Homeनागपूर न्यूजयुथ एम्पॉवरमेंट समिटचे उद्या उद् घाटन: फॉर्च्युन फाऊंडेशनचे आयोजन

युथ एम्पॉवरमेंट समिटचे उद्या उद् घाटन: फॉर्च्युन फाऊंडेशनचे आयोजन

Advertisements

समिटचे हे ७ वे वर्ष: फेसबुक लाईव्हद्वारे होणार प्रारंभ

नागपूर,१२ मार्च: फॉर्च्यून फाऊंडेशनतर्फे आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिट-२०२१ चे उद्या दि. १३मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता उद् घाटन होणार आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे याला ‘व्हर्च्युअल समिटचे’ स्वरुप देण्यात आले आहे.

सकाळी १०.३० वाजता केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या व्हर्च्युअल समिटचे फेसबुक लाईव्हद्वारे उद् घाटन होईल.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची प्रमुख उपस्थिती असेल.

फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात या समिटचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. व्हर्च्युअल समिटसाठी एक स्वतंत्र यंत्रणाच उभी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सर्व इच्छूक उमेदवारांच्या आनलाईन मुलाखती होणार आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग यात असेल.

विशेष म्हणजे ५ हजार जागांसाठी तरुणांच्या आनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखतींसाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून तरुणांना रोजगार देण्याचे आणि त्यांच्यासाठी उद्योगाचे शेकडो मार्ग खुले करण्याचे काम ’युथ एम्पॉवरमेंट समिट’सातत्याने करीत असून समिटचे हे ७ वे वर्ष आहे.

आता पर्यंत दर वर्षी पाच हजार लाभार्थ्यांनी समिटचा लाभ घेतला असून हीच मालिका कोरोनासारख्या संकटाच्या काळात या वर्षी देखील कायम ठेवण्यात आली आहे. ही बाब तरुणांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Latest बातम्या