Homeनागपूर न्यूजभाजपने केला लॉक डाऊनला विरोध मात्र ठोस भूमिका नाहीच!

भाजपने केला लॉक डाऊनला विरोध मात्र ठोस भूमिका नाहीच!


नागपूर,ता. ११ मार्च: भारतीय जनता पक्ष्ाने पालकमंत्री नितीन राऊत यांच्या १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉक डाऊनच्या घोषणेचा विरोध केला असून मंत्री महोदयांनी शहरातील कोणत्याही आमदारांना,खासदार,महापौर,लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता शहरात कडक संचार बंदीची घोषणा केली,भारतीय जनता पक्ष्, ना या निर्णयाचा विरोध करतो ना समर्थन अशी गुळगुळीत भूमिका भाजपच्या शहरातील शीर्षस्थ नेत्यांनी आज घेतली.

नेमके भाजपचे काय दुखणे आहे हे या शीर्षस्थ नेत्यांच्या संभाषणातून नागपूरकर जनतेला उमजलेच नाही.आपल्या संपूर्ण संभाषणात शहरातील गरीब,अति गरीब,सामान्य जनतेला काेणत्या भंयकर आर्थिक संकटातून पुन्हा एकदा जावे लागणार आहे याचा कोणताही उहापोह या नेत्यांनी आपल्या संभाषणात न करता,शहरातील भाजपच्या आमदारांना विश्‍वासात न घेता सरसकट पालकमंत्र्यांनी संचारबंदीची घोषणा केली,यावरच त्यांचा जास्त जोर दिला!.

बैठकीत भाजपच्या आमदारांना,लोकप्रतिनिधींना,महापौरांना. पालकमंत्र्यांनी सहभागी करुन घेतले असते तर,पक्ष्ाची संचारबंदीच्या संदर्भात नेमकी काय भूमिका असती?याबाबत मात्र कोणातीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नाही.

आमदार गिरीश व्यास यांनी पक्ष्ाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पालकमंत्री यांनी पुन्हा एकदा शहरात कडक संचारबंदी लागू करण्याचा अत्यंत दूर्देवी निर्णय घेतला आहे,या निर्णयाचा भाजप पक्ष् निषेध ही करत नाही आणि समर्थन ही करत नाही!हा निर्णय पालकमंत्री यांनी एकतर्फी घेतला असून शहरातील आमदार,महापौर,नगरसेवक कोणालाही विश्‍वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

पूर्वी जेव्हा शहरात लॉक डाऊन लावण्यात आला तेव्हा आमच्या पक्ष्ाच्या जनप्रतिनिधींनी विविध भागात जाऊन जनतेला याबाबत जागरुक केले.व्यापार ही बंद करण्याचा आग्रह केला.प्रशासनाने मागेच लॉक डाऊन लागला व करोनाच्या संसर्गाची स्थिती सुधारली असतानाच ज्या गतीने काम करायला हवे होते ते केले नाही,प्रशासन व आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आज ही स्थिती उद् भवली असा आरोप करीत मागे देखील पक्ष्ाच्या जनप्रतिनिधींना बैठकीत बोलावण्यात आले नाही,यावेळी देखील पालकमंत्र्यांनी तेच केले,अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो,असे व्यास हे म्हणाले.सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करताना मात्र कडक संचारबंदीसाठी कोणताही निषेध पक्ष्ातर्फे नोंदवण्यात आला नाही हे विशेष!

Latest बातम्या