

आठ हजार विद्यार्थ्यांनी दिल्या ‘व्हरर्च्यूअल’मुलाखती
नागपूर,ता. १४ मार्च: फॉरच्यून फाऊंडेनच्या ’यूथ एम्मपावर समिटला’ आज दुस-या दिवशी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.ऑन लाईन पद्धतीने पार पडलेल्या या मुलाखत प्रक्रियेत आज जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद नोंदवला.आज पार पडलेल्या मुलाखत सत्रामध्ये देशभरातील अनेक प्रतिथयश कंपन्यांनी सहभाग नोंदवला तर विदर्भाच्या अनेक भागातून विद्यार्थ्यांनी या व्हरर्च्यूअल’प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.
काल शनिवार दि. १३ मार्च रोजी केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग तसेच सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समिटचे उद् घाटन झाले.याप्रसंगी दृकश्राव्य माध्यमातूनच माजी मुख्यमंत्री व विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या उपक्रमाला शुभेच्छा प्रदान केल्या.सातत्याने ७ व्या वर्षात यशस्वीपणे पदापर्ण करणा-या या समिटची गडकरी यांनी भरभरुन प्रशंसा केली.
फॉरच्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष् माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या कल्पकतेचे कौतूक करीत जिद्द व चिकाटीने कोणतीही संकल्पना सिद्धीस नेण्याचा त्यांच्या कर्तृत्वाचे गडकरी यांनी आपल्या उद् घाटनपर भाषणात कौतूक केले होते.करोनाच्या महामारीच्या या अत्यंत कठीण परिस्थितीत देखील विदर्भाच्या युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सोले यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक फडणवीस यांनी केले.

करोनामुळे अनेक युवकांनी नोक-या गमावल्या असल्या तरी करोना ही एक संधीच समजावी असे सांगून प्रा.अनिल सोले यांच्या कल्पकतेने साकारल्या गेलेल्या यूथ एम्पावरमेंट समिटचा लाभ विदर्भातील विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले होते.
यूथ एम्पपावरमेंट समिटच्या दोन दिवसांच्या या उपक्रमात तब्बल ७,८५६ युवकांनी औपचारिक मुलाखती दिल्या.
नागपूर,औरंगाबाद,नाशिक,पुणे,मुंबई इ.अश्या अनेक शहरातून प्रतिष्ठित कंपन्यांनी या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला.करोनामुळे या वर्षी हे समिट सुरक्ष्ेच्या कारणावरुन ’ऑन लाईन’ स्वरुपात घेण्यात आले असून पुढील तीन दिवस या मुलाखती चालणार आहेत.
या वर्षी या समिटमध्ये तब्बल १७ हजार युवकांनी नोंदणी केली असून ७३ कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला आहे.आज पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेमध्ये केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
आज पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेत बीव्हीजी, बजाज इलेक्ट्रीकल्स,विरोक इंजि.मिंडा लाईट्स,टेक फॉर्म यासोबत अमेझोन,गोदरेज,ब्रिटानिया,पूणे मेट्रो,िफल्पकार्ट,पेटीएम,एसबीआय कार्ड,हूडस टेक्नॉलॉजी,डाव्वी इंजि.इनोव्ह सोर्स,कायनॅटिक मोटर्स,शारदा मोटर्स,दिशा इंजि,बिग बास्केट इ.अनेक प्रतिष्ठित कंपंन्यांनी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या.

युवकांनी मुलाखती गांर्भीयाने घ्यावा-प्रा.अनिल सोले
फॉरच्यून फाऊंडेशन हे इच्छूक युवक व कंपन्या यामधील रोजगाराच्या दृष्टिने मधला दूवा आहे.गेल्या सात वर्षांपासून फॉरच्यून फाऊंडेशन हे काम सातत्याने पार पाडीत आहे.करोनाचे गंभीर संकट असताना देखील यात खंड पडू दिला नाही.करोनामुळे रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली असताना या ऑन लाईन यूथ एम्पावर समिटच्या माध्यमातून या वर्षी देखील युवकांना फाऊंडेशने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे मात्र युवकांनी मुलाखती या गांर्भीयाने घेतल्या पाहीजे.मुलाखती दरम्यान जरी त्या व्हरच्यूअल स्वरुपात होत असल्या तरी योग्य ड्रेस कोड मेंटेन करावा,एका ठिकाणी बसून मुलाखती द्यावा,पुढील तीन दिवस आणखी या मुलाखाती पार पडणार आहेत,याचा योग्य तो लाभ घ्यावा.




आमचे चॅनल subscribe करा
