

ठोठावला ५ हजारांचा दंड
नागपूर, ता. १६ : शासनातर्फे वारंवार सूचना करुन देखील काही नगारिक हे किती बेजाबदारपणे वागतात याचे मूर्तीमंत उदाहरण आज महेन्द्र नगरमध्ये दिसले. या भागात राहणारा व करोनाची लक्ष् णे असणारा एक महाभाग गृहविलगीकरणात राहण्या ऐवजी चक्क शहरात फेरफटका मारीत होता. मनपा आयुक्तांनी अचानक त्याच्या घरी तपास केला असता तो घरी न आढळ्यामुळे त्या महाभागावर ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार दि. १६ मार्च रोजी गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणा-या या कोरोना बाधित रुग्णावर रु. ५,००० चा दंड लावला. आशीनगर झोन अंतर्गत महेंद्र नगरमध्ये राहणारा हा रुग्ण घराच्या बाहेर फिरत होता. मनपा आयुक्तांनी नुकतेच निर्देश दिले होते की गृह विलगीकरणाचे पालन न करणा-या रुग्णांवर दंड वसूल करा तसेच त्यांना विलगीकरण केन्द्रात पाठवा. त्या अनुसार ही कारवाई करण्यात आली.
शहरात सध्या करानेाची दूसरी लाट आली आहे,प्रशासनाची चिंता वाढली आहे, नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास करोनाची लाट नियंत्रणात येऊ शकते मात्र एक करोनाबाधित शहरात अश्याप्रकारे बेजवाबदारपणे फिरुन संसर्गितांची साखळीच निर्माण करीत असतो.त्यामुळे अश्या नागरिकावर फक्त ५ हजार रु.दंड न आकारता त्याला तुरुंगाची कोठडी देखील दाखवावी असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
अश्या बेजवाबदार नागरिकांमुळेच नियम पाळणा-यांवर देखील लॉक डाऊनचा फटका बसतो.काम धंदे ठप्प होतात,बायको मुलांची उपासमार होते,त्यामुळे जे करोना बाधित गृहविलगीकरणाचे नियम न पाळता शहरात खुले आम बिंदास फिरताना आढळतात त्यांची रवानगी सरळ तुरुंगात करावी,अशी मागणी नियम पाळणारे नागरिक करीत आहेत.
याशिवाय पथकाने आज शहरातील नियम न पाळणा-या १२ दूकाने व प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,०६,००० चा दंड वसूल केला!
पथकाने गती के डब्ल्यू ई एक्सप्रेस लिमिटेड काटोल रोडवर रु २५ हजाराचा दंड लावला. पथकानी ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची ही तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

आर.आर.टी. टीम सोबत आयुक्तांनी केली कोरोनाबाधितांच्या घराची पाहणी-
महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंगळवारी झोनच्या आर.आर.टी. टीम सोबत काँटेक्ट ट्रेसिंगच्या कार्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ.टिकेश बिसेन व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.अतीक खान उपस्थित होते.
आयुक्तांनी गोरेवाडा भागात आर.आर.टी.सोबत कोरोनाबाधितांच्या घरांची पाहणी केली. त्यांनी मंगळवारी झोनच्या आरोग्य कर्मचा-यांना निर्देश दिले की नियंत्रण कक्षावरुन गृह विलगीकरणमध्ये असलेले कोरोना बाधितांना पहिल्या, चौथ्या, सातव्या व दहाव्या दिवशी फोन करुन त्यांच्या प्रकृतिबद्दल माहिती घेण्यात यावी. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले २०-३० नागरिकांची चाचणी करण्यात यावी.
आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जास्तीत-जास्त नोंदणी करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी टीम सोबत गृह विलगीकरणात कोरोना बाधित हे नियमांचे पालन करतात की नाही याचीपण तपासणी केली.
यावेळी आयुक्तांनी मास्कचा उपयोग न करणा-या दुचाकी वाहन चालकांना दंड करण्याचे निर्देश ही दिले.
मनपातर्फे १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंधने कडक करतानाच नागरिकांनी कामाशिवाय रस्त्यावर फिरु नये, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले असूनही मोठया प्रमाणात नागरिक विनाकारण घराबाहेर फिरतांना दिसत आहेत.
मनपा आयुक्तांनी अश्या नागरिकांची विचारपूस करणे आणि ज्या नागरिकांचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांना दंड लावण्याचे निर्देश दिले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
