
ज्वाला धोटे यांचा इशारा
नागपूर,ता. ४ मार्च: नागपूरातील बहुतांश प्रत्येक पोलिस ठाण्यात मुन्ना यादव व त्याच्या साथीदारांनच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत.नागपूरात “लोकशाही” ला तडा जाईल अशी “गुंडेशाही” गेल्या पंधरा वीस वर्षांन पासून सूरू आहे. नागपूर शहर हे जणू गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात भारतीय जनता पक्ष्ाचे काही नेते जबाबदार आहेत असा अरोप करीत मुन्ना यादव हा गुंड देखील भाजपचा पोसलेला पोशिंदा असून नागपूर पोलिसांनी आपल्या खाकी वर्दिची किमया आणि ताकद दाखवून त्याला त्वरीत अटक करावी अन्यथा जर अशा समाज कंटक गुन्हेगारांना चोप देण्यास पोलिस विभाग अपयशी ठरत असेल तर आमची विदर्भ अन्याय निवारण समिती विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या स्टाईल मध्ये अशा समाज कंटक गुन्हेगारांना सरळ करू असा इशारा विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष् व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्बन सेल, नागपूर(जिल्हा)शहराध्यक्ष् .ज्वाला धोटे यांनी पत्रकाद्वारे दिला.
कुख्यात गुंड मुन्ना यादव हा शहरात जणू “नंगा नाच” करीत असल्याचे नागपूर शहर गेल्या पंधरा -वीस वर्षांपासून अनुभवत आहेत आणि मुन्नाच्या या नंग्या नाचाला प्रत्यक्षपणे फक्त माजी मुख्यमंत्री व सद्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी पत्रकात केला.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र माेदी हे देशात “स्वच्छ भारत अभियानात” विषेश रस घेतांना दिसतात आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नागपूरात गुंड प्रवृत्तीला अभय देऊन समाजात “अस्वच्छ भारत अभियान” राबवतांना दिसतात. जरी माजी मुख्यमंत्री आणि आमची राजकीय विचारधारा भिन्न असली तरी मी त्यांचा सम्मानच करते कारण ते विदर्भवादी तर आहेतच परंतु एक अभ्यासू व्यक्तिमत्वाचे ते धनी आहेत.
परंतु, राजकीय डावपेच आणि आर्थिक मुद्द्यांवरून जर ते मुन्ना यादव या सारख्या गुंड, समाज कंटक गुन्हेगारास पाठीशी घालत असतील तर ही बाब त्यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या पक्षाच्या गरीमेला गालबोट लावण्यासारखी गोष्टं आहे असे त्या म्हणाल्या.
हत्या,स्री अत्याचार, भूखंड घोटाळे, प्राण घातक हमले, जीवे मारण्याची धमकी, अवैध धंदे, ब्लॅकमेलिंग सारखे अनेक गंभीर गुन्हे मुन्ना यादव व त्याच्या कुटुंबियांवर दाखल आहेत आणि अशा समाज कंटक गुन्हेगाराला आपला उजवा हात (Right Hand ) बनवून नागपूर शहरात अनेक कार्यक्रमस्थळी माजी मुख्यमंत्री त्याला मिरवतात हा तर निर्लज्जपणाचा ऊच्चांकच म्हणावा लागेल.
‘दुस-यास शिकवी तत्वज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण’ अशी गत माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्ष नेते यांची झालेली आहे.
गुन्हा करायचा आणि मग पोलिस विभागावर दबाव आणून गुन्हा दाखल होऊ द्यायचा नाही आणि मग जर इकडून तिकडून काही सामाजिक संघटनेची व सामाजिक व्यक्ती कडून पोलिस विभागावर दडपण आले आणि गुन्हा दाखल झाला तर महिना भर पोलिसांच्या आशीर्वादाने ‘फरार‘ रहायचे आणि एखादा नामवंत व मोठी फी घेणारा वकील नेमून अटकपूर्व जामिनी साठी प्रयत्न सूरू करायचे आणि न्याय व्यवस्थेचा आधार घेऊन जामिन मंजूर करून घ्यायचा आणि पुन्हा बेशरमपणे शहरात उघड्या छातीने फिरायचे ही मुन्ना यादवची पद्धतच झाली आहे.
माझ्या कडे अनेक असे पूरावे आहेत ज्यावरून हे स्पष्ट निदर्शनास येते कि Clear Title जमीनीत Dispute निर्माण करून संबंधित जमिनीवर कब्जा करायचा आणि मुळ मालकास धमकी देऊन लाखो करोडो रूपयांची खंडणीची मागणी करायची.या गोरख धंद्यांत त्याचा लहान भाऊ मनोज यादव व ईतर साथीदार देखिल सामिल असतात. माझ्या जवळ सबळ पूरावे देखिल आहेत आणि वेळ आल्यास प्रसिद्धी माध्यमांनसमोर मी ते सादर देखील करेन अशी स्पष्टोक्ती ज्वाला धोटे यांनी दिली.
मुन्ना यादव याच्या कुटुंबातील बहुतांश सर्व सदस्य तुरूंगाची हवा खाऊन आलेले आहे. तुरुंग म्हणजे ” घर आंगण ” अशी त्यांची मानसिकता झालेली आहे.अनेक प्रशासकीय अधिका-यांकडून सत्तेच्या जोरावर यांनी अनेक चूकीचे निर्णय घेण्यासाठी संबंधित दडपण आणल्याचे ही माझ्याजवळ पूरावे आहेत.म्हणूनच देवेन्द्र फडणवीस यांनी “जनाची नाही तर निदान मनाची लाज ठेवावी” आणि अशा समाज कंटक गुन्हेगारांना अभय घालने सोडावे,अशी मागणी त्यांनी केली.
मणसाची ओळख त्याच्या संगतीवरून केली जाते आणि अशा समाज कंटक गुन्हेगारांची साथ जर विरोधी पक्ष नेते देत असतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही.पोलिस विभागाची सुद्धा भूमिका संशयास्पद आहे.,असो आरोप त्यांनी केला.
एमआयडीसीच्या भूखंड व्यवहारातील ४० वर्षीय एक पिडीत महिला अनेक दिवसांन पासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे . संबंधित महिला आणि तिच्या सारखे अनेक पिडित मुन्ना यादवच्या अटकेसाठी आस लावून बसले आहेत.हजारोंची नागपूर पोलिसांची फौज या गुंड्याला पकडण्यास अपयशी ठरते ही गोष्टं पचनी पडत नाही!! पोलिसांच्या थर्ड डिग्रीच्या समोर चांगल्यात चांगले मातब्बर गुंड माफिया आणि बदमाश सरळ होतात.आता योग्य वेळ आलेली आहे कि जेणेकरून पिडितांना न्याय आणि गुन्हेगारांचे “कर्दनकाळ “ म्हणून पोलिसांची छबी जनते समोर येईल.
मुन्ना सारखे गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मी अजनी परिसरातील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करते की अशा समाज कंटक गुन्हेगारांना व त्यांच्या परिवारजणाला येणा-या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी.
मुन्ना यादवच्या पाठीशी आतून अनेक राजकीय पक्षांचा मदतीचा हात आहे हे नाकारता येणार नाही.माझी सर्व राजकीय पक्षांना कळकळीची विनंती आहे कि ज्या व्यक्तींनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा समाज कंटक गुन्हेगारांना पक्षाची उमेदवारी देऊ नये. सर्व राजकीय पक्षांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना महापालिका, विधानसभा आणि लोकसभेची उमेदवारी नाकारावी व स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरू नये.
मुन्ना यादवसारख्या निर्ढावलेल्या गुंडाला तात्काळ अटक करण्यात यावी व त्याच्या बेहिशेबी संपत्तीची त्वरित चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात यावी अशी विनंती गृहमंत्री महोदयांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेचा आणि प्रामुख्याने पिडितांचा पोलिस विभागा आणि न्याय व्यवस्थेवरचा विश्वास मजबूत व्हावा या करीता मुन्ना यादव सारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे फार गरजेचे आहे. MCOCA तथा MPDA मार्फत त्वरीत मुन्ना यादव वर कारवाई करण्यात यावी. गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी हे कायदे निर्माण झाले आहेत . या कायद्यांची अमल बजावनी नागपूरातील ‘व्हाईट कॉलर ’गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रकात केली.

आमचे चॅनल subscribe करा