फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापौरांचा घेराव नाही फक्त चर्चा:वंदना भगत

महापौरांचा घेराव नाही फक्त चर्चा:वंदना भगत

Advertisements

काशीनगर प्रकरणात हेतूपुरस्सर बदनामी

नागपूर,ता. ७ मार्च: काशीनगर भागात दर सोमवारी अगदी रस्त्यावर भरणा-या बाजारासंबंधी माझ्याकडे त्याच भागातील काही नागरिकांनी तो बाजार तेथून हटवावा म्हणून निवेदन दिले होते.महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेेतलेल्या बैठकीत शहरात कुठे गर्दीचे ठिकाण आहे?अशी विचारणा केली असता मी त्यांना काशीनगर भागात बाजारामुळे होणा-या गर्दीबाबत माहिती दिली व तो बाजार तेथून हटविण्यात यावा यासाठी पाहणी करण्याची विनंती केली.महापौर पाहणीसाठी आले तेव्हा काशीनगर भागातील नागरिकांनी त्यांचा कोणताही घेराव घातला नाही फक्त त्यांच्याशी समस्येबाबत चर्चा केली,असा दावा धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत यांनी केला.

शहरातील दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रामेश्वरी, काशिनगर, द्वारकापुरी, सम्राट अशोक कॉलोनी, हावरापेठ मधील प्रभाग क्रमांक-३३ च्या रहिवासीयांना गेल्या अनेक वर्षांपासून वस्तीतील रस्त्यावरच ठिय्या मांडून बसणाऱ्या अनाधिकृत सोमवार बाजाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गत वर्षात कोरोना येण्यापूर्वी नागरिकांच्या विरोधानंतर उपरोक्त बाजार बंद पाडण्यात आले.
यानंतर पुन्हा रामेश्वरी रोडवर बेकायदेशीररित्या हा बाजार सुरू झाला. तसेच खसरा क्रमांक ५१/१, ५१/२ मौजा बाबुळखेडा काशीनगरात नागपूर महानगर पालिकेचे चार ते पाच तुकडयांमध्ये मोकळे भूूखंड आहे. ही जागा मंजुरी विकास योजनेत भाजी बाजार आरक्षणा खाली आहे. ही जागा प्रशासनातर्फे भाजीपाला बाजारासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, तुकडयांमध्ये असलेला हा भूखंड कोणत्याही पद्धतीने बाजारासाठी योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

परिसरातील नागरिकांच्या निवेदनावरुन मी या ठिकाणी आधूनिक बाजार निर्माण करण्यात यावा,यात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मनपाच्या अति.आयुक्तांना निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र माझ्या विरोधात हेतुपुरस्सर गैरसमज पसरविण्यात आला असल्याचा आरोप भगत यांनी केला.

जेसीबी मशीन ही नियमित सफाईकरिता आली होती-
एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी महापौर हे निघून जाताच जेसीबी मशीन आल्याने महीलांनी घेराव केला,या बातमीत देखील तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला.त्या भागाची नियमित साफ सफाई करण्यासाठी जेसीबी मशीन नेहमीच येते.त्या भूखंडावर बाजाराचे आरक्ष् ण आहे ते इतरत्र कुठे स्थानांतरित करता येते का?याचे निवेदन मीच दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दाढे नावाच्या बिल्डरने या ठिकाणी कंपाऊंड भिंत निर्माण करुन दिली आहे मात्र ले आऊटचा विचार करताना त्याचा डीपीआर बनतो त्या डीपीआरमध्ये ही जागा बाजारासाठी आरक्ष्ि त करण्यात आली.

माध्यामात प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये अनेकांची जी नावे दिली आहेत ती देखील चुकीची आहे.माझे आज अनेकांशी बोलणे झाले आहे त्यातील अनेकांनी त्यांना त्यांचे नाव का दिले याची माहिती देखील नसल्याचे वंदना भगत या म्हणाल्या.

फक्त गर्दीचे ठिकाणी हलविण्यासाठी महापौर तिथे पाहणीसाठी आले होते.या ठिकाणी अनेकांचे प्लाट हे नझूलमध्ये आहे,हे प्लाट नियमित करता येतील का?अशी विचारणा महापौरांना येथील नागरिकांनी केली.महापौरांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले असून माझा उद्देश्‍य हा प्रामाणिक होता.या ठिकाणी रस्त्यावर येणारा बाजार हा आधूनिक पद्धतीने बनवून द्यावा व स्थानिकांना त्यात रोजगार मिळावा,यासाठी मी निवेदन दिले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या