फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजटेकडी गणेश मंदिर: तिळी चतुर्थीला फक्त नमस्काराची परवानगी

टेकडी गणेश मंदिर: तिळी चतुर्थीला फक्त नमस्काराची परवानगी

Advertisements

ना हारफूल ना प्रसाद: मंदिर प्रशासन करेल मास्कचा पुरवठा

नागपूर,ता. २९ जानेवारी: रविवार दि.३१ जानेवारी रोजी तिळी चतुर्थीच्या निमित्ताने नागपूरकरांचे आराध्य दैवत असणा-या टेकडी गणपती मंदिरात यंदा दरवर्षीप्रमाणे होणा-या पूजा-प्रसाद विधीला फाटा देण्यात आला असून यंदा भाविकांना फक्त नमस्कार करण्याचीच मुभा राहणार आहे.याशिवाय मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश नसल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष् विकास लिमये यांनी पत्र परिषदेत दिली.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता,रविवारी तिळी चतुर्थीनिमित्त मंदिरात येणा-या भाविकांना हारफूल आणि प्रसाद आणण्यास मंदिर समितीने मनाई केली आहे.त्यामुळे भाविकांना यंदा फक्त दर्शनाचाच लाभ घेता येणार आहे.

तिळी चतुर्थीला टेकडी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.यावेळी देखील पाैष तिळी चतुर्थीला मंदिात येणा-या भाविकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टच्या वतीने सामाजिक अंतर पाळून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने परिसरातील सर्व दूकाने बंद ठेवण्यात येणार असून वाहनांची पार्किंग मानस चौकातील माहेश्‍वरी भवनाच्या परिसरात करण्यात आली आहे.

जे नागरिक मंदिरात मास्कशिवाय येतील त्यांना मंदिर व्यवस्थापनाकडून मास्क देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तिळी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे.सकाळी ४ वाजता मंगल आरती होईल.भाविकांसाठी ५०० किलो रेवडीचा प्रसाद ठेवण्यात आला आहे. याशिवाय सायंकाळी ४ वाजता विकास मालू तर ५ वाजता हल्दीरामचे व्यवस्थापकीय संचालक शिवकिसन अग्रवाल यांच्या हस्ते महापूजा करण्यात येईल.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष् श्रीराम कुळकर्णी,सचिव संजय जोगळेकर,सहसचिव अरुण व्यास,कोषाध्यक्ष् दिलीप शहाकार उपस्थित होते.

अशी असेल व्यवस्था-
पार्किंग माहेश्‍वारी सभागृहाच्या बाजूला असणा-या मैदानात राहणार आहे.महादेव परिसरात चप्पल व जोडे स्टॅन्ड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भाविकांसाठी पार्किंगच्या जागेपासून ई-रिक्क्ष्ांची सोय,मुख्य प्रवेशद्वारापासून महिला आणि पुरुष असे दोन स्वतंत्र मार्ग,दर्शनादरम्यान मध्ये कुठेही थांबता येणार नाही.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या