फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरावर आता स्टीकर!

गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरावर आता स्टीकर!

Advertisements

रुग्णाचे नांव व होम आयसोलेशनचा कालावधी केव्हा पासून केव्हापर्यंत त्यामध्ये नमुद

नागपूर, ता. १८ : गृहविलगीकरणात असलेले कोरोना बाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागपूर महानगरपालिकेतर्फे दहा झोन कार्यालया अंतर्गत गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरावर “स्टीकर” लावणे सुरु केले आहे. मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार स्टीकर लावण्यात येत आहे. स्टीकरवर “पॉझीटीव्ह कोव्हीड – १९ रुग्ण होम आयसोलेशन” असे नमुद करुन त्यामध्ये रुग्णाचे नांव व होम आयसोलेशनचा कालावधी (केव्हा पासून केव्हापर्यंत) सुध्दा त्यामध्ये नमुद करण्यात आले आहे.

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करावे याबाबत मनपाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशानुसार गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलिस कारवाई केली जात आहे. मनपाच्या या आदेशाची सर्व झोनमध्ये सक्तीने अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने कार्यवाही केली जावी. आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध सक्तीने कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना पुनश्च दिले आहेत.

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलकीकरणामध्ये राहण्याची मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी नियम निर्धारित करण्यात आले आहेत. अनेक कोरोनाबाधितांकडून गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सक्तीने गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन व्हावे याबाबत मनपा झोन स्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्कॉड) गठीत करण्यात आले असून वैद्यकीय कारणाशिवाय गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या