरी प्राधिकरण म्हणून या अहवालावर आहे त्या डॉ. श्वेता कावलकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून असा प्रसंग पुन्हा कुणावर ओढावणार नाही अशी मागणी आम आदमी पक्ष्ाने केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
