

पॅथोलॉजी लॅब्सची सखोल चौकशीची मागणी: तरुणाला आधी पॉझिटीव्ह नंतर दिला निगेटीव्ह अहवाल
नागपूर,ता. १८ मार्च: दुबईला जाणा-या एका २८ वर्षीय प्रवाश्याकडून शहरातील नामांकित अश्या दोन पॅथोलॉजी लॅब्सनी पैस उकळून त्याचा अहवाल आधी मुद्दामून पॉझिटीव्ह दिला व यानंतर पैश्यांची मागणी करुन निगेटीव्ह दिला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष् श्रीकांत शिवणकर यांनी आज गुरुवार दि.१८ मार्च रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केली.
करोना नसल्याचा अहवाल पाहिजे असेल तर द्या दहा हजार रुपये!‘अश्याप्रकारे शहरातील काही प्रतिष्ठित व नामांकित पॅथोलॉजी लॅब्स हे नागपूरकर नागरिकांची लूट करीत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी याप्रसंगी केला.दि.११ मार्च रोजी नागपूरवरुन २८ वर्षीय तरुणाला तातडीने दुबईला जायचे होते,आंतरराष्ट्रीय उड्डाण घ्यायचे असल्यास ४८ तास आधी करोनाची चाचणी करणे व अहवाल बाळगणे बंधनकारक आहे.

कोणतीही लक्ष् णे नसलेल्या या तरुणाने ११ मार्च रोजी हैदराबादला जाण्यापूर्वी डॉ.दिनेश अग्रवाल यांच्या बायो पॅथ या रामदासपेठेतील नामांकित लॅबमध्ये चाचणी केली.दुस-या दिवशी दूपारी तो करोना बाधित असल्याचा अहवाल त्याच्या मोबाईलवर पाठविण्यात आला.वेळेवर अशी माहिती मिळाल्यानंतर तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरले.याच प्रयोगशाळेतून एका कर्मचा-याचा त्याल फोन आला व १० हजार रुपये दिल्यास दूसरा अहवाल अरेंज करुन देतो असे त्याला सांगितले.‘मरता क्या न करता’या तत्वाप्रमाणे त्याने तातडीने दूसरा अहवाल मागितला.त्याला त्याच दिवशी धंतोली येथील मेट्रो लॅब ॲण्ड डायग्रोस्टिक सेंटरमधून करोना निगेटीव्हचा अहवाल प्राप्त झाला.
दुबईला पोहोचल्यानंतर त्याला तेथील चाचण्यांमध्ये कुठलाही संसर्ग आढळून आला नाही!या संपूर्ण प्रकाराने त्याला व त्याच्या कुटुंबियांना झालेल्या त्रासामुळे त्याने राष्ट्रावादीच्या उत्तर नागपूरातील नेत्याकडे तक्रार केली व संपूर्ण पुरावे पाठवले.
मूळात जो तरुण नागपूरात उपस्थितच नव्हता नमुने द्यायला,त्याचा चाचणी अहवाल मेट्रो लॅबने हैद्राबाद येथे निगेटीव्ह पाठवलाच कसा?असा प्रश्न शिवणकर यांनी उपस्थित केला.अश्या प्रकारे संसर्ग नसलेल्या लोकांना संसर्गित दाखवून आयसीएमआर आणि महानगरपालिकेला चुकीचे आकडे दिले जात आहे का?असा सवाल त्यांनी केला.
लोकांच्या भीतीग्रस्त मानसिकतेचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा गोरखधंदा नागपूरात जोरात सुरु असल्याचा आरोप करीत नागपूरातील इंडियन मेडीकल असोसिएशन काय करीत आहे?महानगरपालिका जातीने लक्ष् देऊन अश्या लायक नसलेल्या आरोग्य सेवा संस्थांवर काय कारवाई करणार आहे?असा सवाल त्यांनी केला.
सामान्य जनतेला रस्त्यावर दिसल्यास चोप देणारे विभागअश्या आरोग्य सेवा पुरविणा-या भ्रष्ट संस्थांना ठिकाणावर आणेल का?असा सवाल त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकाराची तक्रार आम्ही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असता त्यांनीच पत्र परिषद घेऊन या संपूर्ण गौडबंगालाचा खुलासा करण्याचा सल्ला दिला असल्याचे शिवणकर यांनी सांगितले.आमच्याकडे अश्या बोगस अहवाल व पैसे मागून अहवाल बदलण्याच्या ५ ते ६ तक्रारी आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाने या दोन्ही लॅब्सवर कारवाई न केल्यास जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी पक्ष् हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करील असा इशारा त्यांनी दिला.
या दोन्ही लॅब्ससोबत संपर्क साधला का?त्यांचे काय म्हणने आहे?असा प्रश्न विचारला असता या दोन्ही पॅथोलॉजी लॅब्सनी त्यांची चूक कबूल केली असल्याचे शिवणकर हे म्हणाले.आधी त्यांनी आमच्याकडे बारकोड असतो,बाधिताचा अहवाल गूपित ठेवला जातो इ.अशी मखलाशी केली मात्र संपूर्ण पुरावे दिल्यानंतर त्यांना त्यांची चूक कबूल करावी लागली,असे त्यांनी सांगितले.
एकीकडे करोना बाधितांचा आकडा वाढल्याने शहरात लॉक डाऊनसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,त्यात मुद्दामून बाहेर गावी जाणा-यांना हेरुन त्यांना बाधित असल्याचे चूकीचे व खोटे अहवाल दिले जात असल्याचा संताप शिवणकर यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण आकडेवारीवर नागपूरकरांनी विश्वास ठेवावा कसा?मनपाकडे कोणती यंत्रणा आहे,हे अहवाल खरे की खोटे ठरविण्याचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दक्ष्ि ण नागपूरचे अध्यक्ष् अशोक काटले यांनी अश्या लॅब्सवर मनपा आयुक्तांनी कठाेर कारवाई करण्याची मागणी केली.सर्वसामान्य जनतेच्या मानसिकतेशी खेळणा-या या पॅथोलॉजी लॅब्सना एवढी कठाेर शिक्ष्ा करावी की जेणेकरुन इतरांनी जनतेची अशी लुबाडणूक करु नये.उद्या मनपा आयुक्तांना आम्ही संपूर्ण पुराव्यानिशी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अद्याप खासगी रुग्णालयांच्या दर्शनी भागात दरफलक का नाही?विशाल खांडेकर(अध्यक्ष्,उत्तर नागपूर)
राष्ट्रवादी पक्ष्ातर्फे २६ ऑक्टोबर २०२० रोजी तत्कालीन महापौर संदीप जोशी यांना निवेदन देण्यात आले होते.खासगी रुग्णालयांतर्फे करोनाच्या नावावर जी लृट सुरु आहे ती थांबवून कोणत्या उपचारासाठी किती दर आहेत?याचे फलक खासगी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात लावण्याची आम्ही मागणी केली होती,अद्याप त्यावर कारवाई झाली नाही.
अव्वाच्या सव्वा बिलांचे संकट कोणावरही येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने २१ मे २०२० रोजी ‘खासगी रुग्णालयांकडून आकरण्यात येणा-या शुल्कावरील र्निबंध’या संबंधी सूचना पत्रक काढलं होतं.यात प्रत्येक खासगी रुग्णालयाला असा दर फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे मात्र नागपूरात किती खासगी रुग्णालयात हे दर फलक आढळून येतात?
सर्वसामान्य नागरिकांवर वारंवार दंड आकारुन नागपूर महानगरपालिकेचे पथक हे दररोजचा आकडा प्रसिद्ध करतात मात्र अश्या किती खासगी रुग्णालयांवर दंड आकारला याकडे मात्र हेतूपुरस्सर दुर्लक्ष् केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
करोना बाधितांची लृट करणा-या खासगी लॅब्ससोबतच खासगी रुग्णालयांनी नियमांचे पालन न केल्यास राष्ट्रवादी पक्ष् रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला.
पत्र परिषदेला राष्ट्रवादी पक्ष्ाच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष् मेहबूब पठाण उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
